सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार किल्लारी नगरीत चौथी विशाल बौद्ध धम्म परिषद

किल्लारी नगरीत बौद्ध धम्म परिषदेची जय्यत तयारी सुरू
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
तक्षशिला बुद्ध विहार तथागत बुद्ध गार्डन ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे किल्लारी पूज्य भदंत धम्मसार थेरो यांच्या संयोजनातून रविवार दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ः ०० वाजे पर्यंत चौथ्या विशाल बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे या धम्म परिषदेला मुख्य अतिथी म्हणून महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन सेना हे उपस्थित राहणार आहेत. या धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थान पूज्य भदंत डॉ उपगुप्त महाथेरो कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिकू संघ बुद्धगया यांच्या समवेत अनेक पुज्य भन्तेच्या उपस्थितीत धम्म परिषद संपन्न होणार आहे .
बौध्व धम्म परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून औसा विधान सभेचे आमदार अभिमन्यू पवार रिपब्लिकन सेनेचे प्रदेश अध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुरावजी पोटभरे, रिपब्लिकन सेनेचे प्रदेश सचिव प्रा युवराज धसवडीकर, रिपब्लिकन सेनेचे प्रवक्ते समाजभूषण वसंतराव कांबळे मुंबई, सेवानिवृत्त विक्रीकर उपायुक्त मुंबई आयुष्यमान रमेश चक्रे रेणापूरकर, व विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या धम्म परिषदेचे स्वागताध्यक्ष किल्लारी ग्रामपंचायतचे उपसरपंच युवराज गायकवाड हे असणार आहेत या धम्म परिषदेत उपस्थित राहणाऱ्या उपासक व उपसिकाना भोजन व्यवस्थापन किल्लारी गावातील सामाजिक कार्यकर्ते शौकत भाई शेख यांनी केली आहे .
बौध्द धम्म परिषदेत सुमित गायकवाड प्रस्तुत बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम गायिका सुनिता ताई गायकवाड व प्रज्ञाताई गायकवाड सादर करणार आसुन या धम्म परिषदेत किल्लारी परिसरातील श्रद्धा संपन्न बौद्ध उपासक आणि उपासिकानी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन या धम्म परिषदेचे मुख्य संयोजक पूज्य भदंत धम्मसार थेरो यांनी केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत