देशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

83/2019″ आंबेडकरी विचारधारेचा समाजात प्रचार व प्रसार करणे यासाठी आपण आपला वेळ, बुद्धि, पैसा याचे दान करायला शिकले पाहिजे “


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे चळवळीचा बारकाईने अभ्यास केल्यास, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्ष
शेड्युल कास्ट फेडरेशन व त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशा राजकीय संस्था जन्माला घातल्या. पहिल्या दोन संस्था स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केल्या व रिपब्लिकन पार्टी ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाना नंतर 1957 ला स्थापन झाली डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वतः दोन दा निवडणुकीत उभे राहिले त्यामुळे राजकीय सत्ता किती महत्वाची आहें हे आपल्या लक्षात येईल. बौद्ध समाजाचे राजकारण का यशस्वी होत नाहीं ही चिंतनाची बाब आहें. यावर विचार करून मा. कांशीराम यांनी बामसेफ ही संस्था स्थापन करून देशभर तिचे जाळे निर्माण केले व बी. एस. पी. हा पक्ष उभा केला. या पक्षाने अनेक खासदार निवडून आणले. उत्तर प्रदेश मध्ये या पक्षाने स्वबळावर सत्ता स्थापन केली. सामाजिक कार्य करून राजकीय क्षेत्रात यशस्वी होता येते याचे हे चांगले उदाहरण आहें. परंतु सध्यास्थितीत ह्या पक्षाला फारसे यश आलेले दिसत नाहीं. याचे महत्वाचे कारण विचारधारे सोबत या पक्षाने केलेली तडजोड होय. आजमितीस आंबेडकरी विचारधारा लोकांमध्ये पसरविणे महत्वाचे आहें. आंबेडकरी विचारधारेला ब्राम्हणी वर्चस्व वादाने जातीच्या चौकटीत बंदिस्त करून केवळ महार व बौद्ध यापुरतेच मर्यादित करण्याचे षडयंत्र तयार करून त्या विरुद्ध धार्मिक उन्माद लोकांमध्ये पसरवून केवळ आत्मा, ईश्वर, स्वर्ग, नरक, पाताळ, पाप, पुण्य ह्या संकल्पना मांडून त्यातच बहुजन समाजाला गुंतवून ठेवले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राम्हणवादाचा पुरेपूर अभ्यास करून बहुजन समाजाला त्यांचे
मगरमिठीतुन सोडविण्यासाठी
तथागत भगवान बुद्धांचा धम्म दिला व धर्म नाकारला तथागत भगवान बुध्दानी 2800 वर्षांपूर्वी
वेद नाकारले, वैदिक व्यवस्था नाकारली, आत्मा, ईश्वर, नाकारला यज्ञ् संस्था नाकारली, यज्ञात दिले जाणाऱ्या आहुती,
स्वर्ग, नरक ह्या सर्वच गोष्टी नाकारल्या. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत भगवान बुद्धांचेच विचार स्वीकारलेत कारण व्यक्तीला प्रगती करण्याचे मार्गातील हे मोठे अडथळे होते
व्यक्तीची स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमताच या ब्राम्हणी विचाराने संपुष्टात आणली होती माणूस या व्यवस्थेच्या हातातील एक कळसूत्री बाहुली बनला होता. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या महान वैचारिक क्रांतीने बहुजन समाजात चेतना निर्माण झाली मीच माझ्या आयुष्याचा खरा शिल्पकार आहें ही शिकवण ग्रहण करून लोक अत्त दीप भव
व्हायला लागले स्वयं प्रकाशित
होण्यासाठी ही खूप मोठी संधी होती. परंतु पुन्हा ब्राम्हणी विचाराने डोके वर काढले व बुद्ध धम्मात सुद्धा त्यांनी पुजापाठ, कर्मकांड, बुवाबाजी, अंधश्रद्धा
पसरवून विप्पसना, ध्यान धारणा, याचे माध्यमातून लोकांना केवळ स्वयंकेंद्री बनविण्याला सुरुवात केली मोठं मोठी शिकलेली आय ए एस दर्जाची लोक यात अडकली आहेत. यातून समाजाला बाहेर काढले पाहिजे हे आव्हान खूप मोठे आहें.वास्तविकता बुद्ध धम्म हा केवळ आचरणाचा धम्म आहें
माणसा माणसातील उचित व्यव्हार ह्याला ह्या धम्मात अत्यंत महत्व आहें. ब्राम्हणी धर्म मात्र माणसा माणसातील अनुचित व्यव्हार शिकवितो. विषमता पाळतो व प्रस्थापित करतो. म्हणून जे बौद्ध आहेत ज्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला धम्म स्वीकारला आहें त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही तत्वे आचरणात आणली पाहिजेत.ब्राम्हणी व्यवस्थेने ग्रस्त लोक ही तत्वे मान्य करत नाहीत. त्यांना विषमता हवी आहें. त्यांनी ही मानवी मूल्य स्वीकारली तर त्यांना त्यांची सेवा चाकरी करायला कुणी मिळणार नाहीं. म्हणून सर्व सत्ता त्यांना त्यांचे ताब्यात ठेवायच्या आहेत. त्यासाठी सत्यत्याने ते प्रयत्नरत आहेत.हेच उदिष्ट ठरवून त्यांनी विषमता वादी विचारधारा लोकांमध्ये पसरविण्यासाठी देश, देव, धर्म, भाषा, प्रांत, रंग, लिंग यावरून माणसा माणसात द्वेष पसरविण्याचे त्यांचे सतत प्रयत्न सुरु असतात. आजचे सामाजिक आर्थिक, राजकीय, शैक्षणिक व
सांस्कृतिक चित्र आपल्याला दिसते हा त्यांच्या सातत्य पूर्ण प्रयत्नांचाच परिपाक आहें. चुकीच्या गोष्टीवरही किंवा तिच्या आधारे सुद्धा लोकांना संघटित करता येते. उदा. चोरांच्याही संघटना असतात. जे सत्य नाहीं ते सत्य आहें असे सांगून त्यांनी जगाला मूर्ख बनविले आहें.कारण ते म्हणतात ब्रह्म सत्य आहें जग हे मिथ्या आहें.
डॉ बाबासाहेब आंबेडकर याला बौद्धिक लटपट म्हणतात आपला शत्रू जर इतका चालख असेल तर आपण नेभळट राहून चालणार नाहीं.आपल्याला बदल करावा लागेल. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हा बदल घडवून आणण्याची जबाबदारी धम्म देऊन आपल्यावर सोपविली आहें. म्हणून आपले जीवन ध्येय
आपण ठरविले पाहिजे. समतेचा विचार धम्माचे माध्यमातूनच लोकांमध्ये पोचविणे शक्य आहें.
कारण धम्म सर्व विषमता वादी विचार नाकारतो. म्हणून सामाजिक एकता संघाचे धम्म आपल्या दारीं हे अभियान महत्वाचे साधन आहें. या साधनाचा वापर करून सदाचारी समाज निर्माण करण्यासाठी आपल्याला काम करावे लागेल. याची सुरुवात जे बौद्ध आहेत त्यांचे पासून सुरु करून धीरे धीरे
या विचारात समाजातील इतर घटकांना सुद्धा सहभागी करून घ्यावे लागेल. हे लॉन्ग टर्म ऑब्जेकटिव्ह आहें. यासाठी संयम फार महत्वाचा आहें. रिझल्ट मिळत नाहीं म्हणून निराश होऊन काम न करणारे लोक यासाठी अपात्र आहेत. रिझल्ट मिळो अथवा न मिळो
मी जे काम हाती घेतले जे बहुजन हिताय बहुजन सुखाय असे आहें. हे तथागत भगवान बुद्धच म्हणतात भगवान बुद्धांचा
भिक्कू संघ यासाठीच समर्पित आहें. आपणही त्यासाठी स्वतःच्या क्षमताचा वापर करून ही विचारधारा संपूर्ण बहुजन समाजात पसरविली पाहिजे. एकदा जर आपण ही विचारधारा पसरविण्यात यशस्वी झालो तर परिवर्तन शक्य आहें. बुद्ध काळात हे परिवर्तन एकदा झालं आहें. 98 व्या अखिल भारतीय
मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ तारा भावाळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बुद्ध विचार संपविता येत नाहीं म्हणून ब्राम्हणी व्यवस्थेने बुध्दाला विष्णुचा नववा अवतार म्हणून स्विकारल्याची स्पष्टॊक्ती केली आहें. त्यांच्या वक्तव्यातून बुद्ध विचार किती प्रभावी आहें हे त्यांनी सांगितले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तर स्वतः धम्म दिक्षा घेतली व आपल्या लाखो अनुयायांना सुद्धा दिली दि. 15/10/1956 च्या भाषणात त्यांनी ही जबाबदारी आपल्यावर सोपविली आहें. त्या जबाबदारीचे निर्वहन करण्यासाठी सामाजिक एकता संघाने पुढाकार घेतला आहें. ज्यांना हे कार्य योग्य आहें असे वाटत असेल त्यांनी सामाजिक एकता संघाचे सर्वसाधारण सदस्य, आजीवण सदस्य व्हावे सामाजिक एकता संघाच्या सामाजिक प्रकल्पासाठी ( बुद्धिस्ट सेमिनरी साठी ) प्लॉट खरेदी करण्यासाठी 1 स्केअर फूट, किमान जागा दान करावी
जास्तीत जास्त कितीही स्केअर फूट जागा आपण देऊ शकता. हा प्रकल्प उभा झाल्यास त्या प्रकल्पात किमान 1 फूट व जास्तीत जास्त कितीही फूट जागेचे मालक दान दाते असतील. कारण हा प्रकल्प समाजाला समर्पित असेल. दान दत्त्यांची नावे प्रकल्पाचे दर्शनी भागावर कोरली जातील. जो पर्यंत आपण आपल्या प्रचार व प्रसाराची यंत्रणा निर्माण करणार नाहीं तो पर्यंत आपण आपले ध्येय गाठू शकणार नाहीं. आपल्याला सामाजिक,आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, व सांस्कृतिक क्षेत्रात बदल घडवून आणायचा आहें. हे कार्य आपणास अशक्य वाटत असेल
परंतु आपण आपला वेळ, बुद्धि, पैसा यासाठी दिला तर हा बदल होऊ शकतो. इतिहास याला साक्षी आहें. म्हणून आपण आता सामाजिक एकता संघावर विश्वास ठेवला पाहिजे.नुकतीच या संघाची नवीन कार्यकारणी निवडली गेली. त्यासाठी अत्यन्त पारदर्शी पणे लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आयु सुरेशराव सोनोने साहेब विश्वशांती नगर अमरावती यांनी काम पहिले. पारदर्शी पद्धतीने काम करून आपले ध्येय गाठण्याचा संकल्प सामाजिक एकता संघाने केला आहें. या संकल्पा मध्ये सर्वांचा सहभाग महत्वाचा आहें. तेंव्हा समाजात आंबेडकरी विचारधारेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सर्वांनी सामाजिक एकता संघ अमरावती ला तन, मन, धनाने सहकार्य करावे अशी
विनंती आहें.
नमोबुध्दाय, जयभिम!
ए बी वरघट
अध्यक्ष
सामाजिक एकता संघ
अमरावती

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!