उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस ; 19 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाने कहर केला आहे. राज्याच्या मध्यवर्ती भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे काही ठिकाणी शाळा देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशात गेल्या 24 तासांत पावसाशी संबंधित घटनांमध्ये 19 जणांचा मृत्यू झाला आहे, पुढेही हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशची राजधानी लखौमध्ये सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागातील घरं पाण्याखाली गेली आहेत. नाले तुंबल्याने रस्ते पूर्णपणे पाण्याने भरुन गेले आहेत आणि वाहतुकीवरही याचा परिणाम झाला आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात 15 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर नंतर 17 सप्टेंबरपर्यंत हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल.
लखनौच्या हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये 15 सप्टेंबरपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासांत 40 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. ज्यामध्ये राजधानी लखनौ आणि बरेली, कानपूर, शाहजहांपूर, फतेहपूर, सीतापूर, लखीमपूर खेरी, फारुखाबाद, फिरोजाबाद, बाराबंकी, हाथरस, रामपूर, कन्नौज, संभल, बिजनौर आणि मुरादाबाद या जिल्ह्यांचा समावेश आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत