पुरोगामी विचारांची पिछेहाट
महात्मा ज्योतीराव फुले छत्रपती शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्नांनी वैदिक परंपरेच्या व्यवस्थेला आव्हान देऊन ब्राम्हण वर्चस्वाला धक्का दिला
ज्यांनी गुलामीला स्विकारून तेच जिणे जगण्यास स्वखुषीने मंजूर केले.देव धर्माचे जोखड मानेवर घेऊन वावरत राहिले. त्यांच्यात स्वाभिमान माणूसकीची जाणिव करून ज्ञानाची ज्योत प्रज्वलित केली.नव व्यवस्थेची पहाट उजाडली.समाज खळबळून जागा झाला . शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित झाले.शिक्षणामुळे अंधकाराची ओळख होऊन उजेडाकडे प्रवाश सुरु झाला.
एक नवे वातावरण तयार झाले.जात व्यवस्था खिळखिळी होऊन पहात होती समता बंधुत्व करूणा ह्या जीवनमूल्ये रूजविण्याचा मार्ग मोकळा झाला होता त्यामुळे येथील प्रस्थापित व्यवस्था चिंतेत होती. त्यांनी ह्या विरोधात मोर्चेबांधणी करणे सुरू केले.जातीचा उच्च निचतेचा फायदा घेऊन तुमच्या खाली सुद्धा जात आहे.हे मनावर बिबविले. हिन्दु च्या नावांनी सर्वांना एकत्रीत करून आपण हिन्दु म्हणून एक आहोत ही भावना रूजविली.
मुस्लिमांचा धाक दाखवून हिन्दु राष्ट्राच्या दिशेने वाटचाल सुरू झाली.
बहुजन समाज याला बळी पडला. त्यांचे अवेतनिक सैनिक झाले. ज्यावेळी ब्राम्हणशाहीला अडचण निर्माण झाली त्यावेळी त्यांच्या मदतीला धाऊन जाण्याचे काम बहुजन समाजाने केले.
ओबिसीच्या मुक्ती साठी मंडल आयोग आला त्यावेळी बहुजनसमाज राममंदिर बांधण्यासाठी विठा वाहण्यात मशगुल झाला.
मंडल आयोगाची लढाई लढत असताना येथिल जागृत आंबेडकरी समाज व ओबीसी तील जाणकार नेते आघाडीवर होते. व्ही पी सिंहांना आपली राज सत्ता डावावर लाऊन मंडल आयोग लागू झाला ओबिसीना 27/टक्के आरक्षण मिळाले.
समाज परिवर्तनाची लढाई लढल्याच गेली नाही.
केवळ फुले शाहू आंबेडकर यांच्या नावाचा घोष केला जातो.परतु कृती ब्राम्हणी व्यवस्था मजबुत करण्याचीच असते.
आज हिन्दु एकतेचा नारा देऊन परत ओबिसीची फसगत करण्याचा डाव खेळल्या जात आहे.
हे ओळखून समता एकता बंधुता करूणा ह्या मूल्यांवर आधारित समाज व्यवस्था आणण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे.
आज प्रस्थापित व्यवस्था सर्वच क्षेत्रात सर्वांना आपल्या कवेत घेऊन आपलीं अधिसत्ता कायम करित आहे.
पुरोगामी अनेक भागात विभागले आहेत त्यांचा अहंकार त्यांना एकत्र येऊ देत नाही.
आज गरज आहे आपसातील मतभेद अहंकार बाजूला सारून एकमताने एकजुटीने प्रस्थापित व्यवस्था उघडण्यासाठी संघर्ष करण्याची
फूले आंबेडकर शाहू यांचे स्वप्न साकार करण्याची
विनायकराव जयवंतराव जामगडे
9372456389
7823093556
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत