परित्राण पाठ

विपत्ति पटिविहाय, सब्ब सम्पति सिध्दिया ||
सब्ब योगा विनासाय, भवे दिघायु दायकं ||
सब्ब दुक्खा विनासाय, भवे निब्बाण सन्तिके
भन्ते अनुग्गहं कत्त्वा परित्तंब्रूथ मंगलं ||१||
समन्ता चक्क वालेसु, अत्रागच्छंतु देवता ||
सध्दम्म मुनि राजस्स, सुणन्तु सग्ग मोक्खदं ||
धम्मसवण कालो, अयं भदन्ता ||
धम्मसवण कालो,अयं भदन्ता ||२||
धम्मसवण कालो,अयं भदन्ता
ये सन्ता सन्ता चित्ता त्रिसरण भरणा एन्थं लोकं तरे वा ||
भुम्मा भुम्माच देवा गुण गुण गहण ब्यावत सब्ब कालं ||
एते आयुन्तुदेवा वर || कनकमेय मेरु राजे वसन्तो ||
सन्तो सन्तो सहेतुं मुनिवर वचनं सौतु मग्ग सुमग्ग ||३||
सब्बेसु चक्कवालेसु, यक्खा देवाचं ब्रम्हानो |
यंदा अम्हेहि कतं पुञ्ञं, सब्ब सम्पत्ति साधकं ||
सब्बेतं अनुमोदित्त्वा, समग्ग सासनरता ||
पमाद रहिता होन्तु, आरक्खासु विसेसतो ||४||
सासनस्सच च लोकच्च, वुडि-ढं भवुत सब्बदा |
सासनप्पिच लोकञ्च, देवा रक्खन्तु सब्बदा |
संध्दिसुखी होन्तु, सब्बे परिवारे हि अत्तनो ||
अनीधा सुमना होन्तु, सहसब्बेहि ञातिभि ||५||
राजातो वा चोरतो वा, मनुस्सतो वा अमनुस्सतो वा
अग्नियतो वा उद्दकतो वा, पिसाच्चतोवा खानुक तो वा ||
कणटकतोवा, नक्ख-त्तत्तो वा ||
जनप्रद रोगतोत्वा असध्दमतोत्वा ||
असन्दिट्टितोवा असुप्परिसतोवा ||
चण्ड-हत्यि अस्स मिगगौन ||
कुक्कर- अहि विच्छिक मणिसप्प दीपि- अछ्छ – अछ्छ- तरछृछ सुकर महिस रक्ख सादिही ||
नाना भयतोवा, नाना रोगतोवा, नाना उपद्दवतोवा, सब्बे मारक्खं गन्हतुं ||६||
मराठी अर्थ
सर्व संकटांचा नाश करणारे, सर्व संपत्तीचा लाभ करुन देणारे, सर्व रोगांचा विनाश करणारे, दीर्घायुष्याचा लाभ करुन देणारे, सर्व दुःखाचा नायनाट करणारे, निर्वाणाकडे पोहोचवणारे असे मंगल परित्राण पाठ, भन्तेजी कृपया आम्हाला सांगावे.|
सभोवतालच्या सर्व श्रेष्ठ सज्जनांनो, निर्वाणपद प्राप्त करुन घेण्याकरिता भगवान बुद्धांच्या सद्धमाला ऐकण्यासाठी इकडे यावे.||१||
होय भन्तेजी ही धम्म श्रवण करण्याची योग्य वेळ आहे.होय भन्तेजी ही धम्म श्रवण करण्याची योग्य वेळ आहे.होय भन्तेजी ही धम्म श्रवण करण्याची योग्य वेळ आहे.||२||
जे शांत चित्ताचे, त्रिसरणाला अनुसरणारे, विविध ठिकाणी राहणारे, सदोदित सत्कार्यात मग्न राहणारे, श्रेष्ठ जनगण, डोंगर दर्या खोर्यात, पर्वतराजीवर वास्तव करणारे आहेत, ते सर्व जण शांत अशा श्रेष्ठ भगवान बुद्धांचेे वचन ऐकण्याकरिता येथे येवोत.||३||
सभोवतालच्या सर्व सज्जनांमध्ये, यक्षांमध्ये आणि ब्राम्हणांमध्ये श्रेष्ठ अशा सर्वांच्या कुशल कर्मामुळे आम्हाला सर्व संपत्ती प्राप्त होवो.त्या सर्वांचे अनुमोदन करुन बौद्ध धम्मात रत होऊन, प्रमादापासून अलिप्त राहून आमचे योग्य प्रकारे रक्षण करोत.||४||
सदोदित बोद्ध धम्माची, त्याचप्रमाणे जगताची वृद्धी होवो, श्रेष्ठ लोक या धम्माचे व जगताचे सर्वतोपरी रक्षण करोत. सर्व कुटुंबियांना व स्वतःला देखील सुख प्राप्त होवो.सर्वांना मानसिक सुखाचा लाभ होवो.||५||
राजभय, चोरभय, मानवीभय, अमानवीभय, अग्नीभय, जलभय(पूर, प्रलय वैगरे)गेंडाभय, कंटकभय, गभय, पापभय, मिथ्याद्रुष्टीभय, दर्जनभय, उन्मत हत्ती, हरिण, बैल कुत्रा, सर्प, विंचू, वाघ, तरस, डुक्कर, रेडा, यक्ष इत्यादि भयांपासून, नाना प्रकारच्या रोगापासून, नाना प्रकारच्या उपद्रवापासून सर्वांचे रक्षण होवोत.||६||
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत