एकविसाव्या शतकातहीं कट्टरतेला खतपाणी

तुमच्याच नावाने काही पांढऱ्या शुभ्र कपड्यातील जाती धर्माचे दलाल पुरोगामीत्वाचा वारसा सांगून प्रत्येक निवडणुकीला मत मागतात आणि निवडूनहीं येतात परंतु तुमचा विषमतामुक्त महाराष्ट्राचा विचार हीं मंडळी सारासार विसरून या एकविसाव्या शतकातहीं कट्टरतेला खतपाणी घालतायत.
तूम्ही घालून दिलेले समताबद्ध लोकशाहीचे आदर्श विचार आजचे राजकारणी विसरून गेलेत. पुरोगामी महाराष्ट्रात आता पुरोगामीत्वाचा बुरखा पांघरून जात, धर्म कट्टरता अधिक दृढ केली जातीये. तरुण पिढीमध्ये जातीय अस्मितेचं विष कालवून राजकीय स्वार्थापोटी त्यांची भविष्य उध्वस्त केली जातायत.महिला सुरक्षेला फाट्यावर मारून इथं दिवसा ढवळ्या माता भगिनींवर अत्याचार केले जातायत, महापुरुषांबद्दल अवमानकारक बोललं जातंय आणि बोलणाऱ्याला शिक्षा तर सोडाच याउलट मात्र राजाश्रय दिला जातोय. शेतकऱ्यांच्या तोंडाला फसव्या गाजर घोषनांचा पाऊस पाडून पानं पुसली जातायत.त्यानं घामानं पिकवलेल्या शेतमालाला मात्र कवडीमोल भाव दिला जातोय,
महाराष्ट्रातले उद्योग धंदे इतर राज्यात नेऊन इथल्या तरुणांना बेरोजगारीच्या खायित लोटलं जातंय.
आरक्षण हें निमित्तमात्र आहे कारण या आरक्षणाच्या लढाई मागून जाती जातीत विषमतेची ठिणगी पाडून इथला सामाजिक सलोखा बिघडवला जातोय आणि हें सर्व तूम्ही घडविलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात घडतेय साहेब आणि विशेष म्हणजे हा महाराष्ट्र या दलबदलू राज्याकर्त्यांचा नंगानाच निमूटपणे सहन करतोय कारण यशवंत विचारांचा वारसा सांगणारा आणि जपणारा “यशवंत” पुन्हा या मातीत जन्माला येईल आणि तुमच्या विचारधारेतला पुरोगामी महाराष्ट्र घडेल अशी आशा बाळगतोय……
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व पुरोगामी विचारांचे द्रष्टे लोकनेते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री निसर्गवासी यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐🙏🏻💐
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत