क्रांतीसुर्याला विनम्र अभिवादन!
सहा डिसेंबर ते काळे ठरले
सुर्य विझला आकाश रडले
धरती भिजली सागर सुकले
हीन दीन जन कोटी तूटले
गहिवरले नयन घळघळले
काजळ काळे मेघ दाटले
उदास सृष्टी भान हरपले
अचानक हे विपरीत घडले
प्रवाहित ते तिथेच थिजले
बाबा गेले भिम बाबा गेले।।
महू भूमीने आक्रोश केला
दिक्षा भूमीने टाहो फोडला
हळहळले चवदार तळे अन्
क्रांती भूमीचा श्वास थांबला
ते नागसेन वनही कोमेजले
शिक्षणाचा जिथे फुले मळा
मुक्तीचे होते द्वार खूले जिथे
राजगृहाला आली अवकळा
असे कसे हे आक्रीत घडले
बाबा गेले भिम बाबा गेले।।
थकले दिवस रात्र झोपली
लेखणीची ना धार खूंटली
तेवत होता ज्ञान दीप तो
अतूलनीय घटना लिहिली
घटना ही केवळ ना घटना
मानवतेची असे संरचना
बंधुभाव समता न्यायाचे
खुले दार मुलभुत हक्काचे
क्रांती सुर्य नर विश्व रत्न ते
बाबा गेले भिम बाबा गेले।।
एम एल गोपनारायण
*मानवतेचे दीपस्तंभ, क्रांतीसुर्य, प्रतीबुद्ध ज्ञानसागराला विनम्र अभिवादन भावपूर्ण श्रद्धांजली **💐💐🙏
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत