विरोधकांचा सुपडा साफ व्हायलाच पाहिजे…
समाज माध्यमातून साभार
जो पर्यंत प्रगत राष्ट्राप्रमाणे भारतात पुन्हा पारंपरिक मतपत्रिकेवर मतदान घडवून आणले जात नाही तोपर्यंत लोकशाही अशीच पायदळी तुडवली जाणार .
मा. वामन मेश्राम साहेब गेली अनेक वर्षे देशात व परदेशात फिरून या EVM च्या विरोधात आवाज उठवीत आहे , प्रबोधन करीत आहे. पण महात्मा जोतिबा फुले यांनी म्हणाल्या प्रमाणे या देशात भटजी – शेठजी हातात हात मिळवून देशातील बहुजन हिंदूंना लुटण्याचे काम करीत आहेत .
विरोधी पक्षातील मग ते उद्धव ठाकरे असो वा शरद पवार असो वा अन्य कोणी … या सर्वांनी या EVM च्या गैरप्रकाराच्या विरोधात आवाज उठवायला पाहिजे होता . पण त्यांची नक्की काय मजबुरी आहे ते समजायला तयार नाही . म्हणूनच आज महाराष्ट्रात त्यांचा पराभव होताना दिसत आहे . मला तर वाटते या अंध (का मजबूर ) विरोधकांचा सुपडाच नाहीसा व्हायला पाहिजे . जो पर्यंत हे बुडावर चांगले रपटून आदळत नाही तोपर्यंत यांची पण अक्कल ठिकाणावर येणार नाही . स्वतः तंत्रज्ञानातील बादशहा असलेल्या ऍलन मस्क याने EVM हॅक होऊ शकतात व त्याद्वारे निकाल फिरवला जाऊ शकतो हे निर्विवाद कोणाचीही भिडभाडं न ठेवता जाहीरपणे सांगितले तरी विरोधकांचे आणि सामान्य जनतेचे डोळे उघडायला तयार नाही . अमेरिकेत लपून बसलेला EVM तज्ञ सय्यद शुजा याने कपिल सिब्बल यांच्या उपस्थितीत EVM कसे हॅक करता येऊ शकते याचा LIVE डेमो दिला होता . ‘भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड’ जेथे या EVM मशिन्स तयार करतात , जपान मध्ये तयार केलेली मायक्रोचिप त्यात बसवली जाते, या कंपनीतील काही तंत्रज्ञ गायब केले गेले वा त्यांना या जगातून नाहीसे केले असे खुद्द त्यातून वाचलेला व अमेरिकेत आश्रय घेतलेल्या सय्यद शुजा ने जाहीरपणे सांगितले आहे . त्याच अमेरिकेत हे EVM मशिन्स काही मिनिटात हॅक करून दाखवण्यात आली होती .
त्याच प्रमाणे भारतात सुद्धा या EVM चा गैरवापर करून निकाल बदलता येतात हे गुजरात मधील सॉफ्टवेअर इंजिनीअर राहुल चिमणभाई पटेल यांनी LIVE डेमो दाखवून अनेकदा सिद्ध केले होते . असे अनेकांनी हे EVM मशिन्स विश्वासार्ह नाहीत हे जगाला ओरडून ओरडून सांगितले पण ‘सत्तेपुढे आणि पैश्यापुढे दुनिया झुकती है’ हे पुन्हा एकदा सिद्ध झाले .
म्हणूनच मला वाटते की केवळ ५ – ५० जागा विरोधकांना मिळून काहीच फायदा नाही . यांना एकही जागा मिळता कामा नये तेव्हाच यांची अक्कल ठिकाणावर येईल .
ज्या प्रमाणे भटांनी हातातील लेखणीचा वापर करून खोटा इतिहास लिहून बहुजन हिंदूंना शेकडो वर्षे भ्रमित केले होते , बहुजनांवर सत्ता गाजवली होती . पण महापुरुषांच्या त्यागामुळे बलिदानामुळे बहुजन हिंदूंना शिक्षणाची संधी मिळाली व याच बहुजनांनी भटांनी लिहलेल्या खोट्या इतिहासाची पाळेमुळे खणून काढली त्याचप्रमाणे आज ना उद्या हा बहुजन हिंदू समाज जागृत होईल व या EVM च्या विरोधात एकत्र रस्त्यावर उतरून आंदोलन करील तेव्हाच काँग्रेस असो वा आजचा BJP असो यांनी या EVM चा गैरवापर करून देशातील बहुजन हिंदूंना कसे लुटले हे वास्तव बाहेर येईल …
तोपर्यंत न्यायप्रिय सामान्य जनतेने या EVM च्या विरोधात जनजागृती व प्रबोधन करीत राहिलेच पाहिजे तेव्हाच भविष्यात लोकशाही जिवंत राहील .
लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सर्व न्यायप्रिय बहुजन हिंदूंनी एक व्हावे…
बहुजन हिताय, बहुजन सुखाय…✊
🙏🙏🙏
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत