तथागतांच्या प्रवचनातील प्रश्न आणि उत्तरे

भगवान बुद्धांची विचारधारा…..
तथागतांच्या प्रवचनातील प्रश्न आणि उत्तरे
प्रश्न: नदीचे उदाहरण आपण दिलेत. नदीचे पात्र हे पाण्याने भरलेले असते. कधी ते कधी ते गडूळ असते तर ते कधी निर्मळ असते; पण मनुष्याच्या जीवन सरितेचे काय? ती कुठल्या स्वरूपात गढूळ होते?
उत्तर: बौद्ध धम्म पाच स्कंद सांगितले आहेत. पहिला शारीरिक आणि बाकीचे चार मानसिक आहेत. यात काही प्रवृत्ती आशा आहे की, ज्या शारीरिकही नाहीत आणि मानसिकही नाहीत. हे पाच अशुद्ध स्कंध हेच पुढे संपूर्ण शुद्धतेत परिवर्तित होतात आणि पाच ‘ ध्यानी ‘ बुद्धांमध्ये त्यांचे प्रगटी करण होते.
प्रश्न: बौद्ध धम्मा वंदनेचे काय महत्त्व असते? बौद्ध धम्माचा वंदनेवर अथवा प्रार्थनेवर विश्वास आहे का? आणि जर असेल तर बौद्ध धम्म तर ईश्वराचे अस्तित्व माणिक नाही, हे लोक मग कोणाला प्रार्थना वंदना करतात?
उत्तर: बौद्ध धम्मात प्रार्थना किंवा वंदना म्हणजे एखादी इच्छा जी कुणाचे तरी, काहीतरी भले व्हावे असे इच्छा प्रगट करते. म्हणूनच इथे प्रार्थनेचा किंवा वंदनेचा अर्थ मौखिक इच्छा हा आहे. बुद्ध किंवा बोधिसत्व यांच्या प्रार्थना वंदना या मानसिक पातळीवर असल्याने त्यात असीम शक्ती असते. बुद्ध आणि बोधिसत्व यांच्या मनात सर्वच जीवमात्रांबद्दल करुणा आणि प्रेम असल्याने त्यांच्या प्रार्थना या समस्त जीवमात्राच्या कल्याणासाठी असतात. म्हणूनच आपण जेव्हा त्यांच्याकडे मदतीसाठी किंवा मार्गदर्शनासाठी प्रार्थना करतो, तेव्हा त्यांचा प्रभाव आपल्याला जाणवतो इतकी त्यांच्या त शक्ती असते.
त्याचप्रमाणे बुद्धांच्या प्रार्थनेद्वारे आपल्याला बुद्धत्वाचा परिणाम दिसून येतो. याचा अर्थ तुम्ही वैयक्तिकरित्या स्वतंत्रपणाने सराव करू नये, सारे बुद्धांवर सोडून द्यायचे आहे असे अजिबात नाही. काही गोष्टी आपण करायच्या, तर काही बुद्ध करतात. एखादा कपडा धुवावा तसे आपले वरचे अशुद्ध डाग बुद्ध स्वच्छ करून देतील असे नाही. दुःख आणि वेदनेचे मूळ पायात रुतलेल्या काटा जितक्या सहजपणे काढता येतो, तितक्या सहजपणे दूर करता येत नसते. भगवंत आपल्याला हा काटा कसा काढायचा ते सांगतात. काटा काढणारा हात केवळ आपलाच असतो.
त्याचप्रमाणे बुद्ध त्यांना मिळालेले ज्ञान आपल्यात रुजू शकत नाहीत ते फक्त एखाद्या वैद्याचे काम करतात,आणि जो आपल्याला जडलेल्या आजाराचे नेमके निदान करून त्यावर औषध उपचार योजना देतो; पण ते औषध सांगितल्याप्रमाणे घेण्याची जबाबदारी शेवटी आपलीच असते. वैद्याने सांगितल्याप्रमाणे जर रोगी औषध घेत नसेल तर तो दोष वैद्यचा नसतो. मग वैद्य कितीही कुशल असो आणि त्याने सांगितलेल्या औषध कितीही बरोबर असले तरी ही! जर आपण धम्माचे औषध नेमून दिल्याप्रमाणे घेत असून आणि भगवंतांचा सल्ला आचरणात आणू असून, तर आपण आपल्याला जडलेले अज्ञान व मोह हे रोग दूर होऊन मुक्तीच्या आणि सर्वज्ञतेच्या मार्गातले अडथळे दूर करत असतो. धम्माकडे वळायचे पण त्याचा सराव आपल्या जीवनात करायचा नाही हे तर केवळ असे झाले की, एखाद्या रोग्याजवळ पोटभर औषध औषधे आहेत; पण तो त्यांचे सेवनच करत नसेल तर काय उपयोग?
म्हणून बुद्ध म्हणतात
मी तुम्हाला औषध दिलेले आहे ते घ्यावयाचे का नाही हा तुमचा निर्णय आहे
अत दीप भव
भगवान बुद्धांचे विचारधारा
प्रसारित:- सुरेश भवर नाशिक
नमो बुद्धाय जय भीम सुप्रभात????????????????
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत