कन्नोज येथील सातव्या शतकातील कुंभमेळा बुद्धिस्ट राजा हर्षवर्धन आयोजित करीत होता.

दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी प्रयागराज येथे कुंभ मेळ्याचा आरंभ झालेला आहे. त्यानिमित्ताने हा प्रासंगिक लेख देत आहे.
व्हेनसॉंग हा चिनी प्रवासी भारतामध्ये सन 629 ते 645 या कालावधीमध्ये तो भारतात भ्रमण करत होता. बुद्धिस्टांचे विश्वविद्यालय नालंदा येथे त्याने सहा वर्ष शिक्षण घेतले होते. हा प्रवासी कान्यकुब्ज आजचे नाव कन्नोज येथे आला त्यावेळी त्याने जे पाहिले ते आज पुस्तक स्वरूपामध्ये उपलब्ध आहे.
व्हेनसॉंग लिहितो –
” या राज्याचे क्षेत्रफळ 4000 लि आहे राजधानीच्या पश्चिमे कडे गंगा नदी आहे. याची लांबी 20 ली आणि रुंदी 4 किंवा 5 लि इतकी आहे (1ली म्हणजे 5 ते 6 किलो मीटर). येथे शेकडो संघाराम आहेत त्यामध्ये दहा हजार भिक्खु दोन्हीही हीनयान आणि महायान पंथाचे निवास करीत आहे.
या राज्याचा राजा बुद्धिस्ट होता त्याचे नाव प्रभाकर वर्धन होते शत्रू पक्षाकडून हत्या करण्यात आली. त्याचा मोठा मुलगा राज्यवर्धन हा राजा झाला परंतु त्याची सुद्धा हत्या करण्यात आली. त्यानंतर हर्षवर्धन हा राजा झाला. या हर्षवर्धन राजालाच शिलादित्य म्हटले जाते. तो स्वतःला कधीही राजा म्हणत नसे तर तो राजकुमारच स्वतःला म्हणून घेत होता आणि त्याने स्वतःचे उपनाव शिला आदित्य ठेवले होते. (शिलादित्य म्हणजे जो तथागत भगवान गौतम बुद्धाच्या पंचशील याचे पालन करतो तो शिलादित्य होय.)
काही दिवसानंतर त्यांनी आपल्या मंत्र्यांना म्हटले,”माझ्या भावाच्या शत्रूंना आतापर्यंत ही दंड मिळालेला नाही आणि त्यांचे राज्य मी अद्यापही जिंकलेले नाही. जोपर्यंत मी हे कार्य करत नाही तोपर्यंत मी उजव्या हाताने भोजन करणार नाही. याच कारणामुळे आम्ही सर्व प्रजा आणि दरबारी लोकांना एक दिलाने संघटित करण्याचे कार्य करा आणि आपल्या शक्तीचे प्रदर्शन करा”
अशाप्रकारे 5000 हत्ती, 20,000 घोडसवार,50,000 पैदल सैन्य सोबत घेऊन राजकुमाराने पूर्वेपासून तर पश्चिमेपर्यंतच्या सर्व द्रोहींना पराभूत करून त्यांचे राज्य आपल्या राज्यात सामील केले. हे सर्वात कठीण कार्य त्याने सहा वर्षांमध्ये करून समस्त भारतावर राज्य प्रस्थापित केले अशा प्रकारे त्याच्या राज्याचा प्रचंड विस्तार झाला.
तीस वर्षानंतर त्याने शस्त्र निर्माण करण्याचे कार्य सोडून दिले आणि शांततेने सर्वत्र शासन करू लागला. सदाचाराच्या नियमाचे कठोरतेने पालन करीत त्याने धम्माचे रोपटे लावून त्याला विशाल वृक्षांमध्ये परिवर्तित केले. तो इतका या कामांमध्ये व्यस्त झाला होता की त्याचे खाण्यापिण्यावर देखील दुर्लक्ष होत होते.
त्याने आदेश दिला की समस्त भारतामध्ये कुठेही जीव हिंसा केल्या जाऊ नये, आणि कोणत्याही व्यक्तीने मास भक्षण करू नये. नाहीतर प्राणदंड दिल्या जाईल. हे कार्य करणाऱ्या गुन्हेगाराला कधीही क्षमा केली जाणार नाही.
त्याने गंगा नदीच्या काठावर कित्येक हजार स्तूप शंभर शंभर फूट उंचीचे निर्माण केले. त्यामध्ये खाण्यापिण्याची सर्व सामग्री उपलब्ध होती. तेथे वैद्य लोक औषधी सहित नेहमी तयार राहात होते, त्यामुळे ते येणाऱ्या प्रवाशांच्या, यात्रेकरूंच्या दुःखी गरीब नातेवाईक व्यक्तींना कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण न होता त्यांचा इलाज केल्या जात होता. सर्व स्थानावर जिथे जिथे बुद्ध भगवान यांचे जे काही चिन्ह होते त्या जागी त्याने बुद्ध विहार बांधले.
प्रत्येक पाचव्या वर्षी तो ‘ विमुक्ती ‘ (कुंभ चा मेळा ) या नावाने एक खूप मोठा मेळा आयोजित करत होता. ज्यामध्ये तो आपला सर्व खजिना दान करत होता. सैन्याचे शस्त्र शिल्लक राहत होते, ज्यांना दान करणे कोणत्याही प्रकारे योग्य नव्हते आणि ते शस्त्र दान करून काही उपयोग नव्हता कारण त्या शस्त्राची भिक्खूंना गरजच नव्हती.
एक वर्षी तो आपल्या राज्यातील सर्व श्रमनांना तो गोळा करून त्यांना तिसऱ्या किंवा सातव्या दिवशी सर्वांना चार प्रकारच्या (अन्न, पाणी ,औषधी आणि वस्त्र) वस्तू दान करीत होता.
त्याने कित्येक धम्माच्या सिंहासनांना सोन्याने मळवून टाकले होते. अनेक उपदेश आसनाला रत्नजडित केले होते. त्याने भिक्खूंना वादविवाद (Debate) करण्याची आज्ञा देऊन ठेवली होती आणि त्यांच्या अनेक सिद्धांतावर स्वतः विचार करत होता की कोणता सिद्धांत उपयोगाचा आहे आणि कोणता सिद्धांत निरुपयोगी आहे.
भिक्खूनां दान, दृष्टांना दंड, दृष्टांचा अनादर आणि विद्वानांचा आदर करण्यासाठी तो सर्व प्रकारे तयार रहात होता. जर एखादा भिक्खू सदाचाराच्या नियमानुसार आचरण करून धम्माच्या संदर्भामध्ये विशेष प्रसिद्धी प्राप्त करत होता तेव्हा त्याला मोठ्या सन्मानाने सिंहासनावर बसवून त्याच्या धार्मिक उपदेश ग्रहण करीत होता.
अशाप्रकारे सातव्या शतकामध्ये बुद्धिस्ट राजा कुंभमेळा आयोजित करीत होता. यावरून सिद्ध होते की कुंभमेळा ही परंपरा बुद्धिस्टांची आहे. भोवादी आणि भ्रमवादी लोकांनी या कुंभ मेळ्याचे विकृतीकरण केलेले आहे.”
(संदर्भ: चिनी बौद्ध यात्री व्हेनसॉंग की भारत यात्रा, पृ. क्र.175,176)
सनातनी बुद्धिस्ट गंगाधर नाखले
13/01/2025
7972722081
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत