रमजान मुल्ला, प्रा. रामदास नाईकनवरे यांना साहित्य सेवा पुरस्कार जाहीर

संवेदनशील आणि प्रतिभावंत कवी कै. चंद्रकांत देशमुख यांच्या स्मृती जपण्यासाठी सुरू करण्यात आलेला साहित्य सेवा पुरस्कार कवी रमजान मुल्ला आणि प्रा. नाईकनवरे यांना जाहिर करण्यात आला आहे.
विविध क्षेत्रात कार्यरत सेवाभावी संस्था अमृतवेल ग्रामविकास प्रबोधिनीच्या वतीने कविवर्य चंद्रकांत देशमुखे साहित्य परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. या परिषदेच्या अतिने हे पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत.
आटपाडी येथे कला व विज्ञान महाविद्यालयमध्ये मराठी विभागात सहायक प्रा. डॉ. रामदास नाईकनवरे यांना, कविवर्य चंद्रकांत देशमुखे साहित्य गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मराठी चित्रपट गीतकार व कलावंत, वक्ता, कवी, लेखक, गझलकार, अभ्यासक व संशोधक आणि पत्रकार म्हणून ते परिचीत आहेत. त्यांचे “समाज परिवर्तना मधील बुद्धीजीवी वर्गाची भूमिका” पुस्तक प्रकाशित असून, अस्मितादर्श, परिवर्तनाचा वाटसरू, दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका, अक्षरबंध, वारूळ, युवक मुद्रा, जोशाबा टाइम्स इत्यादी वृत्तपत्रातून तसेच संपादित ग्रंथांमधून अनेक प्रकारचे समीक्षा लेखन केले आहे. संशोधित अप्रकाशित ‘ ग्रंथ लेखनात तिसऱ्या पिढीची मराठी गझल, मराठी कादंबरी आणि कामगार जीवन तर लघु कादंबरी परिवर्तन याचा समावेश आहे. माणदेशातील पाच लाख दुर्मिळ शाहिरी रचनांचे संकलन व संवर्धन केले असून माणदेशातील पोतराजांच्या धुपारत्यांचे संकलन व संवर्धन केलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत