परभणीच्या घटनेचा खरा मास्टरमाईंड शोधा :- प्रबुद्ध साठे
अंबाड (माढा) :– परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेच्या निषेधार्थ सनदशीर मार्गाने आंदोलन व बंद पुकारल्यानंतर पोलीस प्रशासनाने हे संवेदनशील प्रकरण व्यवस्थीत न हाताळता, कोबिंग ऑपरेशन, स्वतः च काही ठिकाणी वाहनांची मोडतोड करून, निरपराध आंबेडकरी समाजातील महिला, पुरूष, शालेय तरूण तरुणीवरती बेछूट लाठीमार करून आंदोलकांशी अतिरेक्यांसारखे वागले, देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली भाजप महायुतीचे सरकार पोलीसांच्या गैरवापर करून आंबेडकर समाजाला, चळवळीला लक्ष करीत आहे असा स्पष्ट आरोप चला आपल्या बुध्दाच्या घरी अभियान प्रमुख व भारतीय बौद्ध धम्म संस्कार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रबुद्ध साठे यांनी केला, ते अंबाड ता माढा येथे परभणी संविधान विटंबना, सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयात मृत्यू, आंबेडकर समाजावर पोलीसांनी केलेला अत्याचाराच्या विरोधात निषेध मोर्चात बोलत होते, , परभणीच्या घटनेतील आरोपी मनोरुग्ण नसून त्याचा मास्टरमाईंड पोलीसांनी शोधून काढावा तरच यापुढे अशा घटना घडणार नाही,, , वडार समाजातील आमचा बांधव भीम सैनिक सोमनाथ सुर्यवंशीचा मृत्यू एक प्रकारची सरकार पुरस्कृत हत्याच असून त्याचीही निरपेक्ष चौकशी होवून सत्य बाहेर यावे अशी मागणी करीत प्रबुद्ध साठे पुढे म्हणाले संविधानी विटंबना म्हणजे देशाची विटंबना, देशद्रोह याचा निषेध करणार्या देशभक्त आंबेडकरी आंदोलकांवरती अत्याचार करणाऱ्या संबंधित पोलीसांवरतीच गुन्हे दाखल व्हायला हवे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व गृहमंत्री पदावर येतात त्यावेळी महाराष्ट्रात कायदा राहीला नाही,, पोलीसांनी आंदोलकांशी विश्वास निर्माण करावा व आंदोलकांनी सुद्धा असे झाले तर पोलीसांना सहकार्य करून शांतता राखावी असेही प्रबुद्ध साठे यांनी म्हटले, याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण वाघमारे, , भैय्यासाहेब लांडगे, आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
हा मोर्चा भीम प्रतिष्ठान अंबाड ता माढा जि सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता, भीम प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत