ईव्हीएमवाद चिघळणार ! ‘त्या’ 95 मतदारसंघांतील आकडेवारीवर संशय…
विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाले. या निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यातच आता एकूण 95 मतदारसंघांमध्ये मतदान आणि मतमोजणी यामध्ये तफावत आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. त्यातच आता ईव्हीएमबद्दलचा संशय निर्माण करणारी आकडेवारीही समोर आली आहे.
🗳️ एकूण 288 पैकी 193 मतदारसंघांमध्ये प्रत्यक्षात झालेले मतदान आणि मतमोजणीचा आकडा जुळला आहे. मात्र, उर्वरित 95 मतदारसंघ असे आहेत की, मतदान आणि मतमोजणीत तफावत आढळली आहे. त्यापैकी 19 मतदारसंघांमध्ये ईव्हीएममध्ये जास्त मतांची नोंद झाल्याचे आढळले. तर, 76 मतदारसंघांमध्ये प्रत्यक्ष मतदानाच्या तुलनेत ईव्हीएममध्ये कमी मतांची नोंद झाल्याचे उघड झाले आहे. परिणामी ईव्हीएमवरून पुन्हा एकदा वादंग निर्माण होऊ शकतो.
👆🏻 या 19 मतदारसंघांमध्ये मतदानाच्या तुलनेत जास्त मते :
आमगाव, उमरखेड, लोहा, औरंगाबाद पूर्व, भोसरी, परळी, देगलूर, हिंगोली, वैजापूर, कळवण, चांदवड, दिंडोरी, कागल, बोईसर, कोल्हापूर दक्षिण, हातकणंगले, करमाळा, सोलापूर दक्षिण आणि मालेगाव मध्य
👇🏻 ‘या’ मतदारसंघात मतदानाच्या तुलनेत कमी मते :
अक्कलकुवा, गंगाखेड, विलेपार्ले, नवापूर, पाथरी, चांदिवली, साक्री, घनसावंगी, शिरपूर, बदनापूर, सायन कोळीवाडा, चोपडा, औरंगाबाद पश्चिम, मुंबादेवी, भुसावळ, पनवेल, जळगाव शहर, गाणगापूर, कर्जत, चाळीसगाव, नांदगाव, अलिबाग, पाचोरा, मालेगाव बाह्य, आंबेगाव, जामनेर, शिरूर, अकोट, बागलाण, इंदापूर, अकोला पश्चिम, सिन्नर, बारामती, निफाड, मावळ, मोर्शी, नालासोपारा, कोथरूड, वर्धा, वसई, खडकवासला, सावनेर, भिवंडी पश्चिम, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम, अंबरनाथ, कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व, पुणे कॅन्टोन्मेंट, कोपरगाव, शेवगाव, लातूर ग्रामीण, लातूर शहर, अहमदपूर, औसा, तुळजापूर, माढा, कामठी, आरमोरी, अहेरी, बल्लारपूर, चिमूर, मीरा भाईंदर, वणी, ओवळा माजीवाडा, नांदेड दक्षिण, मुखेड, कोपरी पाचपाखाडी, कळमनुरी, दिंडोशी, जिंतूर, चारकोप, खानापूर, कोल्हापूर उत्तर, सोलापूर शहर मध्य.
राज्यातच काय, संपूर्ण विश्वात अपूर्णांक मतं कशी असू शकतात…??
13 लाख अतिरिक्त मते आली कुठून…??
आता मतदार नोंदणी पाहू. 2019 ते 2024 (5 वर्षे) महाराष्ट्रातील मतदारांची संख्या 50 लाखांनी वाढली, म्हणजे सरासरी प्रतिवर्षी 10 लाख. पण 2024 च्या सार्वत्रिक आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान अवघ्या 6 महिन्यांत मतदारांची संख्या 42 लाखांनी वाढली. 6 महिन्यांत 42 लाख वाढ म्हणजे 84 लाख/वर्षाचा वाढीचा दर, जो गेल्या 5 वर्षांतील सरासरी वार्षिक दराच्या 8.4 पट आहे..!
हा मतदार नोंदणीचा चमत्कार आहे की मतांमध्ये फेरफार आहे, हे तुम्हीच ठरवा.
मतांमधील या विसंगती दोन गंभीर प्रश्न निर्माण करतात:
1️⃣ मतं वाढवण्यासाठी ईव्हीएममध्ये छेडछाड केली का?
2️⃣ ECI चुकीचा किंवा फेरफार केलेला डेटा प्रकाशित करत आहे का?
दोघांपैकी काही जरी झालं असेल, तरी हा प्रकार निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कमी करतोय.
निवडणूक आयोगाने स्पष्ट केले पाहिजे:
- 13 लाख अतिरिक्त मते का आहेत?
- महाराष्ट्रात 6 महिन्यांत 42 लाख मतदार कसे वाढले?
- ईव्हीएमचे स्वतंत्र ऑडिट केले जात आहे का?
लोकशाही ही लोकांच्या विश्वासावर अवलंबून असते. हे प्रश्न अनुत्तरीत राहिल्यास त्यावरून नक्कीच विश्वास उडेल. मतदार नोंदणी आणि मतमोजणीत पारदर्शकता आणावी अशी आमची मागणी आहे. लपवण्यासारखे काहीही नसेल, तर ECI ने या तपासणीचे स्वागत…🙏
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत