२६ जानेवारी १९५० मध्ये कोणीही शहिद झाले नाही उगाच त्यादिवशी शहिदांचे गाणे लावू नये

२६ जानेवारी १९५० मध्ये कोणीही शहिद झाले नाही उगाच त्यादिवशी शहिदांचे गाणे लावू नये संविधानाचे स्मरण झाले पाहिजे
इथल्या व्यवस्थेने आम्हाला २६ जानेवारी आहे तेवढंच सांगितल पण,२६ जानेवारी का साजरी केली जाते आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर कधीच आम्हाला आणि आजच्या पिढीला कळू दिले नाहीत.
ज्यांनी संविधान लिहिले त्यांचे स्मरण प्रजासत्ताक दिनी या देशाला झालेच पाहिजे,त्यांना संपूर्ण देशाने वंदन आणि अभिवादन केलेच पाहिजे,परंतु तसे
होतांना दिसत नाही. प्रजासत्ताक दिनी जो संविधानाला मान, तोच मान संविधान निर्मात्याला,जन्मदात्याला,घटनेच्या शिल्पकाराला दिलाच पाहिजे. म्हणून भारतातील प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक राजकीय पक्षांनी व नेत्यांनी, प्रत्येक संस्था-संघटनांनी, शाळा कॉलेजांनी आणी मंडळांनी संविधानाच्या शिल्पकाराला, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदराने आणि अभिमानाने अभिवादन केलेच पाहिजे. जेथे-जेथे राष्ट्राध्वजारोहण करून प्रजासत्ताकदिन साजरा केला जातो तेथे तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस वंदन करून प्रजासत्ताक
दिन साजरा करण्यात यावा. आज पर्यंत तसे कोणी केले नसेल. आता पासून आपण करूया..
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांस वंदन करूनच जे लोकांच्या सेवेसाठी अहोरात्र काम करत असणाऱ्यांना संविधान देऊन साजरी केली पाहिजे.
-एक भारतीय 🇮🇳
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत