देशदेश-विदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

जातीयवादी बौद्ध?

तो : हे बौद्ध लोक खूपच जातीवादी असतात राव !
मी : कसं काय रे ?

तो : तूच बघ ना यार ! किती तो जातीवाद असतो त्यांचा ?

मी : का ? त्यांनी तुमच्या वेगळ्या वस्त्या बसवल्या का ?
तो : नाही , रे !

मी : मंदिरात तुम्ही पाय ठेवला म्हणून त्यांनी तुम्हाला हाणलं काय कधी ?
तो : नाही , रे !

मी : त्यांनी तुमच्या मंदिराच्या जागेवर अतिक्रमण करुन विहार बांधलेत का ?
तो : नाही , रे !

मी : त्यांनी तुमच्या हाडवळी हडपल्या का गावाकडच्या ?
तो : नाही , रे !

मी : मग त्यांना तुमच्या शेतजमिनी हडपल्यात का ?
तो : नाही , रे !

मी : त्यांनी तुमची धार्मिक रिंगटोन वाजली म्हणून हाणलंय का तुम्हाला ?
तो : नाही , रे !

मी : सार्वजनिक पाणवठ्यावर तुमच्या बायांनी पाणी भरलं तर मारलं का त्यांनी ?
तो : नाही , रे !

मी : तुमच्या मिरवणुकीवर दगड फेक केली का त्यांनी कधी ?
तो : नाही , रे !

मी : त्यांनी माजावर येऊन टोळीटोळीने हल्ले केले का तुमच्या वस्तीवर ?
तो : नाही , रे !

मी : ते त्या छिंदम सारख्या शिव्या घालतात का तुमच्या महापुरुषावर ?
तो : नाही , रे !

मी : ती खोले बाई वागली तशी हे लोक वागतात का तुमच्याशी ?
तो : नाही , रे !

मी : ते तुमच्या आरक्षणाच्या, समान संधीच्या विरोधात आंदोलन चालवतात का ?
तो : नाही , रे !

मी : शिक्षणसंस्था ताब्यात घेऊन शिक्षणाचा धंदा बाजारीकरण करतात का रे , ते ?
तो : नाही , रे !

मी : पुरंदरे सारखं अभ्यासात विकृती पेरतात का हे ?
तो : नाही , रे !

मी : त्यांनी कारखानदार बनून तुमचं शोषण केलं का , रे ?
तो : नाही , रे !

मी : शेतकऱ्याला व्यापारी बनवून ते तुडवतात का , रे ?
तो : नाही , रे !

मी : त्यांनी तुमच्या अन्यायाच्या केसेस पोलीसाकरवी अडवल्यात का , रे ?
तो : नाही , रे !

मी : त्यांनी तुमच्या पुर्वजांच्या जल जमीन जंगलची मालकी हिसकावली का , रे ?
तो : नाही , रे !

मी : त्यांचे पत्रकार तुमच्या जातीला, प्रश्नाला, समस्येला मिडियात टार्गेट करुन आयसोलेट करतात का , रे ?
तो : नाही , रे !

मी : तुमच्या शेतकरी बांधवाचा शासकीय फंड ते मागासवर्गीय विकासासाठी वळवतात का , रे ?
तो : नाही , रे !

मी : घरावर तुमचा झेंडा लावला म्हणून त्यांनी तुमच्यावर हल्ला केला का , रे ?
तो : नाही , रे !

मी : विद्यापीठाच्या महापुरूषाच्या नावाला विरोध करुन त्यांनी तुमच्यावर हल्ले केले का , रे ?
तो : नाही , रे !

मी : गावातल्या सरंपचापासुन, नगराध्यक्ष, महापौर, पोलिस यंत्रणा, मिडियात, शासनात थेट येथून तिथून तुमचेच लोकं असताना , हे लोक खरंच तुमच्यावर अन्याय करु शकतात का , रे ?
तो : नाही , रे !

मी : आंतरजातीय प्रेम प्रकरणात त्यांनी तुमचं हत्याकांड केलं का , रे ?
तो : बिलकुल नाही !

मी : मग ते जातीवादी आहे हा आरोप कशाच्या आधारावर ?
तो : अरे , तसं नाही ! पण एखादं दलित/ बौद्ध हत्याकांड झालं तर न्याय मागणीसाठी किती ओरडतात ही लोकं ? हे मला बिलकुल सहन नाही होत !!
——— राहुल पगारे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!