नेता बौद्ध, ओबीसी समाजाचा असला की त्याला बी टीम का म्हणतात?
समाज माध्यमातून साभार
आपल्या देशाच्या राजकारणात मागासवर्गीय वंचित जनतेचा पक्ष असेलतर त्या पक्षाला आणि त्यापक्षाच्या नेत्याला बी टीम किंवा मत खाण्यासाठी उभे राहणारे अशी दूषणे देण्यात येतात पण त्याच वेळी सवर्ण जातींचे कितीही पक्ष असलेतरी त्या पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना बी टीम असे काही म्हणायची हिम्मत कोणी करत नाही..
उदाहरण घ्यायचे झाल्यास महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेतृत्व असलेले ६ पक्ष निवडणूकीत उतरले आहेत. यापैकी जरांगे पाटील गटाने वेळेवर माघार घेतली..
१.राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
२.राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट*
३.शिवसेना (शिंदे गट)
४.प्रहार (बच्चु कडू)
५.महाराष्ट्र स्वराज्य पक्ष (संभाजी राजे)
६. जरांगे गट
तर विषय असा आहे की मराठा समाजाचे नेते असलेले एवढे पक्ष निवडणूक लढत आहेत तेंव्हा या मराठा नेत्यांना कोणी भाजपची किंवा काँग्रेसची बी टीम म्हणत नाही..महाराष्ट्र काँग्रेस, भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही सेना यापैकी कोणीही संभाजी राजेंना आणि त्यांच्या पक्षाला बी टीम म्हणत नाही. इथे बी टीम फक्त ॲड.बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीलाच म्हटले जाते याचे कारण म्हणजे सवर्ण जातींचे कितीही पक्ष असले कितीही नेते असलेतरी या लोकांना फरक पडत नाही.. यांना बौद्ध नेता , ओबीसी नेता, दलीत नेता, भटका विमुक्त नेता नको असतो. ॲड.बाळासाहेब आंबेडकर सारखे वंचितांच्या मुद्यांवर राजकारण करणारे नेते नको असतात.. याच मुळे महाराष्ट्रात मराठ्यांचे इतके पक्ष लढत असतानाही त्यांना कोणी बी टीम म्हणत नाही, बी टीम फक्त वंचित बहुजन आघाडीलाच म्हटलं जात.
बरं ही जात पाहून बी टीम म्हणण्याच्या कारस्थानातून महाराष्ट्रात कायस्थांच्या दोन्ही पक्षांना सुद्धा सुट आहे हे विशेष ( शिवसेना उबाठा आणि मनसे)
सर्व जातीवादी पक्ष आणि नेते सतत ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या मागासवर्गीय नेत्याला संपवायचा प्रयत्न करत आले आहेत, आताही करत आहेत आणि पुढेही करतील.. पण यांच्या कारस्थानाला घाबरून ऍड.बाळासाहेब आंबेडकर थांबणार नाहीत आणि आपणही थांबणार नाही…
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत