
✍️प्रा.प्रशांत तुळशीदास खैरे गडचांदूर जि चंद्रपूर
शाळेतील घंटीचा निनाद मंदावला मंदिरातील घंट्यांचा गजर वाढला शिक्षणाकडे निघालेला कारवा देशाचा अंधभक्तीत बुडवीत आहे धर्मजीवी शासक केव्हा बनशील रे बहुजना सत्यशोधक फक्त पोटभरूसाठी ही रोजगार योजना उपाशी आहे पोट तुझे,तुला कसे कळेना नेमणार का ब्राम्हणेत्तर पुजारी तिथे ?विचाराना प्रश्न जरी असला खोचक केव्हा बनशील रे बहुजना सत्यशोधक मान्य,तुम्हाला रामराज्य आणायचं हाय पण मणिपूरच्या सीतेवरील अत्याचाराचं काय जातीवादी आगीत पेटवल्या जातात वस्त्या कापले जातात आजही आदिवासी,दलित शंबुककेव्हा बनशील रे बहुजना सत्यशोधक स्वातंत्र्य,समता,बंधुतेची झाली दानादान जिवंत आहे लोकशाही होतो का तिचा सन्मान?देशद्रोह्यांच्या हातात राजदंड, कैदेत न्याय झाले संविधान बंधक,आहे गुलामीचे द्योतककेव्हा बनशील रे बहुजना सत्यशोधक फुल्यांनी सांगितलेले आठवा”ब्राह्मणांचे कसब””शूद्र पूर्वी कोण होते”? स्मरा बाबासाहेब शाहूंचे कल्याणकारी होते चरित्र पुस्तक तुझ्याचसाठी महामानवांचा संघर्ष वेदनादायक केव्हा बनशील रे बहुजना सत्यशोधक
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत