व्दितीय महायुद्धातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ” दूरदृष्टी ” च्या भूमिकेने भारत देशाला वाचविले क्रूरकर्मा हिटलरच्या पारतंत्र्यात जाण्यापासून…….!

09 मे भुमिका नाट्यानुभव
सायंटिफिक सभागृह – सायं ६.३०
स्वातंत्र्य पुर्व काळात भारतीय स्वातंत्र्य चळवळ लढा ऐरणीवर असतांनाच व्दितीय महायुद्धाची सूरवात झाली. हुकुमशहा मुसोलिनी, स्टॅलिन, नेपोलियन, हुकुमशहा हिटलर यांचे देश व सोबतीला इतर देश असे *शत्रू पक्ष* म्हणून एका बाजूला तर फ्रांस ,अमेरिका, इंग्लंड आदि देश *मित्रपक्ष* म्हणून दुसऱ्या बाजूला अशी दुसऱ्या महायुद्धात जगाची वाटणी झाली. शत्रू पक्षासोबत जगातील तीन ते चार हुकुमशहांचा भरणा असल्याने सहाजिकच हुकुमशाही – झोटिंगशाही आणि लोकशाही अशी विभागणी वाट्याला आली. हिटलरसह त्याच्या हुकुमशहा मित्रांची जग गिळंकृत करण्याची अभिलाषा तर इंग्लिश साम्राज्याचा जगभरातील विस्तार….. एक बाजू दगड तर दुसरी वीट…. त्यातच्
हिटलरच्या अघोरी प्रवृत्तीची जगाने घेतलेली धास्ती अशा परिस्थितीत जागतिक लोकशाहीचे जतनासाठी जगाने कोणत्या बाजूला जावं हा कळीचा मुद्दा ऐरणीवर आला असताना…….
तत्कालीन शिर्ष भारतीय नेते ही संभ्रमी अवस्थेत सापडलेले……. इंग्लंडच्या गुलामीत भारत असल्याने ह्या आयत्या संधी चा फायदा घेऊन इंग्लंड ला धडा शिकवला जावा ही व्यवहार्यता अनेक शिर्ष नेत्यांना पचनी पडल्याने मित्र पक्षाला या युद्धात सहकार्य करू नये अशी एक भूमिका घेतली गेली….
तर
क्रूरकर्मा हुकुमशहा हिटलरच्या घशात देश गेला तर पुढील दोनशे वर्षे स्वातंत्र्य विसरून जावे लागेल. तसेच जगातील लोकशाही टिकून राहण्यासाठी या महायुध्दात कोणत्याही परिस्थितीत हिटलरचा पराभव हाच एकमेव पर्याय असा हा फिलाॅसाॅफीकल अप्रोच…….. असलेली दुसरी भूमिका घेतली गेली…….
अडवणूकीची व्यवहार्यता की दुरदृष्टी ठेवून तत्वाची जोपासना ……..?
असे भारतीय नेत्यांमध्ये पडलेले उभे दोन तट…….
शत्रू पक्षाच्या समर्थनार्थ असलेल्या भारतीय नेत्यांच्या भुमिकेला गोंजारण्याकरिता तत्कालिन प्रसारमाध्यमे पूढे सरसावली. आणि या भूमिकेमुळे हुकुमशहा हिटलरच्या विजयामुळे भारताचे होणारे अहित विचारात न घेता मोठ्या प्रमाणात या पक्षांच्या व त्यांच्या नेत्यांच्या भुमिका प्रसिद्धीझोतात आणून गौरवान्वित केल्या गेल्या.
तर
भारतातील एकमेव स्वतंत्र मजूर पक्ष आणि पक्षनेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी महायुद्धाच्या सुरवाती पासून तर शेवटापर्यंत दृढ आणि खंबीर भूमिका घेऊन मित्रराष्ट्रांना बिनशर्त समर्थन देण्याची भूमिका घेतली. व शेवटपर्यंत या भुमिकेवर ते व त्यांचा पक्ष ठाम राहिलेत. परिणामी
मित्र पक्षाच्या विजयामुळे हुकुमशहा हिटलरच्या तावडीतून व पारतंत्र्याच्या मगर – मिठीतुन देश वाचवला गेला. व एवढेच नव्हे तर इंग्रजांच्या गुलामगिरीतून ही देश मुक्त झाला.
” इंग्रज या युद्धात शेवटच्या खंदकात असल्याने त्यांना भारताला स्वातंत्र्य दिल्या वाचून गत्यंतर नाही. याची वाच्यता ते वारंवार आपल्या भाषणातून, आपल्या वृत्तपत्रीय अग्रलेखातून सातत्याने करतं राहिले. हिटलर चा विजय या महायुद्धात झाला तर पुन्हा दिडशे दोनशे वर्षांचे पारतंत्र्यात आपला देश जाऊं शकतो.
अशी सुरवातीपासून शेवटपर्यंत घेतलेली स्वतंत्र मजूर पक्षनेते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची रोखठोक भूमिका…….
परंतु एवढी प्रखर देशहित कारक, राष्ट्र हितं वादी भुमिका मांडण्यासाठी कोणताही लेखक, पत्रकार, प्रसिद्ध माध्यमे पुढे कुणीही आले नाहीत. आणि ही प्रखर देशभक्ती ने ओतप्रोत अशी भुमिका इतिहासाच्या उदरात गडप होणे जवळजवळ निश्चित झाले होते.
जर यदाकदाचित *स्मृति शेष मार्शल ऍड . विमल सूर्य चिमणकर सरांसारखा जागतिक संदर्भासह मांडणी करणारा तगडा लेखक या भूमिकेच्या मांडणीसाठी नव्वद च्या दशकात मिळाला नसता आणि गळ्यातील ताईत झालेली बानाई “नाट्यानुभव ” घेऊन आली नसती तर ही भुमिका तशीच दडपली गेली असती कां ? मग आता या भूमिकेला ” न्याय ” देण्याची जबाबदारी कोण स्वीकारणार…….? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेला खऱ्या अर्थाने ” देश गौरव ” म्हणून कोण संबोधणार ❓ मृत्यू नंतर अडोतीस वर्षांनी *” भारतरत्न पुरस्कार “* देणारे भारत शासन……….❓
की,
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या व्दितीय महायुद्धातील, क्रूरकर्मा हिटलरच्या तावडीतून भारत देशाला सोडवणारी आणि इंग्रजांना भारताला स्वातंत्र्य देण्यास भाग पाडणारी देशहिताची प्रखर भुमिका …………. ज्या भूमिकेकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केलेले तत्कालीन इतिहासकार ❓
की,
जागृतीचा अग्नी तेवत ठेवणारे आम्ही भारताचे लोक ……. ❓
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या व्दितीय महायुद्धातील दृढ-निश्चयी, खंबीर भूमिकेला ” देश गौरव ” म्हणून आम्ही भारतीय कधी स्वीकारणारं आहोत ❓ हे मार्मिक प्रश्न चिन्ह………
ह्या भूमिकेला सविस्तर रित्या जाणून घ्यायची जबाबदारी आम्हा भारतीयांची…….
यासोबतच व्हिएतनाम मध्ये हो-ची-मिन्ह यांनी सुद्धा व्हिएतनाम तेंव्हा फ्रान्सच्या गुलामगिरीत असतांनाही फ्रान्ससह मित्र राष्ट्रांना समर्थन दिले होते…..
या सर्व बाबी विस्तृतपणे जाणून घ्या….. संदर्भ –
समता सैनिक दल- जलसंपदा मैत्री संघ, सिरी विजय देवराज सर यांचे विशेष सौजन्याने, तसेच गळ्यातील ताईत ” बानाई “ नागपूर व्दारा प्रकाशित पुस्तकं…..
” डॉ आंबेडकर आणि व्दितीय महायुद्ध “
लेखक – स्मृतिशेष मार्शल ऍड. विमल सूर्य चिमणकर
पुढील भाग – २
व्दितीय महायुद्धातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भुमिकेचा ” वैश्विक कॅनव्हास “….
(क्रमशः)
वृत्तांकन – जयंत इंगळे सचिव बानाई नागपूर
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत