आज महामानव विचार जयंती व संविधान संरक्षण अभियान अंतर्गत कार्यकर्ता व पदाधिकारी संवाद मेळावा ; आद. एस. के. भंडारे सर करणार मार्गदर्शन.


आपणास कळविण्यात येते की महामानव विचार जयंती व संविधान संरक्षण अभियान अंतर्गत आयोजित कार्यकर्ता पदाधिकारी संवाद मेळाव्यात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा स्टाफ ऑफिसर – समता सैनिक दल आदरणीय ॲड. एस के भंडारे साहेब मुंबई हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
तरी शनिवार दिनांक 18 – 5 – 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता लोक वाचनालय लोहारा तालुका लोहारा व रविवार दिनांक 19 -5 -2024 रोजी सकाळी 11.00 वाजता बहुजन हिताय विद्यार्थी वस्तीग्रह, गुंजोटी रोड उमरगा तालुका उमरगा येथे या संवाद मेळाव्यास भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, समता सैनिक दल, विविध कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी, अधिकारी वर्ग तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा उस्मानाबाद दक्षिण च्या वतीने करण्यात येत आहे.
*जिल्हा सरचिटणीस*
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा उस्मानाबाद दक्षिण.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत