महाराष्ट्रमुख्य पानमुख्यपान
जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचं येत्या शनिवारी उद्घाटन

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ही माहिती आज दिली. माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त जालना इथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. नवीन रेल्वेगाडीमुळे प्रवाशांना जलतगतीने प्रवास करता येणार असल्याने वेळेची बचत होणार आहे, असे ते म्हणाले. जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन येत्या ३० तारखेला होणार आहे. जालना रेल्वे स्थानकावरून सकाळी अकरा वाजता या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले जाईल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत