
बीड । प्रतिनिधी
क्रांतिकारी शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य ही सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये गेल्या एक दशकापासून उत्कृष्ट कामगिरी करत आहे संघटनेतर्फे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या सोडण्यात यश आले आहे तसेच गेल्या एक दशकापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक व प्राध्यापक यांना मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्काराने दरवर्षी सन्मानित केले आहे तसेच यावर्षीही अध्यापनामध्ये व शिक्षणाचा दर्जा गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी प्रयत्न करत असलेले आदर्श शिक्षक, प्राध्यापक यांना गौरविण्यासाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता नीलकमल हॉटेल नगर रोड बीड येथे खूप थाटात संपन्न झाला. या आदर्श शिक्षक सोहळ्यात महाराष्ट्रातील मराठी व उर्दू माध्यमाचे प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मेहनती व शैक्षणिक कार्यात उकृष्ट कामगिरी करणाऱ्या २२ शिक्षक,मुख्याध्यापक यांना गौरविण्यात आले. यावेळी श्री शाहिद कादरी सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात खूप महत्वाचे मुद्दे उचलले.
१.राज्यातील प्रत्येक शाळेला ५ दिवसीय आठवडा करून शनिवार रविवार सुट्टी जाहीर करावी.
२.शासकीय कार्यालयाचे वेळे नंतर एकही कर्मचारी कार्यालयात थांबू नये याचा नियम झाला पाहिजे.
३. १२ व २४ वर्षाचे ग्रेड प्रत्येक शिक्षकाला मिळाले पाहिजे.
४. प्रत्येक शिक्षकाला आरोग्य कार्ड प्रदान केले पाहिजे.
५.पी एच डी व एम फाईल धारक शिक्षकांना अगाव वेतन वाढ देण्यात यावे.
६. समग्र शिक्षा अभियान अंतर्गत विषय साधनव्यक्ती यांना त्यांचे सेवेत कायम करावे व गरजू कर्मचाऱ्यांचे आंतरजिल्हा बदली करण्यात यावी. पगारवाढ करण्यात यावी
७.शिक्षकांना अशैक्षणिक कामापासून मुक्त करून पूर्ण वेळ वर्गात अध्यापन करण्याची संधी द्यावी.
८.शिक्षकांना जुनी पेन्शन योजना, पगार वाढ.
सदरील कार्यक्रमात पुरस्कार सोहळ्यात अनेक मान्यवरांनी शिक्षण व शिक्षकांविषयी आपापले मत मांडले.
या सोहळ्यात कर्मचारी, अधिकारी यांनी आपापली बाजू मांडली. या कार्यक्रमाचे उद्घाटक मा आमदार अमरसिंह पंडित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर नरेंद्र काळे, फारुख पटेल व इतर उपस्थित होते, शाहीद कादरी यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाचे शेवटी खान असरार सर यांनी सर्व उपस्थितींचे आभार मानले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत