बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार देश विदेशात होऊ नये म्हणून समुद्र ओलांडून जाण्यावर ब्राह्मणांनी प्रतिबंध लावला होता ?

भारतामध्ये समुद्राच्या काळ्या पाण्याला ओलांडून जाण्यावर प्रतिबंध होता. असे जो कोणी करेल त्याला सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागत होता. इंग्लंड प्रवासाच्या वेळी गांधीजी ला या बहिष्काराचा सामना करावा लागला होता.
अगोदर स्वामी विवेकानंद यांना काळ्या समुद्राला ओलांडून जाण्याच्या निषेदाचे उल्लंघन करून अमेरिकेच्या शिकागो विश्वधर्म संसदेमध्ये भाग घेण्या संबंधात अनेक संकटाचा सामना करावा लागला होता.
शिकागो वरून हिंदू नायकाच्या स्वरूपात परत आल्यानंतर त्यांना रुढीवादी ब्राह्मणांच्या बहिष्काराचा सामना करावा लागला होता.
त्यामुळे त्यांनी असे कठोर प्रतिबंध लावण्या मागच्या कारणांचा शोध घेतला. संन्यासी, हिंदू संत परिवाराचे सदस्य असल्या नात्याने त्यांना या रहस्यचा पत्ता लागणे सहज होते की धार्मिक नेत्यांवर हा प्रतिबंध का लावला गेला आणि कठोरपणे त्याचे पालन का केल्या जाते.
शोध केल्यानंतर त्यांनी आपले मत व्यक्त केले की विदेशी यात्रा करण्याची जर परवानगी दिली तर बौद्ध धम्माच्या प्रसाराची प्रक्रिया जलद गतीने होईल. डोक्यात ही भीती असल्या कारणामुळे समुद्र ओलांडून जाण्यावर प्रतिबंध लावल्या गेल्या होता.
स्वामी विवेकानंद दीर्घकाळापर्यंत समुद्र ओलांडून जाण्याला प्रतिबंध का लावण्यात आला होता याचे कारण ते समजू शकले नव्हते. समुद्र गोलांडून जाण्याची प्रथा चालू राहिली तर विदेशातून बौद्ध धम्माचे विचार भारतात येईल आणि भारतातील बौद्ध धर्माचे विचार विदेशात जाईल या सूत्राला ते समजू शकले नव्हते.
स्वामी विवेकानंदांना हे तेव्हा समजले की जेव्हा भिक्खू डॉ. गुणरत्न श्रीलंके वरून 28 बुद्धांची नावे घेऊन भारतात आले. भारतातील बौद्ध साहित्य सामग्री चे उगमस्थान पूर्णपणे नष्ट केल्या गेले होते.
बुद्धाचा विष्णूच्या नव्या अवताराच्या रूपामध्ये अपहरण करून त्यांना हिंदू भगवान बनवण्यात आले होते. अशा परिस्थितीमध्ये बुद्ध आणि त्याचा धर्माविषयी जाणून घेण्यासाठी एक मात्र विदेशातच साहित्य उपलब्ध होते.
म्हणून ब्राह्मणांनी तिबेटची राजधानी ल्हासा शहराला प्रतिबंधित शहर (कारबिडन सिटी) म्हणून घोषित करणे ब्राह्मणांना आवश्यक वाटत होते. त्यांना सिलोन, बर्मा, चीन आणि जपान सारख्या देशांना विदेशी भूमी म्हणून घोषित करावे लागले होते.
समुद्र ओलांडून जाऊ नये. किती दया येत आहे. ब्राह्मणांनी भारताला जगापासून एकटे पाडून संवादहीनता असणारा देश बनवण्याला प्राथमिकता दिली. देवाधर्माच्या नावावर धर्मादेश काढल्या जात होते. ब्राह्मणांना सोडून सर्वांना शिक्षण आणि ज्ञानापासून वंचित केल्या गेले होते.
ब्राह्मण आणि क्षत्रिय यांना सोडून इतर कोणीही शस्त्र धारण करणार नाही. या कारणा मुळे भारत आपली शक्ती ,जाणीव आणि बौद्धिक शक्ती सोबतच पूर्वीची दृष्टी हरवून बसला.
बौद्ध भारतातील विश्वविद्यालय, कॉलेज आणि विहार जिथे जगभरातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत होते ते बंद करण्यात आले, ते नष्ट करण्यात आले. ब्राह्मणांनी भारत देशाला त्यांच्या खाजगी घराच्या स्वरूपात परिवर्तित केले. भारतातील विश्वविद्यालयामध्ये विदेशी विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येणे बंद झाले.
भारतात विदेशी जहाजे येणे बंद झाले. बौद्ध भारतामध्ये विदेशी लोकांचे येणे जाणे बंद झाल्यामुळे विदेशी चलन सुद्धा येणे बंद झाले. प्राचीन रोम सोबत व्यापार चालत होता. भारतामध्ये कुठलीही नौसेना शिल्लक राहिली नव्हती. दुसऱ्या बाजूला इंग्रज ,पोर्तुगीज आणि फॅन्सी समुद्र मार्गे भारतात येत होते. ब्राह्मणांनी भारताला भिकाऱ्याच्या लाईन मध्ये उभे केले होते.
इंग्रजांनी बुद्ध आणि त्याच्या धम्माला विदेशी लेखकांच्या मिळालेल्या माहितीच्या आधारे मातीच्या ढिगार्यातून शोधून काढले. म्हणून म्हणतो ब्राह्मणवाद या देशाची अधोगतीच करेल. ब्राह्मणांच्या नेतृत्वात भारत कधीही विश्वगुरू होऊ शकत नाही.(संदर्भ,बौद्ध धर्म: मोहनजोदडो, हडप्पा नगरों का धर्म, या पुस्तकाचे लेखक स्वपन कुमार बिश्वास यांच्या मनोगतामधून, पृ. क्र.19, मराठी अनुवाद: प्रा. गंगाधर नाखले)
03/12/2024
9764688712
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत