भारतीय मतदार नागरिकांनों उद्याचा भारत उद्योगपती भांडवलदारांचा गुलाम असेल,तुम्ही काय करणार !
मतदार बांधवांनो,तुम्ही कुण्या ही जाती-धर्माचे वंशाचे असा भारतीय जनता पार्टी जर सरकारमध्ये राहिली तर हा भारत देश केवळ 20 वर्षासाठी आहे आणि जर काँग्रेस सत्तेमध्ये राहिली तर जास्तीत जास्त हा भारत 40 वर्षाचा असेल ! पुढचा भारत हा कंपन्यांचा खाजगी कंपन्यांचा गुलाम असेल ! आता तुम्ही ठरवा उद्योगपती भांडवलदारांची हजारो कोटीची कर्ज माफ करणाऱ्या भाजपा/काँग्रेसला सत्तेत आणायचं की “संविधानप्रेमी” “आरक्षणवादी” वंचित बहुजन आघाडीला…..
आज आपण सरकारने दिलेल्या पंधराशे (1500/-) रुपयांवर खुश आहोत.परंतु आपणाला पंधरा हजार रुपये देऊन दुसऱ्या बाजूला जीएसटी च्या माध्यमातून देशातील प्रत्येक जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढविले याकडे मात्र आपण पाहत नाहीत. एक बाजूला महाराष्ट्र सरकार असो किंवा केंद्र सरकार असो आपणास छोट्या छोट्या आर्थिक लाभाच्या योजना देते आणि दुसऱ्या बाजूला अरबो खरबो रुपयांची कर्ज उद्योगपती भांडवलदारांची माफ करतं तर या आर्थिक तुटीचा भार आपल्या सर्वांवरच पडणार आहे हे का आपण लक्षात घेत नाहीत.
भारतातील बडा उद्योगपती भांडवलदार पुंजीपती वर्ग आणि सत्तेत असणाऱ्या काँग्रेस समाजवादी भारतीय जनता पार्टी यांचे मुख्य ध्येय म्हणजे भारतामध्ये बहुजन समाजावर गुलामगिरी लादणे होय.आणि यासाठीच कार्पोरेट उद्योग जग व भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसच्या आघाड्या भारतीय नागरिकांच्या “करातून” जमा केलेल्या पैशाच्या बळावर उद्योगपती आणि भांडवलदाराच्या हिताचे निर्णय घेऊन लोकशाहीच्या माध्यमातून हुकूमशाही उद्योगपती उद्योगपती भांडवलदारांचा राज्य निर्माण करण्यात येत आहे. जे बहुजन समाजाच्या कधीच हिताचे ठरणारे नाही.
भारत स्वातंत्र्याच्या 75 वर्षांमध्ये भारतातील बडे उद्योगपती भांडवलदार यांना पोहोचण्यासाठी तत्कालीन काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीने अरबो आणि खरबू रुपयाची कर्ज उद्योगपती भांडवलदारांची आतापर्यंत माफ केलेली आहेत.सरकारच्या तिजोरीतून निर्माण होणारी ही तूट आर्थिक तूट कोणाच्या खिशातून भरून काढण्यात येते याचा विचार सुज्ञ मतदारांनी करणे गरजेचे आहे.
आजच्या स्थितीला देशातील खाजगी कंपन्या कार्पोरेट कार्पोरेट उद्योग जग बहुजन समाजातील तरुणांची कशाप्रकारे हेळसान करते हे आपण कदाचित लक्षात घेतले नसावे. आपल्या घरातील एखादा कर्ता पुरुष जर एखाद्या खाजगी कंपनीत काम करत असेल तर त्याला थोडंसं विचारा की तो कशाप्रकारे नोकरी एखाद्या खाजगी कंपनीमध्ये करत आहे. आयटी तंत्रज्ञानाच्या बळावर एखाद्या शिक्षिकाला गुलाम बनून ठेवण्याचं काम ह्या सर्व खाजगी कंपन्या करतात.हे कोणीही नाकारू शकत नाही.
एक बाजूला धर्म आणि धर्माचा बुरखा तर दुसऱ्या बाजूला जातीय दंगली आणि धर्माच्या नावावर मताच्या ध्रुवीकरणाचा राजकारण करायचं आणि भारतीयांच्या हिताचे कोणतेच निर्णय घ्यावयाचे नाहीत असे धोरणं आतापर्यंतच्या काँग्रेस सरकारने आणि मागच्या दहा वर्षात भारतीय जनता पार्टीने घेतलेले आहेत.
वास्तविक पाहता मताधिकार मताधिक्याने बलाढ्य असलेला बहुजन समाज खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरणाचे भूमिका घेणाऱ्या भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसला आपले मतदान करत असतो. यातून ना कोणता धर्म जोपासला जातो ना कोणती नीती जोपासली जाते जोपासले जाते ते फक्त उद्योगपती भांडवलदारांचे हितसंवर्धन, उद्योग बड्या उद्योगपती आणि भांडवलदाराचे हित संवर्धन जोपासले जात असताना भारतीय बहुजन समाजातील गोरगरीब अडाणी अंध अपंग यांचे बौद्धिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या शारीरिक दृष्ट्या हाणनच करण्याचा प्रयत्न सातत्याने करण्यात येतो. मग अशा भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसच्या आघाड्यांना आपण मतदान का करावयाचे याचा विचार उद्या मतदान करताना प्रत्येक मतदाराने केला पाहिजे. तरच आपण संविधानाने मिळणाऱ्या नोकऱ्या,इतर सुविधा आणि आपापसातील भाईचारा कायम करू शकतो
लेखक,विजय अशोक बनसोडे
भारतीय बौद्ध महासभा धाराशिव (द)
जि.संस्कार उपाध्यक्ष,8600210090
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत