बडतर्फ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांना शिक्षा अटळ ?

बडतर्फ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांना फाशीची शिक्षा अटळ ? पोलीस खात्यात कुरूंदकर सारखीं अनेक आधिकारी होते/ आहेत जीं स्वत: हुषार/ कर्तबगार असून बलाढ्य अशां राजकिय पुढा-यांच्या आश्रयाखाली स्वत: ला चिरंजीव समजतांत. पण अन्यायाचा कडेलोट झाला की नियती व कर्माचा सिध्दांत आपले डोळे उघडतो.
स्वातंत्र्य प्राप्ती नंतर देश व राज्यातील पोलीस दलाचीं ख्यातींत फारसां बदल झालेला नाही. पॉंचो ऊंगलिया घी में और सर कढ़ाई में ही म्हण सार्थक ठरविणारें वरीष्ठ आधिका-यां पासून फौजदार पदां पर्यंत च्या भ्रष्ट व नेत्यां पुढें शेपटी हलविणा-यांचा ग्राफ वाढताना दिसतों. अगदी ना खांऊगा ना खाने दूंगा फाट्यावर बहुतांश सर्वच खात्यात वरील चित्र आहे.
मी सोलापूर ॲंन्टी करप्शन ब्युरो प्रमुख असतांना अभय कुरूंदकर पो. नि. म्हणून बदलून आले होते. त्या पुर्वी ते एपीआय म्हणून Highway Safety Patrol पुणें- हैदराबाद मार्गावर नेमणुकीस होते. त्यांचे मुख्यालय मोडनिंब होते. मोडनिंब फाटा चौफुला – २ म्हणून प्रसिध्द आहे. तेथे W.W.W. पैकी सर्व बाबीं उच्च दर्जाची असल्याने मंत्रालयातील मान्यवर तेथील ग्राहक असायचे.
कुरुंदकरां बाबत माहीती आधीच माहिती मिळाल्या मुळे त्यांना महत्वाची प्रकरणें देत नसतं.
*आतां पोलीस तपासाचे * Credentials & Appreciation of Evidence by the Trial Court !*
१) मयत अश्विनी बिद्रे यांच्या बेपत्ता होण्या पासून खूनाचा गुन्हा दाखल करण्या पर्यंत झालेली अक्षम्य बेपर्वाई.
२ ) गुन्हा दाखल होऊन देखील मुख्य आरोपीच्या अटकेस झालेला विलंब.
३) तपासी अंमलदार श्रीमती संगीता अल्फोंन्सा यांनी गोळा केलेला परस्थिती जन्य पुरावा, न्याय वैद्यक व अन्य वैज्ञानिक पुरावा. प्रत्यक्ष साक्षीदार Direct Evidence उपलब्ध नसतांना अन्य भक्कम पुराव्यांवर आरोपीतां विरूध्द दोषारोप सादर करणे.
४) सर्वात महत्वाचे म्हणजे सरकार पक्षां कडून उपलब्ध झालेले “ लोक अभियोक्ता “ त्यांनी सुनावणी सुरु होण्या पुर्वी पुराव्याच्या missing links जुळविण्या करितां Circumstantial, Forensic, other Scientific Evidence & most important is various provisions laid down in the Indian Evidence Act. आधारें आरोपींना शिक्षा मिळण्या पर्यंत परिश्रम घेणे.
५) ट्रायल जज्ज यांनी देखील सरकार पक्षाने सादर पुराव्यांवर गंभीर पणे लक्ष दिल्याचे निदर्शनास आले आहे. जेंव्हा मा. न्यायमुर्ती महोदय Its a rarest rare Case म्हणून उल्लेख करतांत तेंव्हा संपूर्ण पोलीस दलास व गृहखात्याला चपराक बसण्या करितां दि. ११ एप्रील रोजी वरील प्रमाणे निकाल मिळणार हे नक्की
सौ. अश्विनी बिद्रे मर्डर केस पेक्षा ही भयानक अशां दोन प्रलंबित खटल्यात राज्याचे लक्ष केंद्रीत झालेले आहे.
१) शीना बोरा मर्डर केस. ( आईने संपत्तीच्या हव्यासां पोटी स्वत: च्या तरूण मुलीचा खून करून प्रेत जंगलात फेकून दिले होते.
२) अलिकडील बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील तरूण सरपंच संतोष देशमुख यांचा निघृण खून. ( अख्खा महाराष्ट्र त्यामुळे ढवळून निघाला होता.
तळ टीप :- अभय कुरूंदकर प्रकरण भाजपा -१ काळांत घडले व निकाल भाजपा -२ काळांत काळांत लागला. मस्साजोग प्रकरणाची सुनावणी प्रगती पथावर आहे. सरकार पक्षाकडूनव ॲड. उज्वल निकम साहेब पैरवी करत आहेत.
-ॲड. दिलीप चिं. शेपाळ, पुणें. 🤵♂️
( निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त ) 👨🏻✈️
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत