दिन विशेषदेश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

केवळ बौद्धिक चलाखी नसून बौद्धिक दिवाळखोरीसुद्धा

डॉ. रावसाहेब कसबे हे महाराष्ट्रातील एक जेष्ठ विचारवंत आहेत. परंतु महाराष्ट्रातील शोषित-वंचितांचा तोल काँग्रेसकडे झुकविण्यासाठी त्यांनी बौद्धिक चलाखी केली, आणि ती केवळ बौद्धिक चलाखी नसून बौद्धिक दिवाळखोरीसुद्धा आहे. आंबेडकरी वैचारिक साहित्यात ‘म्युरीएल लेस्टर’ हे नावं आणून त्याद्वारे ते सुचवितात की, म्युरीएल लेस्टरच्या प्रयत्नामुळे गांधीजींच्या सांगण्यावरून बाबासाहेबांना नेहरूच्या मंत्रिमंडळामध्ये व संविधान सभेमध्ये दुसऱ्यांदा जाण्याची संधी बाबासाहेबांना मिळाली. जणू काय काँग्रेस आणि गांधीने बाबासाहेबांवर उपकार केले.

कसबेंनी संशोधन करेपर्यंत म्युरीएल लेस्टर हे नावं आंबेडकरी विचारवंताना किंवा गांधीयन विचारवंतांना माहीतच नव्हते, अशी ते फुशारकी मारतात आणि कसबे म्हणतात तेच शेवटच संशोधन, असं ऐकणाऱ्याचा समज होतो. म्हणून त्यांच्या संशोधनाची खोली तपासणे आवश्यक आहे. तत्पूर्वी कसबे म्युरीएल लेस्टरबद्दल काय म्हणतात ते पाहू या.

रावसाहेब कसबे आपल्या भाषणात म्हणतात की, “गांधीजींची एक मैत्रीन म्युरीएल लेस्टर, ती नुसती मैत्रीण नव्हती तर गांधीच्या तोडीची स्त्रीमुक्ती चळवळीतील बाई होती, जागतिक कीर्तीची. आणि गांधीशी अशी समोरासमोर बोलायची आणि ती काही गांधीची शिश्या नव्हती आणि गांधीजी जेव्हा सेकंड राउंड टेबलला गेले इंग्लंडमध्ये, त्यावेळी तिच्याकडे राहिले. तिच्या आश्रमात राहिले. ती बाबासाहेब आंबेडकरांना पण भेटली आणि बाबासाहेब आंबेडकरांनीसुद्धा तिच्या आश्रमात राहावे अशी तिची इच्छा होती. पण सेकंड राउंड टेबल कॉन्फरन्सच्या काळामध्ये ती सतत बाबासाहेबांना भेटत असे. आणि ती सांगत असे बाबासाहेबांनी की, तुमचं म्हणणं बरोबर आहे हो. तर तिने #चार_खंडांमध्ये आपलं आत्मचरित्र लिहिले आणि गांधीच्याबद्दल अख्खा एक खंड आहे आणि तो बघितल्यानंतर मी असा विचार करायला लागलो की, लोक आपल्याला विचारवंत म्हणतात. आता लोकांच्या मुस्काटीत मारावं की आपण आपल्या मुस्काटीत मारावं. काय कराव सालं! आपल्याला एवढं पण माहित नाही की, बाबासाहेब आंबेडकरांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये घेण्यासाठी आणि कॉन्स्टिटयून्ट असेंब्लीचा सदस्य करण्यासाठी, पुन्हा एकदा त्यांची कॉन्स्टिटयून्ट असेंब्ली पाकिस्तान मध्ये गेल्यानंतर म्युरीएल लेस्टर ही मध्यस्थ होती आणि तिने काय काय प्रयत्न केले.”
आता रावसाहेब कसबेच्या वरील भाषणाची सत्यता पाहू या.
१) कसबे म्हणतात की, म्युरीएल लेस्टर हिने चार खंडामध्ये तिचे आत्मचरित्र लिहिले आहे. ही बाब संपूर्णतः खोटी आहे. म्युरीएल लेस्टरने अनेक ग्रंथ लिहिले आहे, परंतु तिच्या आत्मचरित्राचे दोनच खंड आहे. ते म्हणजे “It Occurred to Me” (1937) आणि “It So Happened” (1947). आणि ह्या दोनही आत्मचरित्रात्मक खंडामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एका अक्षरानेही उल्लेख नाही.

२) कसबेनी “गांधी-पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा” ह्या ग्रंथात संदर्भ ग्रंथाच्या यादीमध्ये म्युरीएल लेस्टरच्या चार ग्रंथाचा उल्लेख केला आहे. ते म्हणजे 1) It Occurred to Me (1937) 2) It So Happened (1947) 3) My Host The Hindu (1931) आणि 4) Entertaining Gandhi (1932). पहिल्या तिन्ही ग्रंथामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एका अक्षरानेही उल्लेख नाही. आणि चौथ्या ग्रंथामध्ये गांधी आणि बाबासाहेब यांच्या राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या संदर्भाने उल्लेख आलेला आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की, म्युरीएल लेस्टरच्या वरील पहिल्या तिन्ही ग्रंथामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एका अक्षरानेही उल्लेख नाही आणि चौथ्या ग्रंथामध्ये Entertaining Gandhi मध्ये म्युरीएल लेस्टरणे “बाबासाहेब आंबेडकरांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये घेण्यासाठी आणि कॉन्स्टिटयून्ट असेंब्लीचा सदस्य करण्यासाठी, पुन्हा एकदा त्यांची कॉन्स्टिटयून्ट असेंब्ली पाकिस्तान मध्ये गेल्यानंतर म्युरीएल लेस्टर ही मध्यस्थ होती आणि तिने काय काय प्रयत्न केले”, या घटनांचा उल्लेख येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण Entertaining Gandhi हा म्युरीएल लेस्टरचा ग्रंथ 1932 साली प्रकाशित झाला आणि वरील घटना ह्या 1947-48 मधल्या आहेत. म्युरीएल लेस्टरचा याबाबत जो काही संबंध बाबासाहेबांसोबत येतो, त्याची त्रोटक माहिती खैरमोडे यांनी लिहिलेल्या चरित्र खंडात आहे. मात्र म्युरीएललेस्टरने लिहिलेल्या वरील ग्रंथात याबाबत कोणतीही माहिती नाही. म्युरीएल लेस्टरच्या प्रयत्नामुळे तिच्या सांगण्यावरून गांधींनी बाबासाहेबांना नेहरू मत्रिमंडळात व संविधान सभेमध्ये जाण्याची संधी मिळाली, हा चुकीचा व खोटा इतिहास आहे. परंतु कसबेना हा चुकीचा इतिहास शोषित-वंचिताच्या मस्तकात घुसवायचा आहे. तो कशासाठी? नुकतेच डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी बाबासाहेबांचे “Iconoclast’ हे इंग्रजीमध्ये चरित्र लिहिले आहे. या संपूर्ण चरित्रात तेलतुंबडे कुठेही म्युरीएल लेस्टरचा किंवा त्यांच्या कोणत्याही ग्रंथाचा उल्लेख करत नाही, एवढेच नव्हे तर रावसाहेब कसबे किंवा त्यांच्या गांधींवरील ग्रंथाचा सुद्धा उल्लेख करत नाही. कारण डॉ. तेलतुंबडे हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शोषित वंचिताचे जैविक बुद्धिजीवी आहे, म्हणून त्यांना शासनाने कारागृहात टाकले होते. कसबे मात्र शासनाचे पुरस्कार स्वीकारतात.

३) माझा डॉ. रावसाहेब कसबे यांना सरळ प्रश्न आहे, ही बौद्धिक चलाखी कशासाठी? शोषित-वंचितांना काँग्रेसच्या दावणीला बांधण्यासाठी?
(कसबेंचे भाषण कमेंट्मध्ये दिले आहे)
Jai Bhim !

अॅड. मधुसूदन अलोने.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!