आज मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक.

आज (ता.१०) अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागात पुणे ते लोणावळा स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. त्यामुळे अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे-लोणावळा उपनगरी मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
मेगाब्लॉकमुळे पुण्याहून लोणावळ्याला जाणाऱ्या काही लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी ९.५७, सकाळी ११.१७, दुपारी ३ वाजता, सायंकाळी ४.२५, सायंकाळी ८.०२ वाजता सुटणाऱ्या गाड्या रद्द राहतील. याचबरोबर शिवाजीनगरहून तळेगावला दुपारी ३.४७ वाजता सुटणारी लोकल आणि शिवाजीनगरहून लोणावळ्याला सायंकाळी ५.२० वाजता सुटणारी लोकल या गाड्या रद्द असतील.
तसेच, लोणावळ्यातून पुण्याला दुपारी २.५०, रात्री ७ वाजता सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. लोणावळ्यातून शिवाजीनगरला सकाळी १०.०५, सायंकाळी ५.३० आणि रात्री ७.३५ वाजता सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तळेगावहून पुण्याला सायंकाळी ४.४० वाजता सुटणारी लोकलही रद्द असेल.
याचबरोबर एमजीआर चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी सुमारे साडेतीन तास उशीराने धावणार आहे. हा मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला प्रवाशांनी सहकार्य करावे, मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रामपाल बडपग्गा यांनी असे आवाहन ले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत