संत शिरोमणी गुरु रविदास जी महाराज लेख शृंखला – १३

गुरू रविदास जयंती निमित्त पुष्प 13 वे..
संत रविदासजीने मनूवेदातील ब्राम्हण मुखातून,छत्रिय बाहूतून,वैश्य मांडीतून, शूद्र पायातून उत्पन्न झालेली जन्माआधारीत धर्म व राज्य मान्य चातुर्वर्ण्य सिद्धांत प्राचीन भारतात प्रचलित होता.त्या सिद्धांताला नुसतं आव्हानच दिले नाही तर चातुर्वरणाविरोधी आपल्या तर्कशुद्ध व विज्ञानवादी कृतिशील विचाराने एक प्रभावी धगधगती चळवळ उभी केली.. .हा धार्मिक,सामाजिक राजकिय सांस्कृतिक परिवर्तनाचा विद्रोह होता.ज्या विद्रोहाची शिक्षा मृत्यूदंड होता…ज्या सिद्धांताच्या विरोधात संत, महंत,राजे महाराजे लढू शकले नाहीत तिथे , गुरू रविदासजी निधड्या छातीने आणि निर्मळ मनाने सत्यासाठी अहिंसेने लढले आणि जिंकले…! ज्या शाळेत मंदिरात शुद्रांना बंदी होती त्या शाळेवर मंदिरावरच त्यांनी बहिष्कार टाकून मनमंदीर उघडली .बहुजनांना दशरथ पुत्र रामाच्या ऐवजी आत्मरंगी श्रीरंगाचे दर्शन घडविले. कामातला राम सांगितला उलगडून दाखवला .. .आपल्या अमृत वाणीत ते म्हणतात.
रविदास जन्म के कारनै ,होत न कोउ नीच!
नर ळूं नीच करि डारि है ,ओछे करम कौ कीच!!
जन्म कारणाने कोणी उच्च नीच नसतो.तो कर्माने उच्च निच असतो.
रविदास सुकरमन करन सौ,नीच उच हो जाय!
करइ कुकरम जौ उंच भी,तौ महा नीच कहलाय!!
कुठल्याही उच्च वर्णियाच्या पोटी जन्मलेल्याने जर नीच कर्म केले तर तो उच्च नीच होतो .नीच कुळात जन्मलेल्या शुद्राने जर सुकर्म केले तर तो उच्च ठरतो हा सत्यवर्ण आहे.चातुर्वर्ण्य मनूवाद खोटा आहे…! नराचा होणारा नारायण हा जातीवर नाहीतर कर्मावर आधारीत आहे.हे नारायणाच्या मुखावर माथा न टेकवता चरणांवर टेकून दर्शन घेणाऱ्या धर्म भास्करांना ठणकावून सांगितले..
रविदास सुकरमन करन सौ ,नीच ऊच हो जाय!
करइ कुकरम जौ उंच भी ,तौ महा नीच कहलाय!!
कुठल्याही जातीत जन्मलेला माणूस जो माणसे जोडत नाही .जो माणुसकी जाणत नाही तो महानीच महापातकी असतो. आणि जो विकारापासून मुक्त आहे तो उंच आहे…गूरू रविदासजींचे हे विचार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर साहेबानी भारतीय संविधानात अंतर्भूत करुन कायद्याने जाती संपवल्या आहेत. रविदासजीचे समतावादी तत्त्वे अमलात आणली आहेत…
जयभीम..जय रविदास..!
*लेखकॲड.आनंद गवळी .
राष्ट्रीय उपाध्यक्ष.
राष्ट्रीय चर्मकार महासंघ
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत