कायदेशीर मार्गाने मराठा समाज ओबीसी मध्ये आला तरच त्याला आरक्षण मिळेल -अमरजीत पाटील ( ज्येष्ठ व्याख्याते पंढरपूर)

आटपाडी
२१/११/२०२३
फुले शाहू आंबेडकर विचार मंच यांच्या वतीने संविधान की ओर, या अभियान अंतर्गत भारतीय संविधान जनजागृती सप्ताह व्याख्यानमालेचे दुसरे पुष्पगुणताना कायदेशीर मार्गाने मराठा समाज ओबीसीत आला तरच त्याला आरक्षण मिळेल अन्यथा ही मागणी असविधानिक होईल असे परखड मत सामाजिक व आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक पंढरपूरचे सुपुत्र अमरजीत पाटील यांनी व्यक्त केली.
भारतीय संविधानिक दृष्टिकोनातून मराठा आरक्षण आणि वर्तमान राजकारण या विषयावर ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेमध्येच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य समता व बंधुता या तीन तत्त्वांचा समावेश धर्मनिरपेक्षता या संकल्पनेमध्ये केला. भारतातील सर्व समाजाच्या विकासाचा व प्रगतीचा अर्थ त्यामध्ये अभिप्रेत आहे. परंतु हिंदुस्तान च्या नावाखाली एकाच धर्माचा व जातीचा विकास करून हे राष्ट्र हिंदू राष्ट्र घोषित करण्याचा डाव सध्याच्या राज्यकर्त्यांचा आहे.
संविधान हे सर्व धर्माच्या विकासासाठी आहे. केवळ हिंदू धर्माची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी नाही. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले सध्याच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या स्टेजवर फुले शाहू आंबेडकरांचे फोटो लावले जात नाहीत. ही मानसिकता अजून आपले क्षत्रियत्व विसरून आपण मागास आहोत हे मानायलाच मराठा समाज अजून तयार नाही. या महापुरुषांना समजून घेऊन स्वीकारायलाच हवे, मराठा समाजाला अजूनही शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची संभाजींच्या धाडसाची डॉक्टर बाबासाहेब यांच्या विद्वत्तेची जाण नाही.ओबीसी मधील एक हजार ते बाराशे जातींना अजूनही आरक्षणाचा लाभ नाही.
अशा परिस्थितीमध्ये मराठा बांधवांनी दलित मुस्लिम समाजाचा द्वेष करता त्यांच्याशी समजसणे हातात हात घालून समाजाने एकत्र राहिले पाहिजे असे आव्हान त्यांनी मराठा बांधवांना केले.
केवळ कुणबी म्हणून नोंद असलेले दाखले मिळवून चालणार नाही तर ते दाखले वंशावळ दाखवून आपण कुणबी असल्याचे आपणास सिद्ध करावे लागेल, तरच ही मागणी आपली संविधानिक होईल अशा प्रकारच्या भूमिका मा. पाटील यांनी आपल्या व्याख्यानातून मांडल्या. व मराठा आरक्षण आणि वर्तमान राजकारण याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक असलेले प्राध्यापक बाळासाहेब करपे सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सर्व जाती-धर्माच्या विकासासाठी मूलभूत न्याय हक्क व अधिकार दिले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या या सर्वांगीण भूमिका चा मराठा समाजाने अभ्यास करावा. असे मत प्राध्यापक बाळासाहेब करपे यांनी व्यक्त केले.
स्वागत अध्यक्ष राजेंद्र खरात यांनी मागील आठ वर्षाच्या सर्वांगीण आढावा घेऊन सात दिवसातील विविध विषयावर आपली भूमिका मांडली
कार्यक्रमाची सुरुवात फुले शाहू आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलाने प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक संताजी देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन सौनिता सावंत मॅडम यांनी केले.
या कार्यक्रम प्रसंगी नारायण जावीर, सतिश करडे,प्रशांत चंदनशीवे,यशवंत मिटकरी दीपक रणदिवे, दीपक खरात, सावंत सर, रणजित ऐवळे, विशाल काटे, विवेक सावंत, शरद वाघमारे, रवींद्र माने, चंदन बाबर, मारुती ढोबळे, आदित्य सातपुते नितीन तोरणे, सुष्मिता मोटे, कविता खरात, प्रतिभा सावंत, सुरेश कांबळे, चंद्रकांत कांबळे, यांच्यासोबत विविध गावातून महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत