बौद्ध धर्म हा मूलनिवासी लोकांमधील नाग लोकांचा इतिहास आणि परंपरेला प्रोत्साहन देणारा धर्म होता.
(1) बुद्ध हे नागवंशी होते. शाक्यांनाच आदित्य किंवा सूर्यवंशी म्हटल्या गेलेले आहे.
बौद्ध धर्म हा मूलनिवासी लोकांमधील नाग लोकांचा इतिहास आणि परंपरेला प्रोत्साहन देणारा धर्म होता.
महाराष्ट्रातील मराठी सुद्धा सूर्यवंशी अर्थात नागवंशीय असून ते तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे वंशज होय.
सिंधू संस्कृती नागांची प्राचीन संस्कृती होती. ऋग्वेदामध्ये नागांना ब्राह्मणांनी दुश्मन म्हटलेले आहे. नागांनाच ‘अही ‘ म्हटल्या गेलेले आहे. नाग लोकांनाच पणी लोक सुद्धा म्हटल्या जात आहे.
प्रसिद्ध इतिहासकार Oldham महोदय सिंधू संस्कृतीला नागांची संस्कृती होती अशी मान्यता देतात.
फर्ग्युसन महोदय नाग लोकांनाच भारताचे निर्माते मानतात. नाग आणि तक्ष हे प्रसिद्ध नागवंशीय लोक होय.(Tree and Sarpent Worship by Fergussan, PP. 95 )
सिंधू नदीच्यावर गांधार प्रदेशांमध्ये नागा लोकांच्या संबंधात एक अभिलेख सापडलेला आहे त्यामध्ये हे लिहिलेले आहे की,”हे जलकुंभ सर्व नाग लोकांची पूजा करण्यासाठी बनवलेला आहे”(Moments Naginis from Mathura by-Shrinivasan, 2007,PP. 237,fn 62 )
फर्ग्युसन महोदय यांच्या मतानुसार वृक्ष पूजा आणि नागांची पूजा करणे प्राचीन सिंधू कालीन परंपरा होय. ब्राह्मण भारतात येण्या अगोदर ही परंपरा अस्तित्वात होती.
सर जॉन मार्शल यांनी आपली सिंधू संस्कृती चा रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिले आहे की नदी पूजा, नाग पूजा ब्राह्मणांच्या पूर्वी असलेली परंपरा आहे जे येथील मूलनिवासी लोकांमध्ये होती. रुक्ष पूजा, नदी पूजा ,नाग पूजा याची नंतर ब्राह्मणांनी कॉपी केली.
सिंधू संस्कृती चे उत्खनन होण्याच्या अगोदर सुद्धा फरगुशन महोदयांनी सिंधू काळातील नागपरंपरेला बुद्धकालीन परंपरे सोबत जोडले होते. ते म्हणतात – “बौद्ध धर्म हा मूलनिवासी लोकांमध्ये नाग लोकांचा इतिहास आणि त्यांच्या परंपरेला प्रोत्साहन देणारा धर्म होता. याच कारणामुळे नाग लोकांनी बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात स्वीकारलेला होता. त्याचप्रमाणे मगध येथील शूद्र राजांनी सुद्धा बौद्ध धर्म स्वीकारून त्याला राष्ट्रधर्म बनविले. बौद्ध धर्माने नागांच्या पूजेच्या जागी स्तूप पूजा सुरू केली आणि या पूजेच्या माध्यमातून सिंधू काळातील नाग पूजा आणि वृक्ष पूजेला बौद्ध धर्मासोबत जोडले.”
तथागत भगवान बुद्ध सुद्धा नागवंशी होते. शाख्यांनाच आदित्य किंवा सूर्यवंशी कुळातील असल्याचे दाखविलेले आहे. शाक्य आणि लिच्छवी यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्यापूर्वी ते अवैदिक समाधींची (स्थळांची) पूजा करत होते. की ज्याचा संबंध सरळ सिंधू संस्कृतीशी जुळतो आहे.
शाक्य आणि लिच्छवि नाग कुळातील होते. रिस डेव्हिड यांनी शाख्यांना अत्यंत प्रगत जमात असल्याचे मान्य केले आहे. उत्तर पश्चिम भारताच्या सौर अर्थात नागवंशी लोकांचा समुद्र व्यापार करणारे नाग शाक्य हे रस्ता शोधण्यासाठी पाळीव पक्षी ठेवत असत.
भारतातील लाख लोकांचा संबंध नेहमी सूर्य पूजेशी असल्याचे दिसून येते. याच कारणास्तव भारतातील नागवंशीय लोक हेच सूर्यवंशी आहेत. सूर्यवंशी लोकांचे पूर्वज जे पूर्वी राजे होते त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे वंशज त्यांची पूजा नागदेवतेच्या स्वरूपात करीत होते आणि त्यांना नागदेवता च्या स्वरूपात दाखविण्यासाठी त्यांच्या डोक्यावर नागफण दाखवत होते.
महाराष्ट्रातील मराठे हे सुद्धा नागवंशीय अर्थात सूर्यवंशी आहेत भगवान बुद्धाचे वंशज सुद्धा आहेत.
महाराष्ट्र मधील गाव खेड्यातील महिला आज सुद्धा पाच नाग फण असलेल्या नागाची आकृती आपल्या घराच्या भिंतीवर काढतात. ही त्यांच्या नागवंशी असल्याची ओळख होय. माझी आई शांताबाई महादेव नाखले आमच्या घराच्या मातीच्या भिंतीवर नागपंचमीच्या दिवशी अशा प्रकारचे पाच नागाची आकृती काढत असे हे मी माझ्या डोळ्याने पाहिलेले आहे.(संदर्भ: छत्रपती शिवाजी महाराज का बौद्ध धर्म से संबंध, पृष्ठ क्रमांक, 19,20, लेखक, डॉक्टर विलास खरात, डॉक्टर प्रताप चाटसे)
प्रा. गंगाधर नाखले(मराठी अनुवादक)
09/11/2024
7972722081
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत