‘ सूर्यप्रभा ‘ माईंची जयंती; शनिवारी कल्याणला परिसंवाद

मुंबई: ( २३ जानेवारी)- भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुविद्य पत्नी डॉ. माईसाहेब आंबेडकर यांची वी जयंती येत्या शनिवारी २७ जानेवारी रोजी राज्यात साजरी होणार आहे. त्यानिमित्ताने ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांच्या माईंवरील ग्रंथाला मुंबई मराठी पत्रकार संघाचा जयहिंद प्रकाशन पुरस्कार मिळाल्याबद्दल
‘ सूर्यप्रभा माई ‘ या विषयावर एक परिसंवाद कल्याण ( पश्चिम) येथे पार पडणार आहे.
संध्याकाळी ४ वाजता शिवाजी चौक येथील सार्वजनिक वाचनालय सभागृहात संविधान समर्थक दलातर्फे हा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.
ज्येष्ठ पँथर – रिपब्लिकन नेते श्यामदादा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील या परिसंवादात प्रख्यात कवी अरुण म्हात्रे, स्तंभलेखक प्रा. अविनाश कोल्हे, प्रा. डॉ. विठ्ठल शिंदे, प्राचार्य डॉ. मिलिंद तायडे, प्रभाकर ओव्हाळ हे विचारवंत वक्ते आहेत, अशी माहिती प्रख्यात संशोधक विजय सुरवाडे आणि संविधान समर्थक दलाचे सरचिटणीस सतीश डोंगरे यांनी एका पत्रकात दिली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत