भारत बुद्धाची भूमी होती, आजही आहे आणि ती पुढे राहणार आहे.

जग बुद्धाचा देश म्हणूनच भारताला ओळखते, कृष्णा, शिव, विष्णू , किंवा ब्रम्हा च्या नावाने नाही. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने जेव्हा अनुशक्तीचे परीक्षण पोखरण मध्ये केले तेव्हा सुद्धा त्या परीक्षणाचा कोडवर्ड ‘ बुद्ध हसला’ हाच होता.
हा बुद्ध कोण आहे ? तो कधी जन्मास आला ? त्याचा जन्म कुठे झाला ? बुद्धाने कोणते महान कार्य केले ? या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्हाला भारताच्या उपलब्ध साहित्यामध्ये सापडत नाही. कारण ब्राह्मणवाद्यांनी भारताची प्राचीन संस्कृती नष्ट करून टाकली. दुसऱ्या बाजूला मिश्र, मेसोपोटामिया, या संस्कृती त्यांच्या देशातील राज्यकर्त्यांनी सुरक्षित ठेवली आहे. त्या देशातील राज्यकर्ते त्यांच्या प्राचीन संस्कृती विषयी किती प्रेम बाळगत होते हे यावरून दिसून येते.
आम्हाला वरील सर्व प्रश्नांची उत्तरे विदेशातूनच प्राप्त करावी लागत आहे. आम्ही भारतीयांनी अर्थातच ब्राह्मणवादी विचाराच्या लोकांनी बुद्धाचा प्राचीन इतिहास नष्ट करण्याचे महापाप केले आहे.. भारतातून बुद्ध धर्माचे निर्मूलन करण्याचा उद्देश ब्राह्मणवाद्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला होता.
सत्य हे शाश्वत आहे ते कधीही मरत नाही. याच कारणामुळे बुद्धाचा इतिहास इतके भयंकर हत्याकांड करूनही अमर आहे. भारतात जन्मलेल्या 28 बुद्धांची नावे आम्हाला श्रीलंकेच्या बौद्ध साहित्यांमध्ये ती आजही उपलब्ध आहे.
बुद्धिस्टांचे नालंदा विश्वविद्यालय ब्राह्मणांच्या मदतीने मुस्लिम सत्तेने जाळून टाकले होते. बुद्धिस्टांचे सर्व साहित्य जळून खाक झाले परंतु जे साहित्य विदेशामध्ये गेलेले होते ते साहित्य आजही सुरक्षित आहे. आज त्या सर्व साहित्याचा अनुवाद होऊन पुन्हा बुद्धाचा इतिहास भारतामध्ये जिवंत होत आहे आणि पुढेही होणार आहे.
बुद्धाच्या तत्त्वज्ञानाला विकसित होण्यापासून आता भारतातील कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही. भारत बुद्धाची भूमी होती आणि राहील सुद्धा !
प्रा. गंगाधर नाखले
04/12/2024
7972722081
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत