सत्व आणि स्वाभिमान गहाण टाकून मालकांची चाकरी करणारे प्रा लक्ष्मण राव ढोबळे ,,,,,!
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• ऍड अविनाश टी काले , अकलूज
9960178213
••••••••••••••••••••••••••••••••••••
करमाळा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस श प पक्षाचे उमेदवार नारायण आबा पाटील यांच्या प्रचारासाठी साडे येथे झालेल्या सभे साठी प्रमुख वक्ते म्हणून हजर होते .
संपूर्ण महाराष्ट्र हे जाणतो की प्रा लक्ष्मणराव ढोबळे यांना कुणी मोठे केले होते परंतु 1995साली दलीत विद्यार्थ्यांना निळा व इतर विद्यार्थ्यांना भगवा ड्रेस देण्याच्या विरोधात थेट विधानसभेच्या हौद्यात उतरून युती सरकारचा निषेध करणाऱ्या , स्वामी निष्ठेचा आव आणणाऱ्या प्राध्यापक लक्ष्मण राव ढोबळे यांना सहकारी सुत गिरणी , शिक्षण संस्था ,पवार साहेबांनी दिल्या , 60,000विद्यार्थी त्यांच्या शाळेत शिक्षण घेत आहेत ,
पण मोहोळ चे मातंग समाजाचे नेते युवराज पवार यांनी मॅक्स महाराष्ट्र ला दिलेल्या मुलाखतीत हे स्पष्ट केले की , एका ही मातंग मुलाला डोनेशन घेतल्या शिवाय संस्थेत प्रवेश दिला जात नाही .(आधिकचे माहिती साठी मातंग समाजातील बांधवांनी त्यांचे शी संपर्क साधून खातरजमा करून घ्यावी)
प्रा लक्ष्मण राव ढोबळे हे मातंग समाजाचे आहेत का ? हा प्रश्न ही मागील कांहीं काळात उद्भवला होता , आणि या संबंधाने बीड कडील स्मृती शेष एकनाथ जी आव्हाड साहेब (जिजा)यांनी त्यांचे विरोधात संघर्ष ही केला होता .
2004साली उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातून ते शिवसेना पक्षाच्या कल्पना नरहिरे यांच्या कडून पराभूत झाले , आणि हा पराभव कै. लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या मुळे झाल्याचा आरोप करत , तत्कालीन उप मुख्यमंत्री विजयसिंह जी मोहिते पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस चे औंरगाबादमधील (आजचे छत्रपती संभाजी नगर)अधिवेशनात मोहिते पाटील यांच्या दुहेरी निष्ठा म्हणून सूर्यकांता पाटील , बबनराव पाचपुते या सारख्यांचे लॉबिंग करून त्यांनी जो धुडगूस घातला होता त्याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आम्ही ही होतो ,
शेतकरी आणि काळी आई याची उदाहरणे देत , बैलाची पेंड चोरून खाणाऱ्या गड्याला आपण बदलतो अशी वाक्य भाषणात फेकणाऱ्या प्रा लक्ष्मण राव ढोबळे यांनी शरद पवार नावाचा गडी की मालक का बदलला? या चे ही उत्तर द्यावे
जिल्हा परिषद , ते आमदारकी याची तिकिटे घरात घेतात म्हणून आ बबन दादा शिंदे यांच्या वर आरोप करताना , महाराष्ट्रातील सर्वच राजकीय घराण्याच्या घराणे शाहीचा ही परामर्श घ्यावा , आणि हाच प्रश्न आपल्या मालकाला पवार साहेब यांना ही विचारावा ,
6टर्म मध्ये 6 कारखाने काढले याचा उल्लेख जरूर करा पण सहकाराचे 50 कारखाने खाजगी कसे झाले याचा ही हिशोब पवार साहेबांना विचारण्याचे धाडस केंव्हा तरी करा
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन राज्य घटनेची महानता सांगताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या प्रयासाने मिळवलेल्या मागासवर्गीय समाजाच्या राजकीय , शैक्षणिक , प्रशासकीय नोकर भरती यावर 168 जात दाखले काढून धनगर समाजाने धनगर खाटीक बनून जो दरोडा दिवसा ढवळ्या टाकलेला आहे , त्या अधिकाराचे रक्षण कसे करायचे ? याचे कारण तुमच्याच मालकाने राजकीय सत्ता प्राप्ती साठी या प्रकाराला उत्तेजन दिले , त्यांना माळशिरस तालुक्यात तिकीट दिले , आणि त्याला राजकीय बळ मोहिते पाटील यांनी दिले ,
त्या मोहिते पाटील यांनी समर्थन दिलेल्या नारायण आबा पाटील यांना मागासवर्गीय समाजातील लोकांनी का मतदान करावे? याचे ही उत्तर द्यावे ,
छत्रपती शिवरायांचे नाव घेतले म्हणून कोणी आदर्श राज्यकर्ता बनत नाही ,
त्यांचा व्यवहार आणि वास्तव याचे खरे खुरे परीक्षण आज ना उद्या जनते समोर येणारच आहे ,
“लवासा ” निर्माण करताना पर्यावरणाचे कायदे किती धाब्यावर बसवले ,, आणि किती आदिवासी समाजाच्या जमिनी कायद्याला बगल देऊन खरेदी केल्या गेल्या , याचे ही उत्तर आज ना उद्या द्यावेच लागेल .
पवार साहेबांचे राजकारण हे सहकार सम्राटांच्या जीवावर उभे राहिलेले आहे , या सहकार सम्राटांच्या मोळीचे राजकारण हा त्यांचा आत्मा आहे , या राजकारणात दलितांचे कोणते स्थान आहे?
केरसुणी च्या घरात जन्म घेतला असे सांगून दांडाळ, (मराठा) वायलाट्या ( मटण) भोकुर ( महार) दुतवणे (खाणे) असे शब्दप्रयोग वापरून मातंग समाजाला किती दशके भावनिक करणार आहात ? नवबौध्द , मातंग समाजाच्या वाट्याला 6लाख कोटी बजेट असणाऱ्या महाराष्ट्रात आज ही मूलभूत बाबी पासून वंचित का रहावे लागत आहे ? यावर ही कधी तरी आवाज उठवा ,,,,
देशाच्या स्वातंत्र्यानंतर ही ताराचे कुंपणात बंदिस्त राहिलेल्या भटक्या विमुक्तांच्या जातीच्या कपाळावर मारलेला गुन्हेगारीचा शिक्का ज्या जवाहरलाल नेहरू यांनी मोडीत काढून त्यांना मुक्त केले ,
गांधी आणि काँग्रेस ची विचारसरणी सांगणाऱ्या प्रा लक्ष्मण राव ढोबळे यांनी त्यांच्या भाषणात शिंदे बंधू यांना चोर ठरवताना किमान दहा वेळा “पारधी” ही उपमा दिली आहे ,
हा एका जातीचा उपमर्द करण्याची हिंमत ढोबळे सरांची झाली याचे कारण हा समाज गरीब आहे आणि व्यवस्थेमध्ये तो आपले कांहीं बिघडवू शकत नाही असे त्यांना वाटते ,
आम्ही या त्यांच्या वृत्तीचा जाहीर निषेध करतो
प्राध्यापक लक्ष्मण राव ढोबळे सरांनी ही बाब लक्षात ठेवावी की क्रांतिकारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे
“मला रडणारी माणसे आवडत नाहीत , मला लढणारी माणसे आवडतात ,,”
लहुजी वस्ताद यांची ओळख ही शुर योध्ये म्हणून आहे ,
“भेटला मांग फिटला पांग ” म्हणत स्वतः ची झोळी पुढे करून राजकारणात “डंगरा” बैल झाल्या नंतर आपल्या मुलाची व्यवस्था लावण्यासाठी स्वामी निष्ठा म्हणून पवारांच्या पायाशी लोळण घेणाऱ्या प्रा लक्ष्मण राव ढोबळे यांनी मागासवर्गीय समाजाला लाचार आणि भिक मागणारे म्हणून राजकारणात नवे भिखारी निर्माण करू नये ,
अजून ही मातंग समाजात सिंहाच्या छातीने प्रस्थपितांशी टक्कर घेणारे अनेक नेते अस्तित्वात आहेत , प्रा मच्छिंद्र सकटे सर यांच्या सारखे नेते आहेत , रमेश बागवे आहेत , दिलीप जी कांबळे आहेत , प्रा चांगदेव कांबळे आहेत ,
सगळ्यांना सगळे राजकारण कळते , कुणाचे भाडोत्री प्रचारक बनून आयुष्यभर तीच ती उदाहरणे आणि तेच ते अलंकारिक वक्तृत्व करून समाजाची भौतिक ,राजकीय , सामाजिक सुधारणा होत नाही
जिल्हा राजकारणावर कुणाची तरी एकछत्री पकड निर्माण व्हावी आणि प्रत्येक तालुक्यातील लोकप्रतिनिधी हे त्या सत्तेच्या अंकित गुलाम म्हणून राहावेत असे तुम्हाला वाटत असेल , पण आत्ता हे होणार नाही
प्रत्येक तालुक्यातील जनता सुज्ञ झाली आहे , सर्वांना मुक्त स्वातंत्र्य हवे आहे , दरबारी मुजरे घालण्याची तुमची अंगभूत सवय तुम्हाला लखलाभ ,, !
सत्व आणि स्वाभिमान गहाण टाकून मालकांच्या चाकरी करण्यासाठीच तुमचा जन्म झालेला आहे , तुमच्या तोंडात छत्रपती शिवराय , डॉ बाबासाहेब आंबेडकर , अण्णा भाऊ साठे यांची नावे शोभत नाहीत , ती कृपया घेऊन त्यांना भ्रष्ट करू नका ही हात जोडून तुम्हाला माझी विनंती आहे ,,,
जय शिवराय ,, जय भीम ,, जय अण्णा भाऊ,,,!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत