
मोहन यादव यांची मुख्यमंत्रीपदी निवड. मध्य प्रदेशचा तिढा सुटला, मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवलेल्या भाजपने अखेर मुख्यमंत्रिपदाचा प्रश्न सोडवला आहे. शिवराजसिंह चौहान यांच्याऐवजी भाजपने नवा चेहरा मुख्यमंत्रिपदी दिला आहे. मोहन यादव आता मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री असतील. शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात मोहन यादव यांनी काम केलं आहे. भाजपच्या विधीमंडळ गटनेता ठरवण्यासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवराजसिंह चौहान यांनीच मोहन यादव यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. 3 डिसेंबर 2023 रोजी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला होता. त्यानंतर आठ दिवसानंतर मोहन यादव यांच्या नावावर शिक्काबोर्तब करण्यात आलेय. मोहन यादव उज्जैन दक्षिणमधून तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. 2020 ते 2023 यादरम्यान मोहन यादव यांनी शिक्षण मंत्री म्हणून काम पाहिलेय. मोहन यादव यांची मुख्यमंत्रीपदी निवड करत भाजपने देशभरातील लोकांना चकीत केलेय.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत