महाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिक

JEE, NEET परीक्षांच्या तारखा जाहीर.


National Testing Agency ने (NTA) JEE, NEET, UGC-NET सह इतर परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत.
या परीक्षांची तयारी करत असलेल्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे . NTA ने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, NEET UG 2024 परीक्षा 5 मे 2024 रोजी होणार आहे. तर, जेईई मेन परीक्षेचे पहिले सत्र 24 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2024 दरम्यान पार पडणार आहे. तर, दुसऱ्या सत्रातील परीक्षा 1 एप्रिल ते 15 एप्रिल 2024 दरम्यानच्या काळात पार पडणार आहे.

पीसीएम (PCM) विषयासह बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवारच या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. उमेदवाराकडे भौतिकशास्त्र आणि गणित विषय असणं आवश्यक आहे. जेईईमध्ये चांगले रँक मिळवणारे जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेला बसू शकतात. JEE च्या माध्यमातून उमेदवारांना IIT, NIT सारख्या प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्थांच्या पदवी अभ्यासक्रमात प्रवेश मिळतो, तर NEET द्वारे उमेदवारांना एमबीबीएस अभ्यासक्रमात प्रवेश मिळतो. सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा अर्थात CUET UG आणि PG परीक्षांच्या तारखा NTA ने जाहीर केल्या आहेत. CUET UG परीक्षा ही 15 मे ते 31 मे 2024 दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. तर, CUET PG परीक्षा 11 मार्च ते 28 मार्च 2024 या दरम्यान आयोजित करण्या येणार आहे. UGC-NET परीक्षा या 10 जून ते 21 जून 2024 दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत. या परीक्षांचे निकाल हे परीक्षेनंतर किमान तीन आठवड्यात येणे अपेक्षित आहे. परीक्षेबाबतच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी वेळोवेळी परीक्षा घेणाऱ्या संस्थांचे अधिकृत वेबसाईट पाहाव्यात.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!