महापरिनिर्वाण दिनमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणविचारपीठ

परमपुज्य बाबांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी प्रतिज्ञा


बाबासाहेब! तुम्ही नसता, तर कदाचित आजचे हे माणूसकीचे जीणे नशीबी आलेच नसते. माणूसच आपले नशीब घडवित असतो, हे बुध्दवचन आपण आपल्या उदाहरणाने सर्वार्थाने अक्षरशः सार्थ करून दाखवले आहे. आज आपले श्रध्देने स्मरण करीत असताना, आपल्या आदर्शाच्या पालनाची यथाशक्ती प्रतिज्ञा करून आपल्या स्मृतीस मी विनम्र अभिवादन करीत आहे.
1- आपल्या आदर्शाच्या विसंगत आणि विरूद्ध असे कोणतेच कर्म करणार नाही, अशी मी प्रतिज्ञा करतो. 🧎🏻
2- आपल्या सांगण्याप्रमाणे मी श्रध्दामय चित्ताने बुध्द, धम्म आणि संघाच्या अनुसरणाची प्रतिज्ञा करतो. 🧎🏻‍♀️
3- माझ्या मुला-बाळांना धम्म संस्काराची दीक्षा देऊन त्यांना धमक्रांतीचे पाईक बनविण्यात मी दक्ष राहिन अशी प्रतिज्ञा करतो.
4- पंचशीलांच्या पालनात माझ्या कडून ढिलाई होणा-या खालील शीलाच्या गंभीर पालनाची प्रतिज्ञा करतो.
अ. काया, वाचा, मनाने घडणा-या हिंसेपासून आणि एकंदरीत हिंसक वृत्तीपासून अलिप्त राहण्याची मी प्रतिज्ञा करतो. 🧎🏻‍♀️
ब- चोरी, लबाडी, फसवणूक, पिळवणूक, भ्रष्टाचार, विनाकष्ट फुकटची प्राप्ती करण्यापासून अलिप्त राहण्याची मी प्रतिज्ञा करतो. 🧎🏻
क. लैंगिक दुराचार तसेच स्त्रियांशी असभ्य वर्तन करण्या पासून अलिप्त राहण्याची मी प्रतिज्ञा करतो. 🧎🏻‍♀️
ड. खोटे बोलने, कठोर बोलणे, निंदा- चहाडी करणे आणि व्यर्थ बडबड करण्यापासून अलिप्त राहण्याची मी प्रतिज्ञा करतो. 🧎🏻
इ. तंबाखू खाणे, धुम्रपान करणे, गुटका-खर्रा खाणे, नशापाणी करणे या व्यसनांपासून अलिप्त राहण्याची मी प्रतिज्ञा करतो. 🧎🏻‍♀️
5- आपणास अभिप्रेत संघाचा आदर्श गिरविण्यासाठी मी प्रत्येक बौद्धाशी एकत्व आणि ममतेच्या भावनेने वागेन अशी प्रतिज्ञा करतो. 🧎🏻
6- एक बौद्ध अनुयायी म्हणून आपल्या आदर्शाला बाधा येणार नाही आणि भारतीय बौद्धांमध्ये सांप्रदायिकता फोफावून त्यांच्यात फाटाफूट व बेकी होणार नाही याची दक्षता घेण्याची मी प्रतिज्ञा करतो 🧎🏻‍♀️
7- बुध्दधम्मात नसलेली गुरूपरंपरा स्वीकारून कोण्या भिक्षूस किंवा ईतर कोणालाही गुरू न मानता आणि त्याच्या संप्रदायाचे किंवा पंथाचे गुलाम न होता आपल्या असांप्रदायिक ध्येयानुसार केवळ कल्याणमित्रतेचा अंगिकार करण्याची मी प्रतिज्ञा करतो. 🧎🏻
8- बुध्द धम्माचा पाया शील आहे. त्याचेशी विसंगत धम्म समजूतीच्या मी कच्छपी लागणार नाही. कारण त्यामुळे इतिहास काळात भारतातून धम्म हद्दपार झालेला होता, हे लक्षात ठेवून त्याची पुनरावृत्ती होण्यासारखे बेजबाबदार वर्तन कधीही न करण्याची मी प्रतिज्ञा करतो. 🧎🏻‍♀️
9- मंडळ, संघटना, संस्था या सार्वजनिक सेवेसाठी असतात. त्यात वावरत असतांना सेवाधर्म पाळण्याची आणि त्यांना त्रिरत्नांपेक्षा श्रेष्ठ न मानता धम्मजीवनात संघनिष्ठेने एकसंघ राहण्याची मी प्रतिज्ञा करतो. 🧎🏻
10- धम्मकार्यात कार्यकर्ता किंवा नेता न होता, मी केवळ धम्मसेवक बनून संघभावनेने वागण्याची आणि सार्वजनिक मालमत्तेचा मालक किंवा मक्तेदार न बनण्याची मी प्रतिज्ञा करतो.
11- बाबासाहेब, आपल्या परिशुध्द चरीत्राचे अनुसरण करण्याची मी प्रतिज्ञा करतो. 🧎🏻‍♀️
12- आपल्या दीर्घ चिकाटीने यश मिळविण्याच्या चांगल्या विचारांचे अनुसरन करण्याची मी प्रतिज्ञा करतो. 🧎🏻
13- आपल्या असीम मैत्री- करूणेच्या सदगुणांचे अनुसरण करण्याची मी प्रतिज्ञा करतो. 🧎🏻‍♀️
14- आपल्या नेतागिरी धिक्कारून समर्पित भावनेने सेवाकार्य करण्याच्या चांगल्या विचारांचे अनुसरन करण्याची मी प्रतिज्ञा करतो. 🧎🏻
15- आपल्या विभूतीपूजेच्या त्यागाच्या आदर्शाचे अनुसरन करण्याची मी प्रतिज्ञा करतो. 🧎🏻‍♀️
16- आपल्यासारखे भयमुक्त होऊन धैर्यशाली जीवन जगण्याच्या चांगल्या विचारांचे अनुसरन करण्याची मी प्रतिज्ञा करतो. 🧎🏻
17- आपल्यासारखे दीन दुबळ्यांसाठी सर्वस्व अर्पण करण्याच्या सदगुणांचे अनुसरन करण्याची मी प्रतिज्ञा करतो. 🧎🏻‍♀️
18- आपल्यासारखे ज्ञानतपस्वी होण्यासाठी निरंतर अध्ययन, चिंतन- मनन करण्याच्या सदगुणांचे अनुसरन करण्याची मी प्रतिज्ञा करतो. 🧎🏻
19- माझ्या उत्पान्नाचा विसावा भाग केवळ आपल्या आयपती नुसार धम्म कार्यासाठीच देण्याची मी प्रतिज्ञा करतो. 🧎🏻‍♀️
20- आपल्या इच्छेप्रमाणे केवळ पोटाचे पाईक न होता, समाजाच्या भवितव्याच्या साठी झटण्याची मी प्रतिज्ञा करतो. 🧎🏻
21- माझ्या जुन्या जातीय मनोवृत्तीचा आणि जातीच्या लांछनाचा त्याग करण्याची मी प्रतिज्ञा करतो. 🧎🏻‍♀️
22- माझ्या स्वाभिमानास कलंक असलेल्या आणि जातीयतेचा दुर्गंध सोडणा-या तिरस्करणीय नावाच्या त्यागासाठी नामांतर करण्याची मी प्रतिज्ञा करतो.
भदंत विमलकित्ती गुणसिरी
🌴🪂🧎🏻‍♀️🧘🏻‍♂️🤷🏻‍♂️🧎🏻🌳🌱
जयभीम नमो बुध्दाय.
महानाग साक्यमुनि विज्जासन
भारतातील पहिली बुद्धिस्ट सेमिनरी

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!