यापुढे होणाऱ्या निवडणुका आम्ही ईव्हीएम वर होवू देणार नाही
– प्रा. देविदास इंगळे
आमचं ठरलंय आता आम्हाला लोकशाहीच हवी कोणत्याही परिस्थितीत आम्ही ईव्हीएम द्वारे मतदान करणार नाही आणि ईव्हीएम वर मतदान होवू देणार नाही.
आम्ही आंदोलनं केली अनेक निवेदनं दिली मोर्चे काढले जर निवडणूक आयोग जनतेचं ऐकत नसेल जर केंद्र सरकार जनतेचं ऐकत नसेल सुप्रीम कोर्ट ईव्हीएम याचिका फेटाळत असेल तर आम्ही जनतेनी त्यांचं काय म्हणून ऐकायचं हा मोठा प्रश्न आहे हा संविधानाने चालणारा लोकशाही देश जनतेचा आहे लोकशाहीने अधिकार दिलाय आम्हाला जे पाहिजे ते दया नाहीतर खुर्च्या खाली करा.
आम्हा जनतेला चांगलं कळते काय चांगलं आणि काय वाईट जनतेला कोणी दबाव वापरून असेच करा म्हणू शकत नाही.
किंवा आम्ही ऐकून तसं करीत नाही म्हणजेच दबावाला बळी पडत नाही.
जनता पण लोभापोटी लाचार बनून तळवे चाटत राहते आणि या सामान्य जनतेचा मजबुरीचा फायदा घेवून तोडा आणि फोडा नीती वापरून ईव्हीएम घोटाळे करून हे लोक राज्य करीत आहेत.
हे जनतेनी खपवून न घेता पेटून उठलं पाहिजे रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि हुकूमशाही सरकार ला सत्तेपासून दुर ठेवलं पाहिजे यासाठी सावधानता नेहमीच बाळगली पाहिजे बीजेपी कधीही मनुस्मृती लागू करेल त्यांचा नेम नाही.
कोणाला पैसा देईल कोणाला पद देईल कोणाला ईडी लावेल कोणाला जेल मध्ये टाकील पण सत्ता कायम ठेवील आणि मनुस्मृती लागू करेल.
सत्तेसाठी कोणत्या थराला जाईल याचा नेम नाही.
आज सर्व समाज प्रलोभनाचा बळी ठरतोय.
मग त्यांना राज्य करायला मार्ग मोकळा होईल पण लक्षात ठेवा आता असणारी रिक्त पदे परीक्षा न घेता हे त्यांच्या मर्जीतील लोकांना भरतील आणि पुन्हा आपण 60 वर्ष बोंबा मारीत बसू एस्सी,,एस. टी.,ओबीसी, मराठा नाही.
हे कुठपर्यंत सामान्य जनतेनी सहन करायचं आणि त्यात
कर्मचारी वर्ग आपापल्या संसारात परेशान आहे जगाचं काय चाललंय त्यांना काहीही देणं नाही आणि सामान्य जनता भरकटत चालली आहे आपले कर्तव्य म्हणून कुठलीच सहकार्याची भावना नाही.
मार्गदर्शन नाही दिशाहीन समाजाला सुधारण्यासाठी प्रयत्न नाहीत जोतो गाडी बंगल्यात परेशान आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हंटल्याप्रमाणे पढे लिखे समाज ने हमे धोका दिया हे ब्रीद सार्थ ठरतं.
पण लक्षात ठेवा आम्ही काम करीत आहोत आग प्रत्येकाच्या बुडापर्यंत येईलच म्हणून सावध रहा जागे व्हा आणि माणसात राहून उघड्या डोळ्यांनी बघा सहकार्य करा साथ दया साथ घ्या आणि गुलामी टाळा.
आठवा मुघल, निझामशाही, इंग्रज यांनी कित्येक वर्ष गुलामीत ठेवलं आणि बीजेपी तेच करते आहे. गुलामी पुन्हा येणार हे निश्चित.
मजबूर जनता मेटकुटिला येवून पैसा, वस्तू, आश्वासने याला बळी पडून अनेकांची मते जबरदस्ती करायला भाग पडतात आणि सत्ता उपभोगतात.
महागाई च तर नावच काढणे कठीण आहे वरून लाडकी बहीण अशा माध्यमातून तोंडाला पाने पुसतात.
अशी सत्ता आम्हाला मान्य नाही आम्ही मान्य करणार नाही यापुढे आम्ही ईव्हीएम द्वारे मतदान होवू देणार नाही आम्हाला जेल झालीतरी चालेल आमचा प्राण जरी गेला तरी चालेल पण यापुढे ईव्हीएम वर निवडणूक होणे नाही हा आमचा संकल्प.
धन्यवाद
आपला स्नेही
प्रा. देविदास इंगळे
राष्ट्रीय अध्यक्ष
राष्ट्रीय संविधान बचाव अभियान
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत