ईव्हीएम चा राज्यात ठीक ठिकाणी खेळखंडोबा ईव्हीएम हटवून बॅलेटपेपर निवडणुका घ्याव्यात
– प्रा. देविदास इंगळे
नांदेड जिल्ह्यात शहरात रविनगर ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्यामुळे मतदान प्रक्रिया दोन तास रखडली.
किनवट तालुक्यात अंबाडी सकाळी आणि दुपारी दोनवेळा बिघाड किमान दोन तास वेळ गेला.
लोहा तालुक्यातही एका ठिकाणी ईव्हीएम बंद पडले.
अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी बंद पडले.
पुणे जिल्ह्यात सुद्धा ईव्हीएम बंद पडले कुठे बिघाड आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला येथे दोन मतदान केंद्रावर मशीनमध्ये बिघाड मतदान खोळंबळे.
चंद्रपूर येथे मशीनचे बटन अडकले आणि मतदान थांबले.
अशा अनेक ठिकाणी मतदान थांबल्यामुळे मोठया मुश्किलीने
मतदान वाढावे म्हणून प्रयत्न करण्याला खिळ बसते.
कारण मतदार कंटाळून मशीन दुरुस्त होईल नाही होईल या भीतीने निघून गेला तर पुन्हा तिथे येणार नाही.
मारताळा, वाका, वाळकी, कापसी येथे मशीन बंद पडल्यामुळे रात्री 8 वाजेपर्यंत मतदान सुरु होते.
ईव्हीएम मशीन मध्ये गडबडी, घोळ करणे, ईव्हीएम बदलणे, बंद पडणे अशा तक्रारी देशातून भरमसाठ असतांना सरकार व निवडणूक आयोगाने दखल न घेता ईव्हीएम हटवले नाही. अशा घटना राज्यात व देशात अनेक ठिकाणी घडत आहेत म्हणून ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात.
अशी मागणी आम्ही राष्ट्रीय संविधान बचाव अभियान तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात करणार.
सर्व पक्ष व संघटनानी ही मी मागणी ईव्हीएम हटाव बॅलेट पेपर लाओ सरकारकडे लावून धरावी ही विनंती.
धन्यवाद
आपला स्नेही
प्रा. देविदास इंगळे
राष्ट्रीय अध्यक्ष
राष्ट्रीय संविधान बचाव अभियान.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत