महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणसामाजिक / सांस्कृतिक

मानवी हक्कांचा संग्राम, महाड सत्याग्रह


अशोक तुळशीराम भवरे सिडको, नांदेड.
जनावरांना पाणी पिण्याचा हक्क होता,त्यांच पाण्यात या जनावरांनी मुत्र विसर्जन, विष्ठा केली तरी पाणी अशुद्ध होत नाही, परंतु माणसा सारखे माणसं असून सुद्धा शुद्रांना तो हक्क नव्हता, किती लाजीरवाणी गोष्ट होती.
वर्षानुवर्षे गुलामगिरीची सवय झालेल्या या मुर्दाड समाजाला कान असून ऐकण्याचा, तोंड असून बोलण्याचा, डोळे असून बघण्याचा हक्क ज्या समाजाला नव्हता,त्या समाजाला आपल्या एका कृतीने ते सर्व हक्क प्राप्त करून देणारा महासंग्राम म्हणजे महाड सत्याग्रह होय.
अगदी लहानपणापासूनच त्याला दिसून आलं की केवळ शुद्र, अस्पृश्यतेच्या कारणांमुळे पाण्यासाठी तडफडावं लागतं, तहानेने व्याकूळ व्हावे लागते असे,केवळ अस्पृश्य असल्यामुळे वर्गाबाहेर बसावं लागत असे, प्यायला पाणी मिळत नव्हते तेव्हा त्यांच्या लक्षात आले की पाणी वापरण्याचा, पाणी पिण्याचा मूलभूत हक्कही नाकारल्या जात आहे आणि तेही फक्त अस्पृश्य आहे म्हणून?
आणि त्यांच्या लक्षात आले की, यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल, म्हणूनच मानवी मुक्तीचा महान योध्दा युगप्रवर्तक विश्वरत्न बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक हक्कांसाठी पहिला सत्याग्रह केला तो मुक्तीसंग्राम म्हणजे महाडचा पाण्यासाठीचा मुक्तीसंग्राम होय.
अहिंसा म्हटले की बुद्धाची आठवण होणे स्वाभाविक आहे, परंतु बुद्धाच्या नावाने बाहेरच्या देशात भीक मागणारे सरकार मात्र भारतात रामाचा जयजयकार करताना दिसून येतो, आधुनिक भारतात अहिंसा म्हणजे गांधी सांगणा-या लोकांच्या डोळ्यांवर झापड पाडलेली दिसून येते. जगाच्या इतिहासात पाण्यासाठी,मानव मुक्ती साठी जो रणसंग्राम सर्व प्रथम केला तेव्हा कोठेही या रणसंग्रामात हिंसेचे समर्थन केले गेले नाही.हा संग्राम अहिंसेच्या मार्गाने, तत्वाने जिंकून दाखवून दिला म्हणून युगप्रवर्तक विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे अहिंसेचे महानायक ठरतात.
डॉ. बाबासाहेब तळ्यात उतरून ओंजळीत पाणी घेतले आणि सर्वांकडे पाहीले आणि प्राशन केले आणि एक अद्भुत इतिहास रचला गेला,हा इतिहास मानवी मुक्तीसंग्रामाचा लढा म्हणून जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे, महाडचा हा रणसंग्राम, चवदार तळे जागतिक इतिहासातील अजरामर प्रसंग म्हणून नोंद झाली आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेला हा रणसंग्राम अजूनही संपलेला नाही , आजही स्पृश्य अस्पृश्य भेदभाव संपलेला नाही, जयंती का साजरी केली म्हणून अक्षय भालेराव यांसारखे अनेक तरुण बळी पडत आहेत, अजूनही समता प्रस्थापित झाली नाही म्हणून खैरलांजी सारख्या घटना अनेक ठिकाणी होताना दिसून येतात.
महाडचा रणसंग्राम हा मानवाच्या मूलभूत हक्कासाठी होता,ते सर्व मूलभूत हक्क डा. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला मिळवून दिले असले तरी अजूनही अपेक्षित समता प्रस्थापित झाली नाही, भेदभाव, बलात्कार, अत्याचाराच्या घटना वारंवार घडताना दिसून येत आहेत.
म्हणूनच आज आपल्याकडे एकच मागणं आहे की महाडचा पाण्यासाठीचा मुक्तीसंग्राम साजरा करीत असताना तसेच त्यांची जयंती साजरी करताना जत्रेचे,हौसेचं स्वरूप आणू नका. त्यांचें विचार डोक्यात घेऊन अनुकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत, व्यसनाधीनता सोडून, आपण आर्थिक दृष्ट्या सक्षम कसे होणार? राजकीय सत्तेची चावी कोणाची गुलामगिरी न पत्करता स्वाभिमानाने कसे प्राप्त करता येईल?याचा विचार करावा.
जयंती सुद्धा जोशात साजरी करत असताना बेहोश पणा काय कामाचा? मानवी हक्क प्राप्त करून घेण्यासाठी चांगले शिकावं लागतं. शील, चारित्र्य याची जपूनक करावी लागते, संघटनात्मक बांधणी करुन एकत्रितपणे लढा दिला तरच आपल्या वरील अन्याय, अत्याचार कमी होतील आणि तेव्हाच महाडचा पाण्यासाठीचा मुक्तीसंग्राम असेल किंवा जयंती असेल ते साजरे करण्याचे समाधान लाभेल….?
अशोक तुळशीराम भवरे
संविधान प्रचारक/प्रसारक व व्याखाते सिडको, नांदेड.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!