महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
क्रांतीसूर्य ,प्रज्ञासूर्य, युगप्रवर्तक,घटनाकार,दीनदलित उद्धारक, विश्ववंद्य, भारतरत्न,दास्यनिर्मूलक, बोधीसत्व,महामानव करूणासागर भीमराया तुमच्यामुळे जीवनास अर्थ आला.महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पावनस्मृतीस महानिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम.
महामानवाचा महापरिनिर्वाण दिन
अभेद्य भीम किल्ला ,भीम गड भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर
महापरिनिर्वान दिन . भारतरत्न विश्ववंदनीय बोधीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इहलोकीचा मृत्यू दिन हा महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो.
भीम जयंती घरोघरी
धम्मपरिवर्तन नागपुरी
पाऊले चालती सागरतीरी
चैत्यभूमी आहे ऊर्जानगरी .
डॉ . बाबासाहेब
- जयंती -पूण्यतिथी -संविधान दिन -प्रजासत्ताक दिन-विद्यार्थी दिन अशा शासकीय कार्यक्रमातून शाळा महाविद्यालये ,ग्रंथालये , शासकीय व सामाजिक संस्था द्वारा गौरविली जाणारी एकमेव व्यक्ती डॉ.बाबासाहेब
- घटनापती ,घटनासम्राट ,घटनेचे शिल्पकार ,दास्याचे मुक्तिदाते ,महामानव ,विश्ववंदनीय ,विश्वरत्न ,भारतरत्न ,क्रांतीसूर्य ,युगप्रवर्तक ,कुशाग्र बुद्धीमत्तेचा शिरोमणी ,समता नायक,जननायक ,दलितांचे कैवारी,जलतज्ज्ञ,अर्थतज्ज्ञ,शोषितांचे संघटक,धैर्यशील योद्धा,शीलवान चारित्र्याचा सागर,प्रज्ञा सागर,करूणेचा पुजारी ,थोर लेखक,संशोधक,पत्रकार,उत्कृष्ट संसदपटू
अशा कितीतरी विशेषणांनी अलंकारित केलेलं व्यक्तिमत्व म्हणजे डॉ.बाबासाहेब - स्त्री शिक्षण व नारी सन्मान,कायदा निर्मिती ,अर्थ सिद्धांत ,नदी जोड प्रकल्प ,अशा क्रांतीकारी घटनांचे उदयबिंदू डॉ.बाबासाहेब
4.शिक्षण नाकारलेल्या समाजाला ग्रंथ मित्र ,वाचक ,लेखक बनविले .याचे श्रेय डॉ. बाबासाहेबांनाच.
5.नेत्यानंतर चळवळ संपुष्टात येते हा सिद्धांत रुजलेल्या देशात चळवळ व नेता बाबासाहेबांच्या प्रेरणेतून जिवंत तर आहेच आणि वाढतेय सुद्धा हे सुद्धा डॉ.बाबासाहेबांमुळेच
6.इथल्या व्यवस्थेला अपरिहार्यता म्हणून असो वा गुणगौरव म्हणून असो बाबासाहेबांचे नाव घ्यावेच लागते. हे जनकत्वही डॉ.बाबासाहेबांचेच.
7.दहा हजार वर्षातला जागतिक स्तरावरील प्रभावशाली व्यक्ती म्हणजे डॉ.बाबासाहेब.
8.कोलंबिया विद्यापीठाने घोषित केलेला पहिल्या क्रमांकाचा विद्वान म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब
9.संशोधक,लेखक,उत्कृष्ट व्याख्याते,तल्लख बुद्धीमत्ता , दास्यत्वाचा मुक्तिदाता इथेही डॉ. बाबासाहेबच.
बाबा
तुम्हाला एक गोष्ट सांगतो मला राजा शिवछत्रपती व तुम्ही घटनापती खूप आवडतात.एकाने तलवारीच्या पात्याने अन् हृदयाच्या नात्याने रयतेचं राज्य घडवलं.अन् तुम्ही कलमाच्या ताकदीनं लोकशाही राज्य राखलं.
तुमची शिकवण आता क्रांती ज्योत बनली आहे .
कळलेत बाबासाहेब सर्वांना, बाबासाहेब जगायचे आहेत.
बाबा,तुम्ही खरोखरच अभेद्य भीम किल्ला ,भीम गड आहात.
कचरू चांभारे बीड
9421384434
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत