महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेचे बीड जिल्हा प्रमुख सक्रिय राजकारणात ?

बीड – बीड जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अंतर्गत असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनावर जिल्हा प्रमुख बीड जिल्हा मुख्य हे राजकारणात सक्रिय असून स्वतःच्या गावातील ग्राम पंचायत चे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. शासकीय नियम धाब्यावर शासनाची फसवणूक करत असल्याची फार मोठी दाट शक्यता निर्माण झालेली आहे. शिवाय महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजना वर मेडिकल ऑफिसर बीड जिल्हा येथे शासकीय योजनेत पगारी काम करत असून ते एका प्रायव्हेट मेडिकल शिक्षण संस्थेत होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय येथे मेडिकल ऑफिसर तथा लेक्चरर म्हणून दोन्ही ठिकाणी काम करत आहेत हि शासनाची फसवणूक असून सदर प्रकरणाची बीड जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी स्वतः लक्ष देऊन दोषीवर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र राज्याचे, ज्ञानमाता माहिती अधिकार कार्यकर्ते नागरिक समूह तथा प्रशिक्षण केंद्राचे सदस्य, युवा नेते अक्षय गोटेगावकर, वंचित बहुज आघाडीचे नेते दत्ताभाऊ शेंडगे यांनी केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत