
युरोपीय महासंघाने घातलेल्या अटीची पूर्तता करत ‘अॅपल’ने नव्या आयफोनमध्ये ‘सी-टाइप’ पद्धतीच्या चार्जिगचा अंतर्भाव केला आहे. त्यामुळे आता अँड्रॉइड आणि आयफोनमधील एक मोठा भेद संपुष्टात आला असून कोणत्याही ‘सी टाइप चार्जिग केबल’ने आयफोनसह अॅपलची अन्य उत्पादने चार्ज करणे शक्य होणार आहे. भारतामध्ये सुरूवातीला आयफोन-१५ची किंमत साधारणत: ६६ हजार रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.
डायनमिक आयलँड, ४८ मेगापिक्सल कॅमेरा तसेच अधिक क्षमतेची बॅटरी असलेल्या ‘आयफोन १५’च्या नव्या श्रेणीची घोषणा कुपरटिनो येथील कंपनीच्या मुख्यालयात मंगळवारी रात्री झालेल्या वार्षिक कार्यक्रमात करण्यात आली. आयफोन १५, आयफोन १५ प्लस, आयफोन १५ प्रो, आयवॉच सीरिज ९, आयवॉच अल्ट्रा २ आदी उत्पादनांची घोषणा यावेळी करण्यात आली. आयफोन १५ ची किंमत ७९९ डॉलर ठरवण्यात आली असून १५ प्लस ८९९ डॉलर, तर १५ प्रो ९९९ डॉलरना अमेरिकेतील बाजारात उपलब्ध होईल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत