माननीय राष्ट्रपती भारत सरकार

यांना बिहार सरकारचा महाबोधी महाविहार विसंगत कायदा १९४९ कलम १७ चां विरुद्ध मा.मुख्यमंत्री श्री.नितीशकुमार बिहार सरकार,
मुख्य सचिव श्री. अमृतलाल मिना मंत्रालय बिहार
त्यागराजन एस.एम. जिल्हाधिकारी गया
, व इतर महंत व पुजारी यांचा विरुद्ध गंभीर तक्रार
महाबोधी महाविहार बुद्धगया येथील बुद्धाच्या मूर्तीचे विद्रुपीकरण केल्यामुळे,व करोडो बौद्ध बांधवांचा भावना दुखावल्या भारतीय संविधानातील अनुच्छेद १३,१४,१५,१७,२५-२८ चां भंग केल्याप्रकरणी गंभीर तक्रार दाखल करुन, अट्रासिटीचा कलमानुसार,व देशद्रोहाचा कलमानुसार फौजदारी कारवाई करावी अशी मागणी कायद्याचे विद्यार्थी तथा भारतीय संविधानाचे अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे वरोरा जिल्हा चंद्रपूर यांनी केली आहे
दीक्षाभूमी नागपूर अवैध उत्खनन महाघोटाळा उघडकीस आनुन काम बंद केल्यानंतर, चंद्रपूर दीक्षाभुमी महाघोटाळा उघडकीस आनुन फौजदारी कारवाई न्यायालयातुन केल्यानंतर आता महाबोधी महाविहार बुद्धगया मुक्त करण्यासाठी विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे यांच्या कायदेशीर संघर्ष सुरू
संपूर्ण भारतात भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आयु.भिमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या माध्यमातून आंदोलन, मोर्चा, निषेध, निवेदन, देऊन ३१दिवस होऊनही सरकारने तोडगा काढला नाही
बौद्ध देश विदेशातील अनेक बौद्ध भिक्खू सुद्धा आंदोलन करीत असुनही भारत सरकारने जानीवपुर्वक दुर्लक्ष करीत आहे
अखेर संघर्षी विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे यांनी माननीय राष्ट्रपती भारत सरकार यांना कायदेशीर मार्गाने गंभीर तक्रार केली आहे
जर सात दिवसांत फौजदारी कारवाई केली नाही तर कनिष्ठ न्यायालय जिल्हा न्यायालय उच्च न्यायालय व सुप्रीम न्यायालयातुन दाद मागणार
ज्याअर्थी भारतात संविधान दिनांक २६/जानेवारी/१९५० पासून लागू झाले आहे
भारतीय संविधानातील अनुच्छेद १३नुसार विसंगत कायदे सर्व नष्ट झाले आहे
त्यामुळे दिनांक ०६/जुलै/१९४९ चा महाबोधी महाविहार बद्दल बिहार सरकारचा कायदा कलम १७ मध्ये विसंगत कायदा आपोआप नष्ट झाला आहे
ज्याअर्थी हिंदू बांधवांचे राम मंदिर त्यांच्या ताब्यात आहे, बौद्ध भिक्खू तिथे पुजारी नाहीत,
मुस्लिम बांधवांच्या मस्जिद मुस्लिम बांधवांच्या ताब्यात आहे, बौद्ध भिक्खू पुजारी नाहीत
ख्रिस्ती बांधवांच्या चर्च मध्ये बौद्ध भिक्खू पुजारी नाहीत
शिख बांधवांचा गुरुद्वारा मध्ये बौद्ध भिक्खू पुजारी नाहीत
जैन बांधवांचा मंदिर मध्ये बौद्ध भिक्खू पुजारी नाहीत
त्याअर्थी फक्त महाबोधी महाविहार बुद्धगया येथेच तथागत गौतम बुद्ध यांच्या विहारात इतर हिंदू पुजारी कसे??????
चार हिंदू पुजारी, एक महंत हिंदू, व अध्यक्ष जिल्हाधिकारी ते सुद्धा हिंदू, सचिव मुख्यकार्यपालन अधिकारी ते सुद्धा हिंदू असे सात हिंदू व चार बौद्ध भिक्षू सदस्य हा कुठला कायदा?????
चार सदस्य असले तरी कोरम पुर्ण असा कायदा आहे, अध्यक्ष हिंदू, सचिव हिंदू, कोषाध्यक्ष हिंदू, आर्थिक व्यवहार हिंदू कडेच आहे मग चार बौद्ध सदस्य यांना अधिकार काय आहे,
हा तर काळा कायदा आहे
बौद्धगया मंदिर कायदा १९४९ शर्ती व अटी १ते५५पैकी अट क्रमांक २-३पहा
हा तर विसंगत अन्याय कारक कायदा आहे
पक्षपात करणे व भेदभाव करने हा दखलपात्र गुन्हा आहे भारतीय संविधानातील अनुच्छेद १४,१५,१७,नुसार
भारतीय संविधानातील अनुच्छेद २५-२८ नुसार प्रत्येक नागरिकाला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे त्यांनी आपल्या धर्माचा वापर करावा हरकत नाही
पन दुसऱ्याचा महाबोधी महाविहार बौद्ध विहार इतर धर्मांचा पुजारी कडे का???????
म्हणून माननीय राष्ट्रपती महोदय यांनी विशेष लक्ष देऊन फौजदारी कारवाई करावी व महाबोधी महाविहार मुक्त करून बौद्ध भिक्खू चां ताब्यात द्यावे
सर्व बौद्ध बांधवांनी संविधानीक मार्गाने संपूर्ण भारतात जन आंदोलन उभे करावे
फौजदारी तक्रार करन्याचे कारण
१) महाबोधी महाविहार बुद्धगया ही करोडो बौद्ध बांधवांची अस्मिता आहे
२) महाबोधी महाविहार हे जागतिक बौद्ध बांधवांची विरासत आहे
३) भारतीय संविधानातील अनुच्छेद १३,१४,१५,१७,२५-२८ चे उल्लंघन केले आहे
४) महाबोधी महाविहार बुद्धगया येथील बुद्धाच्या मूर्तीचे विद्रुपीकरण तेथील हिंदू पुजारी यांनी केले आहे
५)युनोस्को नुसार महाबोधी महाविहार बुद्धगया हे जगातील बौद्धांचे घरोहर आहे
६)सदर व्यवस्थापनाला महाबोधी महाविहार बुद्धगया मंदिर परिसरातील मोकळी जागा सांभाळण्यासाठी अपयश आले आहे
७) महाबोधी महाविहार बुद्धगया परिसरात १० फुटांवर गैर समाजाची मंदिर, मस्जिद, अतिक्रमण करीत असतांनाही महाबोधी महाविहार चे व्यवस्थापन यांनी हटविले नाही
हे सर्व महाविहार महाबोधी बुद्धगया हे हिंदूंच्या ताब्यात असल्यामुळे सर्व नियमबाह्य व बेकायदेशीर काम सुरू आहे
देश विदेशातील अनेक बौद्ध राष्ट्र मोठ्या प्रमाणात आर्थिक गुप्त देणगी देतात, तरीही ७५वर्षापासुन महाबोधी महाविहार बुद्धगया यांचा विकास शिर्डी, शेगाव, सुवर्ण मंदिर, बालाजी मंदिर प्रमाने झाला नाही
अखेर करोडो रुपयांची देणगी जाते कुठे यांची सखोल चौकशी करावी
८) माननीय राष्ट्रपती भारत सरकार, माननीय प्रधानमंत्री भारत सरकार व माननीय राज्यपाल बिहार सरकारने या विसंगत कायद्याबद्दल विचार करावे
एक लक्षात घ्या आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे मनमानीचे नाही
आपल्या देशात कायद्यापेक्षा कुनीही मोठा नाही,मग PM,CM,DM,DC,ADM,SDM,IAS, IPS, कुनीही असु द्या
महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी अनेक तालुक्यांत अनेक जिल्ह्यात , महाराष्ट्रात, भारतात,देश विदेशात, आंदोलन मोर्चा निषेध निवेदन देत आहेत, पण व्यवस्थापन विरुद्ध फौजदारी कारवाई कुनीही आजपर्यंत केली नाही,मी करत आहे आपनही करावे
संपूर्ण भारतात बौद्ध बांधवांनी फौजदारी खटले महाबोधी महाविहार बुद्धगया येथील गैर बौद्ध व्यवस्थापन विरुद्ध दाखल करावे
समाज बांधवांनी, वकिल मंडळी यांनी, संपूर्ण भारतात,व सर्व राज्यातील उच्च न्यायालय मध्ये रिट पीटीशन, क्रिमिनल रिट पीटिशन, जनहित याचिका दाखल करावे, व जन आंदोलन करावे धन्यवाद
जनहितार्थ जारी
समाजहितासाठी देशहितासाठी राष्ट्रबांधनीसाठी लोकशाही बळकट करण्यासाठी संविधान संरक्षणासाठी सर्व नागरिकांनी जागृत राहावे धन्यवाद
भारतीय बौद्ध महासभा तर्फे संपूर्ण भारतात महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी संविधानीक मार्गाने आंदोलन सुरू आहे,जन आंदोलन सुरू करावे,अभी नहीं तो कभी नहीं
दीक्षाभूमी नागपूर अवैध उत्खनन,महाघोटाळा उघडकीस आल्यानंतर व दीक्षाभुमी चंद्रपूर महाघोटाळा न्यायालयातुन चौकशी बसविल्यानंतर नंतर आता महाबोधी महाविहार बुद्धगया मुक्त करण्यासाठी विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे मैदानात उतरले आहे
हा म्यासेज जसा आहे तसाच संपूर्ण महाराष्ट्रातील व भारतातील बौद्ध बांधवा पर्यंत पोहचावे
अपीलार्थी
जनप्रतिनिधी संघर्षी विनोदकुमार खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा भारतीय संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक तथा प्रकल्पग्रस्त शेतकरी तथा RTI कार्यकर्ते वरोरा जिल्हा चंद्रपूर
९८५०३८२४२६
८३२९४२३२६१
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत