सव्वा दोन एकराची जागा पुणे महानगरपालिकेने ठरावाप्रमाणे हस्तगत न केल्याने…

समाज माध्यमांतून साभार
जाहिर निषेध
पुणे महानगरपालिका आयुक्त कार्यालयाचा जाहिर निषेध.
भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मालधक्का चौक पुणे याचे सन २०२५ हे रौप्य वर्ष २५ वे वर्ष असून अद्याप विस्तारीकरणाची पी.डब्लु.डी. ची सव्वा दोन एकराची जागा पुणे महानगरपालिकेने ठरावाप्रमाणे हस्तगत न केल्याने ती जागा आज एका खाजगी बिल्डरच्या घश्यात गेली आहे.
भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मालाधक्का चौक पुणे येथील भवनाचे विस्तारीकरणाचा ठराव पुणे महानगरपालिकेत सर्वसाधारण सभेमध्ये दिनांक २०/७/२०००रोजी ठराव क्र.१०३ नुसार मंजुर केला गेला आहे. हा ठराव २४वर्षापूर्वीच झालेला आहे.त्यामध्ये भवनाच्या शेजारील असलेली महाराष्ट्र शासनाची सार्वजनिक बांधकामाच्या कार्यालयाची सर्व जागा सव्वा दोन एकराची जागा पुणे म.न .पा.ने हस्तगत करुन तेथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे विस्तारीकरण करुन लोकउपयोगी भव्य राष्ट्रीय ग्रंथालय, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, विविध भाषेचे केन्द्र,विपषणा केन्द्र ,म्हणजे सर्व वंचित गोरगरीब जनतेसाठी खुले ज्ञानकेन्द निर्माण व्हावे असे स्वप्न त्याकाळी स्थायी समितीचे सदस्य व आंबेडकर चळवळी नेते कालकथित श्री .अरुण धिमधिमे आणि सुरेश शेवाळे यांनी पाहिली होती. तेथे असलेल्या सार्वजनिक बांधकामाचे कार्यालयाला कसबा पंपिंग स्टेशनची जागा देण्यात यावी असा ठराव मंजूर झालेला असताना देखील.पुणे महानगरपालिकेने आत्तापर्यंतच्या २४वर्षात आलेल्या सर्व म.न.पा.आयुक्ताने कोणतेही पाठपुराव्याचे काम केले नाही.तसेच महाराष्ट्र शासनाला पुणे म.न.पा. आयुक्ताकडून जागा मागणीचे पत्र व ठराव मंजूर झाल्याबाबत जाणीवपूर्वक कळविण्यात आले नाही,तसेच मा.केन्द्रीय राज्यमंञी श्री रामदासजी आठवले यांच्या पत्रावरुन महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री कार्यालया कडून म.न.पा.ला प्रस्ताव पाठविण्याबाबत विनंती केली तरी देखील म.न.पा.ने महाराष्ट्र शासनास कोणताही पत्र व्यवहार म.न.पा आयुक्ताकडून करण्यात आला नाही. त्यामुळे गेली २४वर्ष होऊन देखील अद्याप या ठरावाची अंमलबजावणी झाली नाही. व ती विस्तारीकरणाची सव्वा दोन एकराची जागा महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून परवानगी घेऊन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला परस्पर ९९वर्षाच्या भाडे तत्वाने संगणमत करून देऊन टाकली.त्यानंतर २४वर्षाने ती जागा आत्ता पुन्हा काही महिन्यांपूर्वी म्हणजे फेरफार मालमत्ता पत्रका नुसार दिनांक ११/१०/२०२४ रोजी एका खाजगी बिल्डरला ६०वर्षाच्या नाममात्र भाडेतत्त्वावर पुन्हा महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाने देऊन टाकली आहे.म्हणजे एका भाडेकरूने दुसरा पोट भाडेकरु ठेवला असा प्रकार झाला आहे.व त्या जागेचे आयते भाडे खाण्याचा धंदा रस्ते महामंडळाने केला आहे.लवकरच आत्ता हा खाजगी बिल्डर कॅन्सर हाँस्पिटलच्या नावाखाली सर्व विस्तारीकरणाची जागा हडप करणार आहे.तसेच शासनाची ताकद दाखवून तेथे कमर्शियल बिल्डिंग उभी करुन धंदा करणार आहे.यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री ,रस्ते विकास महामंडळ मंत्री व मंत्रालयातील अनेक लोकाांनी एकत्र येऊन डाँ.बाबासाहेबआंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरणाची सव्वा दोन एकराची जागा जाणिवपूर्वक एका खाजगी बिल्डरला नाममात्र भाडेतत्त्वावर देण्याचे पाप हे या मंडळीने केले आहे.त्याचा आंबेडकर जनतेमध्ये प्रंचड राग आहे..पुणे महानगरपालिका आयुक्त आत्ता जबाबदारी झटकत आहे.सदर जागा आत्ता रस्ते विकास महामंडळाची आहे.निर्णय ते घेतील.म.नपा.चा, काही संबध नाही.पंरतु ठराव पुणे म.नं.पा.ने दिनांक २०/७/२०००ला मंजूर केला? तो का केला?त्यावेळी देखील ती जागा महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मुळ मालकाकडे होती,व आजही ती भाडेतत्त्वावर रस्ते विकास महामंडळाला दिलेली आहे.मूळ मालक सार्वजनिक बांधकाम विभाग आहे.त्यांनी ती विकली नाही.त्यामुळे पुणे महानगरपालिका आयुक्त आपली जबाबदारी टाळत आहे.याचा करावा तेवढा निषेध कमीच आहे.
भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवना नंतर गेली २४वर्षात पुण्यात अनेक महापुरुषांची सांस्कृतिक भवने ,स्मारके व इतर क्रिडागणे ,इमारती एकरामध्ये म.न.पा. व महाराष्ट्र शासन यांच्या पैश्यातून उभी राहीली आहेत.परंतु एकमेव आपले डाँ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन फक्त १० गुंठ्यात आहे.व ती मालमत्ता देखील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या नावावर नाही.त्यामुळे त्याला आत्ता केव्हा ही धोका निर्माण होऊ शकतो .त्यासाठी आत्ता आंबेडकर जनतेने सावध होऊन आवाज उठवणे आवश्यक आहे.लोकशाही मार्गाने आंबेडकरी चळवळीतील लोकांनी भवनाच्या विस्ताराची जागा मिळविण्यासाठी एकत्र लढा देण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.ज्याप्रमाणे नागपूर मध्ये संपूर्ण आंबेडकर जनता रस्त्यावर उतरून दिक्षाभूमीतील पार्कीग हालवण्याची मागणी मान्य करुन घेतली.त्याप्रमाणे पुण्यात देखील आपली आंबेडकर समाजाची ताकद दाखवावी लागणार आहे,तरच सदर जागा भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणासाठी मिळणार आहे. नाही तर शासन आपली ताकद दाखवून ती जागा खाजगी बिल्डरला दिल्या शिवाय राहणार नाही. हे सर्व आपण आपल्या उघड्या डोळ्याने पाहत बसावे लागेल.
तसेच सदर जागेवर अनेकाचा त्यावर डोळा आहे. मोक्याची जागा असल्याने शासना व्यतिरिक्त मनुवादी मंडळीचा या जागेवर डोळा आहे.गेल्या एक वर्षापासून काही मनुवादी प्रवृत्तीचे बांधकाम विभागातील खाजगी ठेकेदारांनी खोडसळपणाने एक जावई शोध काढला की सार्वजनिक बांधकाम विभागात याच जागी म्हणजे भवन विस्तारीकरणाच्या जागीच पूर्वी या ठिकाणी एक कर्नाटक राज्यातील एक अभियंता या ठिकाणी आतील केबिनमध्ये बसून काम करीत होते.त्यांनी भारतासाठी खूप काम हे ह्या जागेवरुन बसून केले.म्हणून त्यांच्या नावाने म्हणजे भारतरत्न सर विश्वेश्वरैय्या मोक्ष गोडम यांच्या नावाचे स्मारक उभे करावे अशी महाराष्ट्र शासनाकडे त्यांनी मागणी केली आहे.तसेच या मंडळीनी सदर ठिकाणी भव्य प्रमाणात यांची जंयती साजरी केली आहे.त्यांचे फोटो व माहिती पुण्यातील सर्व पेपर मध्ये आलेली आहे.दिनांक २०/११/२०२४सकाळ पेपर पहा.तसेच या सार्वजनिक बांधकाम खाजगी अभियंता ठेकेदारी सघटनेने ABPमाझावर या चँनेलला मागील दोन महिन्यापूर्वी याच ठिकाणी फक्त आभियंत्यांचे दैवत सर विश्वशैरय्या मोक्ष गोडम यांचेच स्मारक झाले पाहिजे.अशी जोरदार मागणी केली आहे.त्यामुळे सदर ठिकाणी मनुवादी लोकांनी प्रवेश केला आहे.अश्याप्रकारे महाराष्ट्र शासन.पुणे महानगरपालिका. व मनुवादी .मंडळी भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणाच्या या मोक्याच्या जागेला पूर्ण विरोध करत आहेत. कधी उघड तर कधीअदृश्य रुपाने करत आहेत.तेंव्हा सर्वानी मिळुन या जागेसाठी लढा देण्यासाठी पुढे यावे.
भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समिती पुणे कायदेशीर लढा देत आहे.पंरतु पुण्यातील सर्व आंबेडकर जनतेने लढ्यात भाग घेणे आवश्यक आहे.त्यासाठी पुणे महानगरपालिकेला ठरावाची अंमलबजावणी २४वर्षात का केली नाही.याबाबत म.न.पा.ला. विचारणा करावी ही विनंती आहे. आपल्या सर्व आंबेडकर जनतेने व संघटनेने हा लढा आपल्या निस्वार्थी व लोकशाही पध्दतीने हातात घेतला पाहिजे हीच अपेक्षा आहे.हा लढा सर्वांचा आहे भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समिती पुणे ..हा लढा लढत आहेच परंतु हा जागेचा लढा एका संघटनेचा नाही आपल्या सर्व समाज बंधू भगिनींनी मिळूनच लढावा लागेल.
जयभीम 🙏🌷🙏
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत