गोलमाल 2024!
शिवसेना-भाजप पक्की युती असताना, स्वतः बाळासाहेब अन् प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे,एकनाथ खडसे असे संघटनातील जबरदस्त नेते असताना जी कामगिरी झाली नाही,ती आता आज एकाएकी अचानक अशी कुठल्या चमत्काराने झाली? तीही सुमार, टिनपाट नेत्यांच्या जोरावर?सगळं अत्यंत संशयास्पद आणि गोलमाल आहे. महाराष्ट्रात फिरून वातावरणाचा अंदाज घेतलेल्या कुणालाही हे निकाल आजिबात पटणारे नाहीत. 40 गद्दार घेऊन गेलेल्या माणसाचे संख्याबळ 60 वर कसे जाऊ शकते? शरद पवारांच्या, उद्धव यांच्या जागा इतक्या कमी आणि पक्ष पळवणारे दोन्ही तुपात,कुणाला आणि कसे पटेल हे? मोदी मॅजिक संपलेली असताना, मोदी-शाह यांच्यावर महाराष्ट्रातून पळून जाण्याची वेळ आलेली असताना, इतक्या सुमार कुवतीच्या नेत्यांनी राज्यात आजवर कधीही न झालेली भाजपची ऐतिहासिक कामगिरी एकट्याने नोंदविली आहे? ब्रह्मदेवाचा बाप आला तरी हे कोडे सुटणारे नाही. आता कदाचित उगाच RSS चे नाव पुढे करतील; पण मग झारखंडमध्ये ते संघटन का चालले नाही? आतापर्यंत भाजप, आरएसएस आणि गोदी मीडियाच्या एका तरी माई का लाल ने हे असे होईल,हे सांगितले होते का? काही चॅनेली चाटूंच्या अंगात फेफरे भरेल आता.*
गद्दार,महाराष्ट्रद्वेष्टे यांनी स्वतः तुरुंगात जाण्यापासून वाचण्यासाठी आणि अदानीला तुरुंगात जाण्यापासून वाचविण्यासाठी केलेला हा काहीतरी जबरदस्त झोलमाल आहे. काय आहे, ते नेमके सांगता यायचे नाही; पण हा महाराष्ट्राला, मराठी माणसाला न पटणारा कौल आहे. हे महाराष्ट्राचे जनमत नक्कीच नव्हे! चौकीदार चोराने तडीपाराला हाताशी धरुन काहीतरी जबरदस्त गेम केलाय. EVM कडे बोट दाखवत येऊ नये म्हणून झारखंड बलिदानाची सोय केली. तिथे उलट वातावरण सत्तेविरोधात होते. आता हे महाराष्ट्रद्वेष्टे, मोरारजी प्रवृत्तीचे राक्षक, महाराष्ट्राच्या मातीतील फितुर, गद्दारांना हाताशी धरून मुंबईचा लचका तोडणार, महाराष्ट्र गुजरातला आणि अदानी-अंबानीला गहाण टाकणार! मराठी माणसाला भिकेला लावणार! कौरवांच्या सेनेने महाराष्ट्राचा विश्वासघात केला आहे. स्वाभिमानाची अन् मुंबई, महाराष्ट्र वाचविण्याची लढाई मराठी माणूस हरला आहे, याचे अतीव दुःख अन् वेदना आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत