देश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

(आणि त्यांनी बुद्धाची गाळा भेट ) घेतली …. 14 एप्रिल च्या निमित्ताने

मानवी उत्क्रांतीच्या इतिहासामध्ये मानवाचा पूर्वज हेमा हेक्टस आदिमानव हा होता या अंतिम सत्याचा प्रक्षेपण मानवी संस्कृतीवर करण्यासाठी बाबासाहेबांनी आपल सार आयुष्य संसार पणाला लावला. हा शोध धर्म . जातीच्या पलीकडे जाऊन संपूर्ण मानव जातीलाच कवेत घेण्याकरता होता, परंतु ज्या जात ,धर्म संस्कृतीमध्ये त्यांचा जन्म झाला तिने त्यांना कधीच चार सुखाचे घास खाऊ दिले नाही, किंवा सुखाच्या सावलीत बसून दिले नाही. आपल्या दाही दिशांना दुःखदन्यांनी पिचलेली” माय भाकर वाढ ग माय” म्हणत भूक कंठात घेऊन उभी असलेली एकाच सांस्कृतिक बापाचे लेकर पाहून त्यांचा जीव तळमळत असायचा.
धर्माच्या चरख्यामध्ये माणसानेच माणसाला पार पिंजून काढल्यामुळे ती पार पि चाड झालेली ही माणसं त्यांना भुताखेता सारखी, चेहरा हरवलेली वाटायची. या कोटी कोटी लोकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या भावनेची उगवण झाल्यापासून, जाण आल्यापासून नकळत त्यांच्या अंतरी होत होती. त्या उगवणीच्या रोपट्याची आता सावली देणारा वटवृक्ष होऊन तो आता हिरवाईन ड वरून आला होता आणि तो प्रसंग घडला.

इंग्लंड येथे उच्च शिक्षण घेतल्यानंतर बडोदा संस्थानात मोठ्या हुद्द्यावर काम करत असताना तो घडला. आपली जात चोरून एक अस्पृश्य पारश्याच्या खानावळीमध्ये राहत आहे ही बातमी वाऱ्यासारखी बडोद्यात पसरली आणि शे 200 चा जमाव लाट्या काठ्या घेऊन त्यांना मारण्यासाठी खानवळीवर चालून गेला “.त्या आंबेडकराला आमच्या ताब्यात द्या म्हणू बोलू लागला” तेव्हा तो पारशी त्यांना म्हणाला ” मी आंबेडकरांना आत्ताच हे शहर सोडायला लावतो परंतु त्यांचं काही वेड वाकड करू नका तुम्ही परत जा” पार्शानं त्यांची समजूत काढली. जमाव परत गेला. तो पारशी बाबासाहेबांवर त्यांच्या बुद्धिमत्तेवर अतिशय प्रेम करत होता. बाबासाहेबांवर तो प्रेम करणारा पारशी बाबासाहेबांना सांगतो “आंबेडकर तुम्हाला तुमच्या जीवाच मो ल नसेल परंतु तुमच्या समाजाला ते आहे, असं म्हणतात लाख जाओ पण लाखाचा पोशिंदां ना जाओ; तो जगलाच पाहिजे, म्हणून तुम्हाला तुमच्या लोकांसाठी, त्यांच्या उद्धारासाठी जगलच पाहिजे” अशा प्रकारे त्याने बाबासाहेबांची समजूत काढली.

रात्री बारा वाजता बाबासाहेब बडोदा स्टेशनवर आपली ट्रंक घेऊन प्लॅटफॉर्मच्या एका टोकाला झाडाखाली हाता श होऊन बसले होते. डोक्यात विचारांचकाहूर माजलं होतं .नाचत नाचत समोर येऊन त्यांना ते प्रश्न विचारत होतं “तू इतका विद्या विभूषित आहेस की या देशातील माणसांनाच काय परंतु त्यांच्या देवांना पण हरविण्याची तुझी बौद्धिक ताकद असताना तुझी ही अवस्था! तर ज्यांना हात पाय असूनही ते हलविण्याची परवानगी नाही ,डोळे असूनही चांगलं पाहता येत नाही ,आणि जगण्याच तर काहीच साधन नाही ते तुझे कोटी कोटी बांधव कसे जगत असतील? डोळ्यांमधून काळजात शिरलेले ते काहूर बाबासाहेबांना रडत होतं, अश्रुने तेथील मातीला भिजवत आपला आक्रोश सांगत होतं, त्याचवेळी बाबासाहेबांचे लक्ष वर आकाशामध्ये तुटून अतिशय वेगाने खाली येणाऱ्या ताऱ्याकडे गेल, सर्व अंगात काहीतरी सळसळल. ते त्वशाने उठून उभे राहिले, दोन्ही हातांच्या मु ठी आवळून गरजले “नाही! नाही, मला असा आक्रोश करून चालणार नाही . कोटी कोटी बांधवांसाठी मला हिमालयाच्या छातीने, वाघाच्या काळजा न, एखाद्या धारदार कातिळासारखं उभ राहिलाच हवं” आणि त्याचवेळी अश्रूंनी भिजलेल्या तेथील मातीलाही गंध आला ,त्या अंधाऱ्या रात्रीच्या साक्षीने काळाने वर्णव्यवस्थेवर पहिला घाव घातला होता हे त्या बिचाऱ्या मनुला ही ठाऊक नव्हतं.

खऱ्या अर्थाने येथूनच बाबासाहेबांचा दलित मुक्तीचा लढा सुरू झाला होता. परिणाम लग्न रमाशी केलं आणि पाट मात्र दिनदुबळ्यांच्या दुःखाशी लावला होता. मृत झालेल्या दलितांच्या अस्मिता जागविण्यासाठी “अरे तुम्हीही माणस आहात, जनावर नाही .तेव्हा ताट मानाने बोलायला चालायला शिका. कमरेत वाकून जोहार मायबाप प्रथेला लाथ मारा .ज्या देवाने तुमचं कधीच भलं केलं नाही त्या देवांना फेकून द्या . अशा प्रकारे झोपलेली माणसं जागे करण्यासाठी बाबासाहेब देशभर फिरत, सभा, बैठका घेत होते. या दलित जागृतीच्या अभियानाचे भीम टोले त्यांनीच सुरू केलेल्या मूकनायक, बहिष्कृत भारत; जनता. या वृत्तपत्रामधून मारत या विषम शोषणवादी व्यवस्थेची ते चिरफाड करत होते.
“अरे आम्हीही तुमच्यासारखेच तुमच्या धर्मातील माणसं आहोत ,मग तुम्ही आम्हाला असे कुत्रे मांजरापेक्षा ही हिं न पणे का वागवताहे ?सांगण्यासाठी बाबासाहेबच्या जीवाचा आक्रोश सुरू होता.! त्यासाठीच आपला संसार चिले पिले सर्व सोडून ते अख्खा देश पायाखाली तुडवत होते. परंतु बाबासाहेबांच्या हा का या धर्मांध लोकांना ऐकू गेल्याच नाही उलट देवा धर्माने घालून दिलेल्या चौकटीत त्यांच्या करणीवर तुम्ही प्रश्न विचारता म्हणून ते जास्त चे काळले होते. बाबासाहेबांची देशद्रोही ,धर्मद्रोही, इंग्रजांचे हस्तक, म्हणून निंदा नालस्ती करत होते.

निसर्गाने दिलेल्या पाण्यावर कुत्र्या मांजराचा जर अधिकार आहे मग आम्ही पण माणसं आहोत तो अधिकार आम्हाला मिळालाच पाहिजे हे सांगून बाबासाहेबांनी पाण्यावरचा आपला हक्क बजावण्यासाठी 20 मार्च 1928 रोजी हजारो अनुयायांच्या साक्षीने महाड येथील तळ्यातील पाणी ओंजळीत घेऊन प्रशासन केले . वास्तविक जगातील विद्वानातील विद्वानाच्या स्पर्शाने ते पाणीच पावन झालं होतं.( सिम्बॉल ऑफ नॉलेज अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील )परंतु एक महारा ने त्यांच्या अनुयायांनी तळ बाटावल म्हणून शेकडं अस्पृश्यांची डोके फोडले गेली. आपल्या गावी परत जात असता कितीतरी अस्पृश्यांना मिळेल तेथे झोप डपून रक्तबंबाळ केलं. शेकडो खेडोपाडी अस्पृश्यांना मारहाण करून त्यांच्या वरती गावकीचे सामाजिक बहिष्कार टाकले .पाणी प्यायला तर मिळालं नाहीच परंतु गाव , गाव अस्पृश्यांची उपासमार झाली चवदार तळ्याचं फार मोठा धार्मिक कार्यक्रम घेऊन शुद्धीकरण केलं गेलं. बाबासाहेबांचा त्यांच्या कोटी कोटी लोकांचा पाण्यासाठीचाक्रोश या देशातील काळीज हरवलेल्या माणसांना ऐकू जात नव्हता, कारण अस्पृश्य माणस आहेत ही भावनाच त्यांनी पुसून टाकली होती.

आम्ही जर हिंदू आहोत तर हिंदूंच्या देवळात आम्हाला प्रवेश मिळालाच पाहिजे. हा आमचा अधिकार आहे हे सांगण्यासाठी आणि हक्क पजावण्यासाठी; दोन मार्च 1930 पासून नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रवेशासाठी बाबासाहेबांनी आपल्या हजारो अनुयायान बरोबर सत्याग्रह सुरू केला होता हा सत्याग्रह पाच वर्ष आठ महिने म्हणजे ऑक्टोबर 1935 पर्यंत चालला. अस्पृश्याचा स्पर्श होईल म्हणून या संपूर्ण काळात काळाराम मंदिराला कुलूप ठोकलं होतं. सत्याग्रहा ची निष्पत्ती म्हणजे बाबासाहेबांसह, बरोबर शेकडो अस्पृश्यांची डोके फुटून अस्पृश्यांच रक्त त्या रामाच्या अंगणात सांडलं परंतु त्यांन आपले बंद केलेले डोळे आणि दरवाजाही मात्र उघडला नाही. दादासाहेब गायकवाड यांनी मध्यंतरी गांधींना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती परंतु त्या नंग्या महात्म्यांन पत्राद्वारे कळविले की” मंदिर प्रवेशासाठी अस्पृश्यांनी संप करण्याची काही गरज नव्हती. हा प्रश्न स्वातंत्र्यानंतर सोडवता आला असता. त्यावेळी हिंदूंची मन आपोआप हळूहळू परिवर्तित झाली असती”.
देवाची करणी आणि नारळात पाणी असे अवस्था गरिबांच्या बापू ने अस्पृश्यांची केली होती, राम राहिला बाजूला उलट “मानावर करून बोलता काय? देवळात जाऊन देवाला शिवण्याची भाषा करता काय? म्हणत गाव गाड्यात अस्पृश्याचे खूप हाल केले गेले. देव तर भेटला नाही परंतु त्यांच्या राखणदारांकडून मात्र अस्पृश्यांना खूप चोप खावा लागला. गावोगावी बहिष्कारामुळे उपास तपास काढावे लागले .वास्तव हा सत्याग्रह रामाच्या भेटीसाठी नव्हताच तर आपल्या माणसांचं हरवलेलं आत्मभान जाग करण्यासाठी ,तुम्हीही यांच्याशी लढू शकता भांडू शकतात हे आपल्या लोकांना कळण्यासाठी ची ती कार्यशाळा होती

ज्या धर्मात माझ्या शेकडो पिढ्या शापित म्हणून जगल्या; तो धर्म आजही माणूस म्हणून आम्हाला जगू देत नसेल आणि आम्ही जिवाचे रान करूनही आपला हट्ट सोडत नसेल, तर असा धर्म आमच्या काय कामाचा? शेवटी अत्यंत निराश होऊन 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला येथे हजारो अनुयायान समोर त्यांनी घोषणा केली की” दुर्दैवाने मी जरी अस्पृश्य जातीत जन्माला आलो तो काही माझा गुन्हा नाही, कारण जातीत जन्म घेणं माझ्या हातात नव्हतं परंतु मरताना मात्र मी हिंदू म्हणून मरणार नाही ते माझ्या हातात आहे”
त्यानंतर बाबासाहेब 21 वर्षे वाट पाहत थांबले होते ,की हिंदू धर्माची कठोर मन नरम होतील आणि आम्हाला माणूस म्हणून सामावून घेतील, परंतु एवढा प्रदीर्घ काळ जाऊनही हिंदू मन द्रवली नाहीत उलट या माणसाने देशाच्या राज्यघटनेमधून माणूस केंद्रबिंदू मानून नी धर्मराज्य व्यवस्था या देशाला दिली त्यामुळे जगातील आमचा सर्वश्रेष्ठ धर्म समानतेच्या पातळीवर आणून दुय्यम ठरविला निखारे विझण्या ऐवजी अधिक जोमाने पेटले होते.

बाबासाहेब निराश झाले होते. शेवटी निर्णय पक्का झाला .”आता या कुजलेल्या घरात राहून काही उपयोग नाही .आपल्या काळजातील हाका , त्यांचे चित्कार त्यांना ऐकू जात नाहीत, शिवाय आज जग विज्ञानाच्या वाटेने जात असताना गळ्यात मनामनाचे दगड धोंडे अटकवून चालणाऱ्या माणसांचा धर्म आमच्या काय कामाचा याचा? आता मला त्याग केलाच पाहिजे निर्णय पक्का झाला. गेली 35 वर्षे झाली तुम्हीही माझेच लेकर रहात म्हणत हा धर्म आम्हाला पोटात मध्ये घेईल असं वाटत होतं इतकी वर्ष या दगड धोंड्यांपुढे मी माझा डोकं आपटत होतो प्रत्येक वेळी रक्त माझं सांगत होतं परंतु त्यांच्यात मात्र तसू भरही फरक पडत नव्हता गेले 30-35 वर्ष माझ्या काळजा मधून निघणाऱ्या हाका त्यांच्या किंकाळ्या या दगडांना आणि त्यांना सांभाळत स्वतःला माणसं म्हणणाऱ्या माणूस असलेल्या प्राण्याला ऐकू गेलाच नाही म्हणण्यापेक्षा त्यांनी , ऐकून घेतलंच नाहीत” म्हणत शेवटी साहेब बुद्धाकडे वळाले. अशा बुद्धाकडे की ज्याच्या मागे आजही धावत आहे. विज्ञानाच्या हातात हात घालून जो तेव्हापासून चालत आहे आणि हे विश्व असेपर्यंत चालत राहणार आहे. सदैव मानवी कल्याणाचा संदेश देत राहणार आहे. शेवटी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेबांनी नागपूरला दीक्षाभूमी जन्मास घातली आणि आपल्या पाच लाख अनुयायासह मुक्तीसाठी बुद्ध धम्माची दीक्षा घेऊन आपल्या पूर्वजाची गळा भेट घेतली.

क्रमशः

      रा .शी.   दोंदे . ( नाशिक)
Mob9637637982

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!