बुद्धिवंतांचा एकसूरी तमाशा
पानिपत च्या युद्ध भूमीवर मृत्यूशी झुंज देत असलेल्या दत्ताजी शिंदेना लाथेने ठोकर मारून अहमदशहा अब्दाली कुतशीतपणे म्हणाला, “क्यूँ पटेल अभीभी हमसे लडेंगे?”
दत्तजींनी बाणेदारपणे उत्तर दिले, ” बचेंगे तो और भी लडेंगे. “
विचारवंत नावाच्या पोटार्थी कळावंतांनी पोट मुरडून काळा आल्याप्रमाणे विव्हळत एक सूरी तमाशाचा फड उभारलेला आहे. वंचित नावाचे यांच्या आणि यांच्या मालकाच्या मानगुटीवर असे काही बसलेले आहे की त्यांना प्रत्येक श्वास घेताना आंबेडकर नावाचा जप करावा लागतोय. मोगलांच्या घोड्यांनी जशी संताजी, धनाजीची धास्ती घेतली होती अगदी तशीच धास्ती या कळावंताना पडलेली आहे. यांच्या ध्यानी, मनी, स्वप्नी आंबेडकर आंबेडकर हा एकच ध्यास लागलेला आहे….
मृत्यू शय्येवर पडून असलेल्या राजगृहाच्या वारसावर पिसाळलेले श्वान मालकाची आज्ञा म्हणून तुटून पडत आहेत. वेळ काळ याचे भान नसलेले कळावंत विनाकारण कळ उकरून काढतांना त्यांच्या कोत्यवृत्तीची कीव येते. घरफोडी करण्यात माहीर असलेले यांचे घरफोडे बाप महाराष्ट्रभरात किती घरफोड्या केल्या हे सबंध महाराष्ट्र जाणतो. आता राजगृहात ही गृह कलह लावण्याचा कित्येक वर्षांपासून प्रयत्न करीत होते.
त्यांच्या चॉकलेटला बळी पडून महाविकास आघाडीची वकिली करणारे ते आंतरराष्ट्रीय लीडर मोठी अपेक्षा ठेऊन होते पण घरफोड्या बापाने हात वर केल्यानंतर हताश झालेले जारांगे पाटलापुढे ढसा ढसा रडले. बापाने एवढा विश्वासघात करायला नको होता…. पण
माने, मेश्राम, केदार अशा दिग्गजाना जाणत्या राजाने झुलवत ठेऊन कडीपत्त्यासारखं फेकून दिलं तिथे काल पुनर्जन्म झालेल्या RPI ची कोण दखल घेतो?
एक कळावंत म्हणाले तीन आंबेडकर तीन दिशेला तोंड करून उभे आहेत आणि अपेक्षा करतात समाज एका दिशेने गेला पाहिजे….
भाऊ किती मुंढे किती दिशेला तोंड करून उभे आहेत? किती पवार किती दिशेला तोंड करून उभे आहेत? किती खडसे किती दिशेला तोंड करून उभे आहेत? किती ठाकरे किती दिशेला तोंड करून उभे आहेत याचा कधी अभ्यास केला का?
जारांगे पाटलांना काल ही समजावण्याचा प्रयत्न होत होता. आज ही समजावण्याचा प्रयत्न चालू आहे. राजकारणात कोणी कुणाचा कायम शत्रू नसतो. कोणी कुणाचा मित्र नसतो. विदेशी वंशाचा मुद्दा ज्यांनी उपस्थित केला होता तेच दातात हराळी धरून दोन्ही हात रुमालाने मागे बांधून 10 जनपथ येथे गेले आता गळ्यात गळे घालून फिरत आहेत……………..
किती लाळ घोटेपणा करावा याची ही काही सीमा असते.
राजगृहाच्या ताब्याचा थोडा इतिहास वाचला असता तर राजगृहातून बेदखल हा शब्द वापरला नसता…..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिनिर्वांना नंतर राजगृह कोणाचे हा वाद पेटवीला गेला. शेवटी राजगृहाची किंमत ठरविली गेली. 180000 रुपये माईसाहेबांनी भैयासाहेबांना द्यावे आणि राजगृह ताब्यात घ्यावे किंवा भैयासाहेबांनी माई साहेबांना 180000/रुपये दयावे आणि राजगृहाचा ताबा घ्यावा…. भैयासाहेबांनी माईसाहेबांना 180000/ रुपये दिले आणि दहा वर्षां नंतर राजगृहात राहायला आले. आपल्या सोबत्यांनी जसे PES हडप केलं तसं काही आंबेडकर कुटुंबाने केलं नाही
आंबेडकर परिवार एक आहे का नाही हे महत्वाचे नसून जनता कोणाच्या बाजूने आहे हे महत्वाचे आहे. लोकशाही आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपल्या विचाराप्रमाणे जीवन व्यतित करण्याचा अधिकार आहे. मरे पर्यंत राम राम म्हणणाऱ्यांची मुलं मुस्लिम किंवा ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे…. तुमचेच भाऊ बहीण तुमचे ऐकतात का?
कोणी काहीही म्हटले तरी कोणाच्या मागे जायचे हे जाणता ठरवील.
एक कळावंत म्हणाला, “तुमच्या बाळासाहेबांनी चाळीस वर्षात काय केलं?आठवले, गवई साहेबांनी कार्यकर्त्यांना दारूच्या दुकानाचे परवाने देऊन स्टॅन्ड केले.तुमच्या बाळासाहेबांनी असं कार्यकर्त्यांना काही दिलं का? “
मी म्हटले बरं झालं बाळासाहेबांनी समाज बर्बाद करण्याचे असे वाईट काम केलं नाही… बाळासाहेबांनी काय केलं ते महाराष्ट्रभरातल्या गायरन धारकांना विचारा. आदिवासीना विचारा, obc ना विचारा. संसदेतल्या दास्ताईवजास विचारा, सचिन माळी ला विचारा.
एक कळावंत म्हणाला की “बाळासाहेबांनी कार्यकर्त्याचीमाती केली. जुने सगळेच सोडून गेले……”
मी म्हटलं ज्यांना स्वतःच्या भाकरीची सोय करता येत नाही त्यांनी समाजकारण, राजकारणात पडू नये हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दिव्य संदेश आहे.जे काही मिळेल या भावानेने आले होते तसे ते निघून ही गेले. पण ज्यांना कसलीच अपेक्षा नाही ते 1987 पासून बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहेत. मुकुंद नरवाडे नावाचा आमचा एक पुढारी आहे. आजही बाळासाहेबांसोबतच आहे. छत्रपती संभाजी नगरच्या सभेत भेट झाली. आज ही तो तसाच करारी, निष्ठावान आहे. राजकारणात अमुक हा कट्टर फॅसिस्ट आहे. अमुक हा शेक्युलर आहे असा शिक्का मारु शकत नाही. शेक्युलर असलेले शेकडो काँग्रेसवाले आज कट्टर फॅसिस्ट होऊन बसलेत. इकडचे कट्टर फॅसिस्ट असलेले यांच्याकडे येऊन शेक्युलर झालेत… प्रश्न आहे तो पडळकरांचा. त्याला पक्षात का घेतलं.? याचं उत्तर आहे तथागतांनी अंगुलीमालास संघात जसे घेतले तसे पडळकरास पक्षात घेतले. आता बाहेर का गेले? याचं उत्तर आहे.. पेरलेल्या माणसामुळे. काल आलेला पोरगा हिरो झाला तीन लाखाची मते घेतली ही जलन उपराकरांना स्वस्त बसू देईना. मग खोड्या करायला सुरुवात झाली. जुनी माणसे नाराज होत असतील तर आपणच बाहेर गेलेलं बरं म्हणून पडळकर बाहेर पडले….
सोडून जाणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ही सोडून गेले होते.रनखांबे,राजभोज,पी.बाळू वगैरे…..
आमचा पक्ष म्हणजे तुकडोजी महाराजांची झोपडी.
येता तरी सुखे या
जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा
या झोपडीत माझ्या.
राजगृहाकडे तोंड करून भुंकत बसण्यापेक्षा अजूनही काही महत्वाचे प्रश्न आहेत हे आमच्या कळावंताना दिसत नाहीत. एक मंत्री पाच पोरं असूनही निवडणूक लढवीत आहे. तिसऱ्या अपत्याचा कायदा त्यांना लागू नाही का? सनासूदीच्या दिवसात तेलाचे भाव गगणाला भिडलेत. मुलांच्या वसतिगृहाचा निधी इतरत्र वळवीला गेला. याकडे डोळेझाक करून केवळ आंबेडकर कुटुंबाला टार्गेट करणे हा खुन्नसी सापाचा स्वभाव आहे.
एक मात्र खरे की सध्या वंचितने प्रचारात घेतलेली आघाडी मालकाच्या आणि कळावंताच्या गलेकी हड्डी बनलेली आहे. निष्पक्ष निवडणूक झाली तर वंचित पन्नास लाखाच्या पुढे मत घेऊ शकते. इतर उमेदवार मत मिळावे म्हणून नोट फॉर ओट हा फार्म्युला वापरतात तर इकडे अगदी उलट होत आहे. मतदार पाई पाई जमा करून हजारो रुपये वंचित च्या उमेदवारास देत आहेत.
कोणी वृद्धापकाळाची पुंजी वांचीताना देत आहेत तर कोणी खाऊ चे पैसे…… कोणी दागिने तर कोणी मंगळ सूत्र सुद्धा देत आहेत….
यामुळे कळा तर लागणारच
आता काय करणार?
भजन…….
कळा ज्या लागल्या जीवा
कुणाला काय हो त्याचे?
कुणाला काय सांगाव्या?
-कीर्ती जी
संदेश प्रसारक
अशोक तुळशीराम भवरे
संविधान प्रचारक/प्रसारक सिडको नांदेड.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत