‘सक्षम समीक्षे’चा वाचनीय असा डॉ.आ.ह.साळुंखे साहित्य विशेषांक -डॉ. अनंत दा. राऊत

‘सक्षम समीक्षा’ या त्रैमासिकाचा डॉ.आ.ह.साळुंखे साहित्य विशेषांक अलीकडेच प्रसिद्ध झाला आहे. या विशेषांकाचे मी हार्दिक स्वागत करतो. विवेकवाद हा तुच्छतेचा विषय बनवला जाणाऱ्या आणि अंध भक्तीचे स्तोम माजलेल्या वर्तमान काळात हा विशेषांक प्रसिद्ध होणे फार महत्त्वाचे आहे. डॉ. आ.ह. साळुंखे हे वर्तमानातले एक महत्त्वाचे विवेकी विचारवंत आहेत. ते अत्यंत साध्या, सौम्य, संयमीत व लालित्यपूर्ण भाषेत धार्मिक प्रतिष्ठा पावलेल्या मानव हितविरोधी गोष्टींची परखड चिकित्सा करतात. डॉ. साळुंखे यांचे सर्वच लेखन इतिहासकालीन शोषक धर्ममार्तंडांच्या दांभिकतेचे बुरखे फाडते. इतिहासकालीन विकृतिक प्रवृत्तीच्या विरोधात मानव्यनिष्ठ मंडळींनी दिलेल्या संघर्षाची शिस्तशीर मांडणी करते. इतिहासकालीन मिथकांचा सांगोपांग उलगडा करते. त्या मिथकांचा नवा वस्तुनिष्ठ अन्वयार्थ वाचकांच्या समोर ठेवते. इतिहास काळातील बहुजन हितकारी वैचारिक वारसा वर्तमान पिढ्यांच्या समोर सुलभ रीतीने मांडते.
डॉ.आ.ह.साळुंखे यांच्या वैचारिक भूमिकेची ओळख करून घेण्याच्या दृष्टीने ‘सक्षम समीक्षा’चा सदरील विशेषांक महत्त्वाचा आहे. सदर अंकासाठी डॉ.शैलेश त्रिभुवन यांनी ‘डॉ. आ. ह. साळुंखे (तात्या) विवेकी दीपस्तंभ’ या शीर्षकाचे संपादकीय लिहिले आहे. हे संपादकीय आदरणीय आह यांच्या साहित्यातील विवेकवादाचा उजेड वाचकांच्या समोर ठेवते. डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या ललित लेखनातील
जीवनविषयक तत्त्वज्ञान- डॉ. सुहासकुमार बोबडे,
आ.ह. एक बुद्धफूल- महावीरभाई जोंधळे, दाहक व्यथेचा एक सौम्य आविष्कार तुळशीचे
लग्न : एक समीक्षा- डॉ. सदाशिव पाटील, विवेकी सिद्धांत आणि आ. ह.- प्रा. इंदुमती जोंधळे, मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती : समर्थ प्रतिवाद-
डॉ. सुधाकर शेलार,डॉ. आ. ह. साळुंखे यांची धर्मशास्त्रातील स्त्री-समीक्षा- डॉ. जितेंद्र कदम,
चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून!भावी पिढीसाठीचे मार्गदर्शक तत्वज्ञान- डॉ. गणपतराव ढेंबरे,
डॉ. आ. ह. साळुंखे यांचे ‘तुकोबा’ चिंतन-
डॉ. स्वाप्नील इंगोले,डॉ. आ. ह. साळुंखे यांचे बौद्ध साहित्याला योगदान- प्रा. अमित मेधावी,
वर्णवर्चस्ववादी कल्पित बखरकाराची खबर- डॉ. रणधीर शिंदे, भूमिकेशी सुसंगत भाषाशैली- प्रा. हयातमहंमद पठाण,आ. ह. साळुंखे यांचे चार्वाक आणि संत तुकाराम-डॉ. ज्ञानेश्वर भोसले, डॉ. आ. ह. साळुंखे : धर्माची चिकित्सा करणारे आणि धर्माची संहिता लिहिणारे लेखक- डॉ. माधव पुटवाड,डॉ.आ. ह. साळुंखे यांचे मनुस्मृती विषयक विचार- डॉ. विकास बापूराव बहुले, सर्वोत्तम भूमिपुत्रः गौतम बुद्ध या ग्रंथातील काही बौद्ध स्त्रीव्यक्तिरेखा- डॉ. प्रशांत गायकवाड, डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या साहित्यात आलेले आर्थिक विचारः एक विश्लेषणात्मक अभ्यास- डॉ. विजयकुमार वावळे, धर्मचिकित्सा व मिथकचिकित्सेचा फुले-आंबेडकरी वारसा- डॉ. आ. ह. साळुंखेडॉ. रवींद्र श्रावस्ती, डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या साहित्यातील शैक्षणिक विचार- डॉ . जयश्री शिंदे-गायकवाड, डॉ.आ. ह. साळुंखे यांनी ‘नवभारत ‘मधील लेखांतून केलेली इहवादी, विवेकनिष्ठ धर्मचिकित्सा- डॉ. महेश गायकवाड,
इतिहासाच्या पुनर्मांडणीत आ.ह. यांचे योगदान-
डॉ. सुचित्रा घोगरे काटकर असे एकूण वीस
अभ्यासपूर्ण लेख सदरील विशेषांकात समाविष्ट केलेले आहेत.
डॉ. साळुंखे यांनी धर्मरुढींनी प्रतिष्ठित केलेल्या पण समाजमन व समाज जीवनावर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या, संस्कृतीच्या नावाने मिरवणाऱ्या अनेक विकृतींची कठोर चिकित्सा केलेली आहे. ही चिकित्सा ते तर्कनिष्ठ पद्धतीने तर करतातच परंतु त्याच्या जोडीला भक्कम पुराव्यांचे आधारही देतात. इतिहासकालीन मिथकांचा वस्तुनिष्ठपणे मूल्याधिष्ठित स्वरूपाचा नवा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करतात. डॉ. साळुंखे यांच्या मीमांसा पद्धतीचा सदर विशेषांकातून संक्षिप्तपणे परिचय होतो. डॉ. साळुंखे यांनी ज्या विविध विषयांवर लेखन केलेले आहे, त्या लेखनाची किमान संक्षिप्त अशी तोंड ओळख वाचकांना व्हावी याची काळजी सदर अंकातील लेखांच्या निवडीमध्ये घेतलेली दिसते.
‘सक्षम समीक्षा’ने प्रसिद्ध केलेला डॉ. साळुंखे साहित्य विशेषांक वैदिकांनी बहुजनांच्या इतिहासकालीन नायकांना कसे विकृत रूपात लोकांच्या समोर मांडले याबद्दल केलेल्या चिकित्सेची ओळख करून देतो. मनुस्मृतीमधील तर्कहीनता, भेदाभेदी उच्चनीचता, स्त्री वर्गाला गुलाम करण्याची नीती इत्यादींचा आ.ह. साळुंखे कसा धिक्कार करतात याची जाणीव करून देतो. साळुंखे यांच्या सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध या ग्रंथातील कर्तृत्ववान स्त्रियांची ओळख करून देतो. तथागत बुद्धांनी स्त्रियांचा कसा सन्मान केला आणि त्यांचा बुद्धिवाद जागृत करून त्यांना कसे सक्षम बनवले याची ओळख करून देतो. उप्पलवण्णा,पटाचारा, विशाखा, सोणा, सुबला, संघदासी, नंदा, धर्मपाला, संघमित्रा, महाप्रजापती, आम्रपाली, यशोधरा, किसा गौतमी अशा कितीतरी स्त्रियांना घडवण्यामध्ये आणि मुक्तीच्या दिशेने घेऊन जाण्यामध्ये तथागत बुद्धांचे कसे महत्त्वपूर्ण योगदान आहे, याची जाणीव करून देतो. याशिवायही सदर विशेषांक डॉ. साळुंखे यांचे ललित लेखन, त्यांचा विद्रोही तुकाराम, चार्वाक आणि तुकाराम यांचे त्यांनी स्पष्ट केलेले अनुबंध, बळीवंश अशा लेखनाचाही परिचय करून देतो.
सक्षम समीक्षाचा हा विशेषांक नवे काही जाणून घेऊ इच्छिणाऱ्या व डॉ .आ.ह.साळुंखें यांची मूलभूत मांडणी खोलात जाऊन समजून घेऊ पाहणाऱ्या वाचकांनी आवर्जून वाचला पाहिजे. हे वाचन प्रत्येकालाच बौद्धिक आणि मूल्यात्मक समृद्धीच्या दिशेने घेऊन जाईल.
‘सक्षम समीक्षे’चा वाचनीय असा
डॉ.आ.ह.साळुंखे साहित्य विशेषांक
डॉ. अनंत दा. राऊत

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत