शाळेने आईन्स्टाईनला नापास केले होते की नाही? परंतु आईन्स्टाईनने शाळेलाच नापास केले.

तथागत भगवान बुद्धाने सांगितले आहे की,मी सांगतो ते सुद्धा मान्य करण्याची गरज नाही. तुम्ही तेच मान्य करा जे तुमच्या तर्क, विवेक, बुद्धीला पटते.
अत्त दीपो भव अर्थात स्वतःचा दीपक स्वतः बना म्हणजेच स्वतःचा उद्धार करता स्वतः बना, स्वतःचा गुरु स्वतः बना. सफरचंदाच्या झाडाखाली तेव्हा न्यूटनच्या जवळ कोणतीही पुस्तके किंवा गुरु नव्हता. तरीसुद्धा त्याने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला.
चहा बनवीत असताना जेम्स वाट यांच्याजवळ तर्क आणि विवेकाची कसोटी होती. वाफेच्या शक्ती संदर्भातील ते सर्व पुस्तके चहा करताना तो जवळ घेऊन बसला नव्हता. हेच आहे अत्त दीपो भव.
डोळे बंद करून चालाल तर अंधभक्त जरूर बनाल. मेंढ्यासारखे एकामागे एक चालाल तर मेंढी जरूर बनाल. तुमच्यासारखा दुसरा या जगात कोणीच नाही आहे. तुम्ही जे करू शकता ते दुसरा करू शकत नाही एवढी शक्ती तुमच्याजवळ आहे. म्हणून म्हणतो याने हे म्हटले आहे, त्याने ते म्हटले आहे यापेक्षा तुमचे काय मत आहे हे सर्वात जास्त मौल्यवान आहे. पुस्तकांमध्ये जे लिहिले आहे, ते लिहिले आहे.
तुम्ही असे काही लिहा जे कोणी लिहिले नाही. तरच नवीन नियमाचा विकास होऊन नवीन समाज निर्माण होईल.
अत्त दीपो भाव च्या मार्गावर चालून तुम्ही एक नवीन ज्ञान समाजाला देऊ शकता. काही तरी नवीन वैज्ञानिक शोध लावू शकता. चिकित्साच्या क्षेत्रामध्येही एखादे नवीन औषध शोधू शकता.
नवीन निर्मितीसाठी हिम्मत पाहिजे कारण तेव्हा तुमच्यावर आरोप होतील, तुमची सर्वत्र बदनामी होईल, सगळीकडे तुमचीच चर्चा होईल. तुम्हाला ते सर्व सहन करावे लागेल जे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, संत कबीर आणि बुद्ध यांनी सहन केले.
आईन्स्टाईनला शाळेने नापास केले किंवा नाही. परंतु आईन्स्टाईनने शाळेला मात्र नक्कीच नापास केले.
सनातनी बुद्धिस्ट प्रा. गंगाधर नाखले
30/03/2025,7972722081
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत