सत्तेसाठी काय पण!
बाप नाही लेकात
लेक नाही बापात
कोणी ना धाकात
या अट्टहासापाई
सत्तेसाठी काय पण!
कोणी दावणीला
कोणी टांगणीला
कोणी गद्दारीला
या नारदापाई
सत्तेसाठी काय पण!
तुला एवढे देतो
तुला तेवढे देतो
हेही अमिश देतो
या सुडबुध्दीपाई
सत्तेसाठी काय पण!
कुणाचा बळी घेतो
कुणाचा काटा काढतो
हा म्होरक्या पाठवतो
या पुढारपणापाई
सत्तेसाठी काय पण!
निवडणुक लढवितो
ही खिरापत वाटतो
ही अस्वासन देतो
या भरवश्यापाई
सत्तेसाठी काय पण!
राजकारण आहे
समाजकारण आहे
भले कश्यात आहे
या जनहितापाई
सत्तेसाठी काय पण!
गरिब श्रीमंत दरी आहे
गरिब भरडला जातो
श्रीमंत श्रीमंत होतो
कोण विचार करतो
या या भुकेपाई
सत्तेसाठी काय पण!
पुरण कथा वाचले
आहे थोतांड पाहिले
नकोते आमलात आनले
भाकडकथेपाई
सत्तेसाठी काय पण!
कोणी वाघ होतो
कोणी मांजर होतो
कोणी धुर्तपणे वागतो
याच स्वार्थापायी
सत्तेसाठी काय पण!
कोणी मित्र जोडतो
कोणी मित्र तोडतो
कोणी संघटन करतो
या वर्चस्वापाई
सत्तेसाठी काय पण!
सत्ता कोणाचीही येवो
अवघे जनहीत पाहो
जगती समाधानी रहो
या संसारापाई
सत्तेसाठी काय पण!
मो.9967394281
डॉ खं र माळवे-खरमा
राष्ट्रपती पुरस्कार विजेते
khandumalve5@gmail.com
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत