मौर्यवंश हा मुळातच बुद्धिस्ट होता.
** योद्धेय हेच मौर्यवंशी होय आणि मौर्यवंश हा मुळातच बुद्धिस्ट होता. म्हणजेच अशोक सम्राट हा जन्मजात बुद्धिस्ट होता.
** योद्धेय म्हणजेच मौर्य यांचे वर्तमान काळातील वंशज यादव आणि जाट लोक होय. अर्थातच आजचे यादव हेच मौर्यवंशीय बुद्धिस्ट होय.
** मातोश्री राजमाता जिजाऊ या बौद्ध राजा लखुजी जाधव यांच्या राजकन्या होत्या.
मौर्य यांचे वंशज प्राचीन योद्धेय जमाती चे होते. ही जमात बोधिसत्व कार्तिकेय यांना मानणारी होती. या जमातीचे असंख्य शिक्के राजस्थान पंजाब आणि उत्तर प्रदेश मध्ये मिळालेले आहे.
त्या शिक्याच्या समोरील भागावर सहा तोंड उभा कार्तिकेय दाखवलेला आहे. त्या शिक्याच्या मागील बाजूला महामाया फुलावर उभी आहे. एलन याने हे शिक्के दुसऱ्या शतकातील असल्याचे म्हटले आहे.
योद्धेय च्या गणाप्रमुखाला महासेन म्हटल्या जात होते. योद्धे गणसंघ हा मौर्यवंशी होता. मौर्य साम्राज्य च्या अंता नंतर मौर्य कुमारांनी भारताच्या अलग अलग भागामध्ये आपले स्वतःचे राज्य स्थापित केले होते.
कोकण, आणि राजस्थान मध्ये मौर्य कुमारांचे सातव्या शतकापर्यंत राज्य होते. अशा प्रकारे इसवी सन पूर्व 150 मध्ये मौर्य कुमारांनी रोहतक ला आपली राजधानी बनवून योद्धेय राज्य स्थापित केले होते. जे सन 350 पर्यंत ते कायम होते. त्यानंतर समुद्रगुप्त याने योद्धेय यांना आपल्या अधीन केले होते. इलाहाबाद मधील अशोक स्तंभावर समुद्रगुप्त याने लिहिले आहे की, योद्धेय लोक त्याला नजराना देत होते.
ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिले तर सम्राट अशोकाने आपल्या कार्यकाळामध्ये योद्धेय गणप्रमुख नियुक्त केला होता. या गणप्रमुखालाच महाराजा सेनापती म्हटल्या जात होते.(India: from Indus Valley to Civilization to Maurya, by Shyam Swaroop Gupta, 1999, PP. 30)
मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर योद्धेय मौर्य लोकांनी ईसा पूर्व 185 मध्ये आपले स्वतःचे योद्धेय गणसंघ स्थापित केला होता (The Greek in Bacteria and India, by-Tarm, PP.324) महाक्षत्रप रुद्रदामन आपल्या जुनागड येथील पाषाण अभिलेख मध्ये लिहितो की योद्धेय लोक स्वतः क्षत्रिय असल्याचा त्यांना गर्व होता, म्हणून ते कोणाला शरण जात नव्हते (The Dynasty are of the Kushanas)
यावरून स्पष्ट होते की योद्धेय लोक प्राचीन मौर्यवंशीय बौद्ध लोकच होते.
ग्रीक इतिहासकार अरीयन (Arrian) यांच्या मतानुसार योद्धेय चा अर्थ योद्धा असा होतो. योद्धेय या शब्दा पासूनच जोधीय, जोहीय, योधीय, जाधव, यादव हे शब्द बनलेले आहे.(ASI, sir Alexander Cunningham,Vol a,PP.206)
योद्ध शब्दातूनच युद्धेय हा शब्द बनलेला आहे. योद्ध लोक हेच नंतर यदु, जधु, यादव, जाधव, जाटव बनले आहे. उत्तर भारतामध्ये यौध जाट आढळून येतात. (History of the Jats by- Ram Swaroop Joon,PP.108)
यावरून असे लक्षात येते की योद्धेय हेच नंतर यादव, अहिर, आणि जाट बनले आहे आणि महाराष्ट्रामध्ये यादव हेच जाधव बनले. योद्धेय सम्राट अशोक याचे मौर्यवंशीय लोक होते या कारणामुळे हे सर्व लोक सम्राट अशोक यांचे वंशज आहेत.
यादवांनाच अहिर किंवा अभीर सुद्धा म्हटल्या जाते. म्हणजेच हे यादव नाग लोक होत आणि अहिर लोक अहिच्छत्र हे राजधानीचे नगर जे मूलनिवासी लोकांचे केंद्र होते.(The – Abhiraj, their history and culture, by-Bhagwan Singh Suryavanshi,1962,pp.15)
महाराष्ट्रामध्ये अहिरे सरनेम (आडनाव) दिसून येते. नाशिक येथील त्रिरश्मी बौद्ध गुहे (लेण्यां) मध्ये अभीर राजा ईश्वरसेन याचा सण 258 – 259 या काळातील अभिलेख आहे. त्या अभिलेखा मध्ये लिहिले आहे की अभीर हा ईश्वरसेन चा पुत्र आणि ईश्वर सेन याचे पिता अभिर शिवदत्त होते. त्याने आपल्या राज्याभिषेकाला 9 aवर्ष पूर्ण झाल्या निमित्याने 1000 मुद्रा त्रिरश्मी गुहेला दान दिल्या होत्या. (उपरोक्त पृष्ठ क्रमांक 98).
याच बौद्ध अभीर (अहिर ,यादव) लोकांनी नाशिक आणि खानदेश या प्रदेशावर आपले शासन चालू ठेवले होते आणि बाराव्या शतकामध्ये त्यांचे वंशज राजाराम देवराय देवगिरी चा राजा होता. राजमाता जिजाऊ सुद्धा यादवच्या जाधव वंशाची राजकन्या होती.
अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की याच जाधव कन्येचा विवाह देवगिरी किल्ल्यावर शहाजीराजे भोसले यांच्यासोबत संपन्न झाला होता.(मालोजी राजे आणि शहाजी महाराज, लेखक-वा. सी. बेंद्रे, पृष्ठ 39 )
हा देवगिरी किल्ला मूळचा बौद्ध (लेणी) गुफा होती आणि ही गुफा बौद्धांचे फार मोठे केंद्र होते. मेजर स्पेंडर्स याने 1914 मध्ये देवगिरी किल्ल्यावर जाऊन निरीक्षण केले आणि तो किल्ला पाहून त्याला असे जाणवले की हा किल्ला प्राचीन बौद्ध गुहेवर बनविलेला आहे, या किल्ल्याची रचना कारले गुहेसारखी आहे असे त्याला जाणवले.(Local History of Poona and its Battle Fields By-Coilone L.W. Shakespeare, 1914,PP. 99.58)
प्रा. गंगाधर नाखले
दिनांक: 12/11/2024
9764688712,7972722081
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत